RNI No. MAHBIL/ 2012 / 44835 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - ८, अंक - १ ]
[ पृष्ठे १६ गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३ ९, २०१ ९ / पौष १३ - १९ , शके १ ९ ४०
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण अधिसूचना , नेमणुका, पदोन्नती इत्यादी
नियुक्त अधिकारी , प्रारूप विकास योजना, शिर्डी तथा सहायक संचालक, नगररचना यांजकडून
अहमदनगर शाखा, अहमदनगर
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना (दुसरी सुधारणा) अधिनियम, २०१० चे कलम २८ (४) अन्वये
जाहीर सूचना
क्रमांक प्रा.वि.यो. शिर्डी ( सु. )/कलम ३० ( १ )/ ससंअ/४२ ९ ७ - अ/२०१८ . - शिर्डी नगरपंचायतीने ( यापुढे "नियोजन प्राधिकरण " म्हणून संबोधिलेले) तिच्या सर्वसाधारण सभेचे ठराव क्रमांक २ , दिनांक ५ जून २०१७ अन्वये शिर्डी ( सु. ) प्रारुप विकास योजना, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना ( दुसरी सुधारणा) अधिनियम २०१० चे कलम २६ (१) अन्वये प्रसिध्द केली असून त्याची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र , नाशिक विभाग , भाग १ पुरवणी, दिनांक १५ ते २१ जून २०१७ रोजी प्रसिद्ध झाली आहे. सदरहू प्रसिद्ध झालेल्या प्रारूप विकास योजनेवर विहित मुदतीत आलेल्या हरकती / सूचनांचा विचार करून उक्त अधिनियमाच्या कलम २८ (२) अन्वये स्थापन केलेल्या नियोजन समितीने त्यांचा अहवाल दिनांक १३ एप्रिल २०१८ रोजी नगरपंचायतीकडे सुपूर्द केलेला आहे. नगरपंचायतीने विहित ६ महिने मुदत व ६ महिन्यांच्या मुदतवाढीसह सदरची प्रारूप विकास योजना अधिनियमाच्या कलम ३० अन्वये दिनांक २० जून २०१८ पावेतो शासनास सादर करणे आवश्यक होते. तथापि, या मुदतीत नगरपंचायतीने प्रारूप सुधारित विकास योजना शासनाकडे मंजुरीसाठी सादर न करता दिनांक २४ ऑगस्ट २०१८ रोजीच्या पत्रान्वये प्रारूप सुधारित विकास योजना शासनाकडे मंजुरीसाठी सादर केली आहे. त्यामुळे मा. सहसंचालक, नगररचना , नाशिक विभाग , नाशिक यांनी त्यांचेकडील आदेश क्रमांक ११०७ , दिनांक ११ सप्टेंबर २०१८ अन्वये सहायक संचालक, नगररचना , शाखा कार्यालय , अहमदनगर यांची अधिनियमाच्या कलम ३० अन्वये प्रारूप विकास योजना शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्याची उर्वरित कार्यवाही करण्याकरिता अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. मा . संचालक, नगररचना , महाराष्ट्र राज्य , पुणे यांनी आदेश क्रमांक ५७२० , दिनांक ३० ऑक्टोबर २०१८ अन्वये प्रारूप विकास योजना कलम ३० अन्वये शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्याकरिता दिनांक १८ जुलै २०१८ ते दिनांक १७ जानेवारी २०१ ९ असा कालावधी निश्चित करून दिलेला आहे.
वरील परिच्छेदात नमूद केल्यानुसार प्राप्त अधिकारात नियोजन समितीने दिलेल्या अहवालाचा विचार करून प्रारूप प्रसिद्ध सुधारित विकास योजनेत काही फेरबदल केलेले आहेत.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना ( दुसरी सुधारणा) अधिनियम , २०१० (यापुढे " उक्त अधिनियम " म्हणून संबोधिलेले) चे कलम २८ (४) अन्वये नियुक्त अधिकारी यांनी विकास योजनेच्या मसुद्यात केलेले फेरबदल किंवा बदल जनतेच्या माहितीसाठी महाराष्ट्र शासन राजपत्रात व दोन स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.
