महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ५, अंक १] मंगळवार, जानेवारी १, २०१९/पौष ११, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक १
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०००३२, दिनांक १ जानेवारी २०१९
आदेश
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम.
क्रमांक मुद्रांक-२०१८/३४३२/प्र.क्र. ३२५/म-१.—महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम (१९५८ चा ६०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) च्या कलम ९ च्या खंड (अ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, लोकहितार्थ तसे करणे आवश्यक असल्याची महाराष्ट्र शासनाची खात्री पटल्यामुळे, महाराष्ट्र शासन महापौर बंगल्याच्या अंदाजे ११,५५१.०१ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या माहीम विभागातील नगर भूमापन क्रमांक/एफ पी क्रमांक ५०१, ५०२ व १४९५ या स्थावर मालमत्तेवर (तीवर स्थित असलेल्या संरचनांसह) " बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे " बांधकाम करणे सुकर होण्याच्या दृष्टीने उक्त मालमत्ता ३० वर्षाच्या भाडेपट्टयाने देण्याबाबत, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम (१९५० चा २९) याखाली नोंदणीकृत ' बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक ' या सार्वजनिक धर्मादाय न्यासाच्या दरम्यान निष्पादित करण्यात येणाया संलेखावर, उक्त अधिनियमाच्या अनुसूची १ च्या अनुच्छेद ३६ अन्वये आकारणीयोग्य असलेले रु. १४,४१,६१,०५०/- (रु. चौदा कोटी एक्केचाळीस लाख एकसष्ट हजार पन्नास केवळ) इतके मुद्रांक शुल्क याद्वारे माफ करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी १, २०१९/पौष ११, शके १९४० REVENUE AND FORESTS DEPARTMENT, Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 1st January, 2019
ORDER
MAHARASHTRA STAMP ACT.
No. Mudrank-2018/3432/C.R. No. 325/M-1.—In exercise of the powers conferred by clause (a) of section 9 of the Maharashtra Stamp Act (LX of 1958) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra, being satisfied that it is necessary to do so in the public interest, hereby remits the stamp duty of Rupees 14,41,61,050/- (Rupees Fourteen Crore Forty One Lakh Sixty One Thousand and Fifty only) chargeable under Article 36 of Schedule I of the said Act, on the instrument of lease for thirty years of a plot of land bearing No. CTS/FP No. 501, 502 and 1495 of Mahim Division along with Mayor's Bungalow (the structure standing thereon) admeasuring 11551.01 square meters, between the Municipal Corporation of Greater Mumbai and Bala Saheb Thackeray Rashtriya Smarak, a public charitable trust registered under the Maharashtra Public Trusts Act (XXIX of 1950), in order to facilitate construction of 'Bala Saheb Thackeray Rashtriya Smarak' on the said property.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
PRITAMKUMAR V. JAWALE,
Desk Officer.