(१)
वि ( एच) ५२१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३ ९ , २०१९ / पौष १३ - १९ , शके १९४० उक्त अधिनियमाच्या तरतुदीनुसार प्रारूप विकास योजना ( सुधारित ) शिर्डीमध्ये नियुक्त अधिकारी यांनी विकास योजनेच्या मसुद्यात केलेल्या फेरबदलाची / बदलांची सूची खालीलप्रमाणे जनतेच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच फेरबदल दर्शविणारा विकास योजनेचा नकाशा शिर्डी नगरपंचायत व नियुक्त अधिकारी तथा सहायक संचालक, नगररचना , अहमदनगर शाखा , अहमदनगर या कार्यालयात ठेवण्यात आला आहे.
प्रारूप विकास योजना , शिर्डी ( सु. ) फेरबदलांची / बदलांची सूची
आरक्षणाचा उद्देश
अ. क्र.
आरक्षण
३
नियुक्त अधिकारी यांनी केलेले फेरबदल ४
१
२
एम -१
१ सर्व्हे क्रमांक ३ पैकी मधील १८ मीटर रुंद विकास योजना रस्ता ते आरक्षण क्रमांक २ बगीच्याच्या पश्चिम हद्दीपर्यंतचा पूर्व- पश्चिम १२ मीटर रुंद विकास योजना रस्ता.
सर्व्हे क्रमांक ३ पैकी मधील १८ मीटर रुंद विकास योजना रस्ता ते आरक्षण क्रमांक २ बगीच्याच्या पश्चिम हद्दीपर्यंतचा पूर्व- पश्चिम १२ मीटर रुंद विकास योजना रस्ता वगळण्यात येऊन त्याखालील क्षेत्र नकाशात दर्शविल्यानुसार वाणिज्य विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.
एम -२
२ आरक्षण क्रमांक ४ क्रीडांगणाच्या दक्षिण हद्दी- लगतच्या २४ मीटर रुंद पूर्व- पश्चिम विकास योजना रस्त्याची आखणी .
आरक्षण क्रमांक ४ क्रीडांगणाच्या दक्षिण हद्दीलगतच्या २४ मीटर रुंद पूर्व- पश्चिम विकास योजना रस्त्याची आखणी नकाशात दर्शविल्यानुसार मंजूर विकास योजनेतील आखणीनुसार दर्शविण्यात येत आहे आणि मुक्त होणारे क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.
एम-३
३ पिंपळवाडी रस्त्यापासून आरक्षण क्रमांक ४ क्रीडांगणाच्या दक्षिण हद्दीलगतच्या २४ मीटर रुंद विकास योजना रस्त्यापर्यंतच्या दक्षिणोत्तर १८ मीटर रुंद विकास योजना रस्त्याची आखणी.
पिंपळवाडी रस्त्यापासून आरक्षण क्रमांक ४ क्रिडांगणाच्या दक्षिण हद्दीलगतच्या २४ मीटर रुंद विकास योजना रस्त्यापर्यंतच्या दक्षिणोत्तर १८ मीटर रुंद विकास योजना रस्त्याची रुंदी कमी करून ती नकाशात दर्शविल्यानुसार १२ मीटर रुंद दर्शविण्यात येत आहे आणि मुक्त होणारे क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट करण्यात येत आहे .
४
एम-४
आरक्षण क्रमांक ३ , नगर भवन
आरक्षण क्रमांक ३ नगर भवनच्या जागेतून विद्यमान रस्ता जात असून त्याच्या पश्चिमेकडील क्षेत्र आरक्षण क्रमांक ३ , दुकान केंद्र व पूर्वेकडील क्षेत्र आरक्षण क्रमांक ३ - अ, पार्किंग या प्रयोजनांसाठी आरक्षित करण्यात येत आहे.
एम -५
अहमदनगर - मनमाड रस्त्यापासून सर्व्हे नंबर ५३ च्या पूर्व हद्दीपर्यंतच्या पूर्व- पश्चिम १८ मीटर रुंद विकास योजना रस्ता (पिंपळवाडी रोड) विद्यमान रस्ता म्हणून दर्शविण्यात येत आहे .
५ अहमदनगर - मनमाड रस्त्यापासून सर्व्हे नंबर ५३ च्या पूर्व हद्दीपर्यंतच्या पूर्व- पश्चिम १८ मीटर रुंद विकास योजना रस्त्याची आखणी (पिंपळवाडी रोड) .
एम-६
६ पिंपळवाडी रस्त्यापासून आरक्षण क्रमांक १२ हाउसिंग फॉर डिसहाउस्डच्या दक्षिण-पूर्व कोपऱ्यापर्यंतचा दक्षिणोत्तर १८ मीटर विकास योजना रस्ता आणि आरक्षण क्रमांक १८ क्रीडांगणाच्या उत्तर- पश्चिम कोपऱ्यापासून आरक्षण क्रमांक २० बगीच्याच्या दक्षिण- पश्चिम कोपऱ्यापर्यंतचा दक्षिणोत्तर १८ मीटर रुंद विकास योजना रस्ता.
पिंपळवाडी रस्त्यापासून आरक्षण क्रमांक १२ हाउसिंग फॉर डिसहाउस्डच्या दक्षिण- पूर्व कोपऱ्यापर्यंतचा दक्षिणोत्तर १८ मीटर विकास योजना रस्ता आणि आरक्षण क्रमांक १८ क्रीडांगणाच्या उत्तर - पश्चिम कोपऱ्यापासून आरक्षण क्रमांक २० बगीच्याच्या दक्षिण- पश्चिम कोपऱ्यापर्यंतचा दक्षिणोत्तर १८ मीटर रुंद विकास योजना रस्ता नकाशात दर्शविल्यानुसार वगळण्यात येत असून मुक्त होणारे क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.
एम -७
सर्व्हे नंबर ५५ च्या उत्तर- पश्चिम हद्दीपासून आरक्षण क्रमांक १३ च्या उत्तर- पश्चिम हद्दीपर्यंत १२ मीटर रुंद विकास योजना रस्ता आखणी नव्याने प्रस्तावित करण्यात येत आहे.
७ सर्व्हे नंबर ५५ च्या उत्तर- पश्चिम हद्दीपासून आरक्षण क्रमांक १३ च्या उत्तर- पश्चिम हद्दीपर्यंतचा नव्याने प्रस्तावित १२ मीटर रुंद विकास योजना रस्ता आखणी.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३ ९ , २०१९ / पौष १३ - १ ९, शके १ ९४० प्रारूप विकास योजना, शिर्डी ( सु. ) फेरबदलांची / बदलांची सूची चालू
आरक्षण
आरक्षणाचा उद्देश
अ. क्र.
नियुक्त अधिकारी यांनी केलेले फेरबदल १
४
२
३
८
एम -८
आरक्षण क्रमांक १३ साईट फॉर साई संस्थान आरक्षण क्रमांक १३ साईट फॉर साई संस्थान ह्या आरक्षणाखालील क्षेत्रापैकी नकाशात दर्शविल्यानुसार दक्षिणेकडील पट्टी वजा क्षेत्र आरक्षणातून वगळण्यात येऊन रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे. तथापि, रहिवास विभागात समाविष्ट होणाऱ्या क्षेत्रात रेखांकन करताना १० टक्के सक्तीच्या खुल्या जागेव्यतिरिक्त १५ टक्के क्षेत्र सुविधा भूखंडासाठी ठेऊन असे क्षेत्र नगर पंचायतीस विनामोबदला हस्तांतरीत करणे आवश्यक राहील .
९
एम -९
आरक्षण क्रमांक २० बगीच्याच्या दक्षिण- पश्चिम हद्दीपासून पूर्वेकडे सर्व्हे नंबर ९ ८ मधील १२ मीटर रुंद विकास योजना रस्त्यापर्यंतचा १८ मीटर नव्याने प्रस्तावित पूर्व- पश्चिम विकास योजना रस्ता.
आरक्षण क्रमांक २० बगीच्याच्या दक्षिण- पश्चिम हद्दीपासून पूर्वेकडे सर्व्हे नंबर ९ ८ मधील २४ मीटर रुंद विकास योजना रस्त्यापर्यंतचा १८ मीटर पूर्व- पश्चिम विकास योजना रस्ता नकाशात दर्शविल्या- नुसार नव्याने प्रस्तावित करण्यात येत आहे.
१०
एम -१० अहमदनगर - मनमाड रस्त्यापासून पूर्वेकडे दक्षिणोत्तर २४ मीटर रुंद विकास योजना रस्त्यापर्यंतच्या १५ मीटर रुंद विकास योजना रस्त्याची आखणी.
अहमदनगर - मनमाड रस्त्यापासून पूर्वेकडे दक्षिणोत्तर २४ मीटर रुंद विकास योजना रस्त्यापर्यंतच्या १५ मीटर रुंद विकास योजना रस्त्याच्या आखणीत नकाशात दर्शविल्यानुसार बदल दर्शविण्यात आलेला आहे आणि मुक्त होणारे क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.
आरक्षण क्रमांक ८ बगीचा
११
एम -११
आरक्षण क्रमांक ८ बगीचाचे नामाभिधान " वाहनतळ" असे करण्यात आले आहे.
१२
एम -१२ आरक्षण क्रमांक २३ साई संस्थान
आरक्षण क्रमांक २३ साई संस्थानचे नामाभिधान हाऊसिंग फॉर अर्बन पुअर (Housing for Urban Poor ) असे करण्यात आले आहे.
१३ एम -१३ आरक्षण क्रमांक ५ ९ फायर ब्रिगेड स्टेशन ( नव्याने प्रस्तावित आरक्षण) .
आरक्षण क्रमांक ५ ९ फायर ब्रिगेड स्टेशन हे आरक्षण सर्व्हे नंबर १२६ पैकी पाण्याच्या टाकीच्या जागेत प्रस्तावित करण्यात आले आहे.
१४
एम-१४
आरक्षण क्रमांक २७ फायर ब्रिगेड स्टेशन
आरक्षण क्रमांक २७ फायर ब्रिगेड स्टेशनचे नामाभिधान "वाहनतळ" असे करण्यात आले आहे.
एम -१५
१५
आरक्षण क्रमांक ३० बगीचा व आरक्षण क्रमांक ३१ वाहनतळ .
आरक्षण क्रमांक ३० बगीचा व आरक्षण क्रमांक ३१ वाहनतळ यांच्या हद्दी मंजूर विकास योजनेतील आरक्षणांच्या हद्दीनुसार दर्शविण्यात आल्या आहेत .
१६
एम -१६ सिटी सर्व्हे नंबर ९ १२ मधील विद्यमान वाणिज्य संकुल व आरक्षण क्रमांक ३० वाहनतळ यामधील दक्षिणोत्तर १५ मीटर रुंद विकास योजना रस्ता आखणी.
सिटी सर्व्हे नंबर ९ १२ मधील विद्यमान वाणिज्य संकुल व आरक्षण क्रमांक ३० वाहनतळ यामधील दक्षिणोत्तर १५ मीटर रुंद विकास योजना रस्त्याची रुंदी कमी करून ती नकाशात दर्शविल्यानुसार १२ मीटर रुंद करण्यात आलेली आहे आणि मुक्त होणारे क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट करण्यात येत आहे .
४
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३ ९ , २०१९ / पौष १३ - १९ , शके १९४० प्रारूप विकास योजना, शिर्डी ( सु. ) फेरबदलांची / बदलांची सूची चालू
आरक्षणाचा उद्देश
आरक्षण
अ. क्र.
नियुक्त अधिकारी यांनी केलेले फेरबदल १
४
२
३
१७
एम -१७ आरक्षण क्रमांक ३१ वाहनतळाच्या उत्तरेकडील पूर्व- पश्चिम १५ मीटर रुंद विकास योजना रस्त्यांची आखणी.
आरक्षण क्रमांक ३१ वाहनतळाच्या उत्तरेकडील पूर्व- पश्चिम १५ मीटर रुंद विकास योजना रस्त्याची रुंदी कमी करून ती नकाशात दर्शविल्यानुसार १२ मीटर रुंद करण्यात आलेली आहे आणि मुक्त होणारे क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.
१८
एम -१८ सर्व्हे नंबर १६४ पैकी व १६५ पैकी मधील दक्षिणोत्तर १८ मीटर रुंद विकास योजना रस्त्याची आखणी .
सर्व्हे नंबर १६४ पैकी व १६५ पैकी मधील दक्षिणोत्तर १८ मीटर रुंद विकास योजना रस्त्याची आखणी नकाशात दर्शविल्यानुसार मंजूर विकास योजनेतील आखणीनुसार दर्शविण्यात आली आहे आणि मुक्त होणारे क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.
आरक्षण क्रमांक ३२ कॅम्पिंग ग्राऊंड
१९ एम -१९
आरक्षण क्रमांक ३२ कॅम्पिंग ग्राऊड हे आरक्षण रद्द करून त्याखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले आहे. तथापि, रहिवास विभागात समाविष्ट होणाऱ्या क्षेत्रात रेखांकन करताना १० टक्के सक्तीच्या खुल्या जागेव्यतिरिक्त १५ टक्के क्षेत्र सुविधा भूखंडासाठी ठेवून असे क्षेत्र नगरपंचायतीस विनामोबदला हस्तांतरीत करणे आवश्यक राहील.
२०
एम -२० आरक्षण क्रमांक ३६ एक्सटेंशन टु सिव्हेज ट्रिटमेंट प्लॅन्ट.
आरक्षण क्रमांक ३६ एक्सटेंशन टु सिव्हेज ट्रिटमेंट प्लॅन्ट पैकी पश्चिमेकडील भागशः क्षेत्र नकाशात दर्शविल्यानुसार आरक्षणातून वगळून शेती विभागात समाविष्ट करण्यात आले आहे .
२१
आरक्षण क्रमांक ४६ घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प
एम -२१
आरक्षण क्रमांक ४६ घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प , या आरक्षणाखालील क्षेत्रापैकी सर्व्हे नंबर ७२ पैकी क्षेत्र आरक्षणातून वगळून शेती विभागात समाविष्ट करण्यात आले आहे.
२२
एम -२२ आरक्षण क्रमांक ४२ शैक्षणिक संकुल
आरक्षण क्रमांक ४२ शैक्षणिक संकुल, या आरक्षणाखालील क्षेत्र आरक्षणातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले आहे. तथापि, रहिवास विभागात समाविष्ट होणाऱ्या क्षेत्रात रेखांकन करताना १० टक्के सक्तीच्या खुल्या जागेव्यतिरिक्त १५ टक्के क्षेत्र सुविधा भूखंडासाठी ठेवून असे क्षेत्र नगरपंचायतीस विनामोबदला हस्तांतरीत करणे आवश्यक राहील .
२३
एम -२३ आरक्षण क्रमांक ४८ प्राथमिक शाळा आणि खेळाचे मैदान.
आरक्षण क्रमांक ४८ प्राथमिक शाळा आणि खेळाचे मैदान, या आरक्षणाखालील क्षेत्रापैकी नकाशात दर्शविल्यानुसार १.६५ हेक्टर क्षेत्र आरक्षणात कायम ठेवून उर्वरत क्षेत्र आरक्षणातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले आहे. तथापि , रहिवास विभागात समाविष्ट होणाऱ्या क्षेत्रात रेखांकन करताना १० टक्के सक्तीच्या खुल्या जागेव्यतिरिक्त १५ टक्के क्षेत्र सुविधा भूखंडासाठी ठेवून असे क्षेत्र नगरपंचायतीस विनामोबदला हस्तांतरीत करणे आवश्यक राहील .
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३ ९ , २०१९ / पौष १३ - १ ९, शके १ ९४० प्रारूप विकास योजना, शिर्डी ( सु. ) फेरबदलांची / बदलांची सूची चालू
आरक्षणाचा उद्देश
आरक्षण
अ. क्र.
नियुक्त अधिकारी यांनी केलेले फेरबदल १
४
२
३
एम-२४
२४
सर्व्हे नंबर ११४ व १२२ मधील ४५ मीटर रुंद विकास योजना रस्ता आखणी .
सर्व्हे नंबर ११४ व १२२ मधील ४५ मीटर रुंद विकास योजना रस्त्याची आखणी मंजूर विकास योजनेतील रस्ता आखणीनुसार दर्शविण्यात आली आहे आणि मुक्त होणारे क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.
२५
एम -२५ सर्व्हे नंबर १२७ व सर्व्हे नंबर १२८ मधील ४५ मीटर रुंद विकास योजना रस्ता आखणी.
सर्व्हे नंबर १२७ व सर्व्हे नंबर १२८ मधील ४५ मीटर रुंद विकास योजना रस्त्याची आखणी मंजूर विकास योजनेतील रस्ता आखणीनुसार दर्शविण्यात आली आहे आणि मुक्त होणारे क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.
२६
एम -२६ आरक्षण क्रमांक ५४ धर्मशाळा
आरक्षण क्रमांक ५४ धर्मशाळा या आरक्षणाखालील क्षेत्र आरक्षणातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले आहे. तथापि, रहिवास विभागात समाविष्ट होणाऱ्या क्षेत्रात रेखांकन करताना १० टक्के सक्तीच्या खुल्या जागेव्यतिरिक्त १५ टक्के क्षेत्र सुविधा भूखंडासाठी ठेवून असे क्षेत्र नगरपंचायतीस विनामोबदला हस्तांतरीत करणे आवश्यक राहील .
२७
आरक्षण क्रमांक ५६ कॅम्पिंग ग्राऊंड
एम -२७
आरक्षण क्रमांक ५६ कॅम्पिंग ग्राऊंड या आरक्षणाखालील सर्व्हे नंबर १६४ व सर्व्हे नंबर १६८ पैकी भागशः क्षेत्र नकाशात दर्शविल्यानुसार आरक्षणातून वगळण्यात येऊन रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले आहे. तथापि, रहिवास विभागात समाविष्ट होणाऱ्या क्षेत्रात रेखांकन करताना १० टक्के सक्तीच्या खुल्या जागेव्यतिरिक्त १५ टक्के क्षेत्र सुविधा भूखंडासाठी ठेवून असे क्षेत्र नगरपंचायतीस विनामोबदला हस्तांतरीत करणे आवश्यक राहील.
आरक्षण क्रमांक ५७ सार्वजनिक शौचालय
२८ एम-२८
आरक्षण क्रमांक ५७ सार्वजनिक शौचालय या आरक्षणाची नकाशात दर्शविल्यानुसार पुनर्रचना करण्यात आली आहे.
आरक्षण क्रमांक ५८ पार्किंग
२९ एम -२९
आरक्षण क्रमांक ५८ पार्किंग या आरक्षणाची नकाशात दर्शविल्यानुसार पुनर्रचना करण्यात आली आहे.
३० एम-३० सर्व्हे नंबर ५६ मधील विकली बाजाराच्या उत्तर - पूर्वकोपऱ्यापासून विद्यमान कोंडवाड्याच्या दक्षिण- पूर्व कोपऱ्यापर्यंतचा दक्षिणोत्तर १८ मीटर रुंद विकास योजना रस्ता .
सर्व्हे नंबर ५६ मधील विकली बाजाराच्या उत्तर- पूर्व कोपऱ्यापासून विद्यमान कोंडवाड्याच्या दक्षिण-पूर्व कोपऱ्यापर्यंतच्या दक्षिणोत्तर १८ मीटर रुंद विकास योजना रस्त्याची रुंदी कमी करून ती नकाशात दर्शविल्यानुसार १२ मीटर रुंद करण्यात आलेली आहे आणि मुक्त होणारे क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.
आकाश बागुल ,
नियुक्त अधिकारी , प्रारूप विकास योजना , शिर्डी ( सु . )
तथा सहायक संचालक, नगररचना , अहमदनगर .
अहमदनगर , २० डिसेंबर २०१८ .
६
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३ ९, २०१९ / पौष १३ - १९, शके १९४० Schedule of Modifications for the Draft Development Plan , Shirdi ( Revised ) Name of Site 3
Sr. No. 1
Changes made by the Appointed Officer 4
Site 2
1
M-1
12 meters wide East- West Development Plan road in Survey No. 3 ( pt . ) from 18 meters wide Development Plan road to Western side of Site No. 2 Garden .
12meters wide East -West Development Plan road in Survey No. 3 (pt . ) from 18 meters wide Development Plan road to Western side of Site No. 2 Garden is deleted and land thereunder included in Commercial Zone as shown in plan .
2
M-2
Alignment of East -West 24 meters wide Development Plan road on Southern boundary of Site No. 4 Playground.
Alignment of East - West 24 meters wide Development Plan road on Southern boundary of Site No. 4 Playground is realigned as shown in plan as per Sanctioned Development Plan and land so released is included in adjoining zone.
3
M-3
Alignmentof 18 meters wide North- South Development Plan roadfrom Pimpalwadi road upto 24 meters wideDevelopment Plan road on the Southern side of Site No. 4 Playground.
Alignment of 18 meters wide North- South Development Plan road from Pimpalwadi road upto 24 meters wide Development Plan road on the Southern side of Site No. 4 Playground is reduced to 12.00 meters as shown on plan and land so released is included in adjoining zone .
M-4
4
Site No. 3 Town Hall
Western portion of the existing road passing through Site No. 3 Town Hall is reserved for Site No. 3 , Shopping Centre and Eastern portion of the existing road passing through Site No. 3 Town Hall is reserved as Site No. 3A Parking more specifically shown on plan.
5
M-5
Alignment of 18 meters wide East- West Development Plan road ( Pimpalwadi road) from Manmad - Ahmednagar road to Eastern corner of Survey No. 53 is shown as existing road.
Alignment of 18 meters wide East- West Development Plan road (Pimpalwadi road ) from Manmad- Ahmednagar road to Eastern corner ofSurvey No. 53 .
6
M-6
Alignmentof 18 meters wide North- South Development Plan roadfrom Pimpalwadi road to South - East corner of Site No. 12 Housing for Dishoused and from North -West corner of Site No. 18 Playground upto South -West corner of Site No. 20Garden.
Alignment of 18 meters wide North - South DevelopmentPlan road from Pimpalwadi road to South - East corner of Site No. 12 Housing for Dishoused and from North -West corner of Site No. 18 Playground upto South -West corner of Site No. 20 Garden is deleted as shown in plan and land thereunder is included in adjoining zone .
7
M-7
New 12 meters wide Development Plan road is proposed from North- West corner of Survey No. 55 to North -West corner of Site No. 13 .
New 12 meters wide Development Plan road is proposed from North - West corner of Survey No. 55 to North- West corner of Site No. 13 .
७ महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३ ९ , २०१९ / पौष १३ - १ ९, शके १ ९४० Schedule of Modifications for the Draft Development Plan , Shirdi ( Revised ) contd.
Name of Site 3
Sr. No. 1
Changes made by the Appointed Officer 4
Site 2
8
M-8
Site No. 13 Site for Sai Sansthan
Strip of land on Sounthern portion of Site No. 13 Sai Sansthan is deleted and included in Residential Zone as shown in plan . While preparing layout under area so released ; 15 per cent amenity space should be proposed in addition to 10 per cent compulsory open space . Such 15 per cent amenity space should be handed over to Planning Authority free of cost .
9
M-9
Alignment of new 18 meters wide Development Plan road from South- West corner of Site No. 20 Garden towards East side up to 12 meters Development Plan road in Survey No. 98 is proposed .
Alignment of new 18 meters wide Development Plan road from South- West corner of Site No. 20 Garden towards East side upto 12 meters Development Plan road in Survey No. 98 .
10 M-10 Alignment of 15 meters Development Plan road from Ahmednagar Manmad road towards East side upto 24 meters wide North -South Development Planroad .
Alignment of 15 meters Development Plan road from Ahmednagar - Manmad road towards East side upto 24 meters wide North- South Development Plan road is realigned as shown in plan and land so released is included in adjoining zone.
11
M-11
Site No. 8 Garden
SiteNo. 8 Garden is redesignated as Parking .
12 M-12
Site No. 23 Sai Sansthan
Sai Sansthan is redesignated as Housingfor urbanpoor.
13 M-13
New Site No. 59 Fire Brigade Station New Site No. 59 Fire Brigade Station is proposed in Survey No. 126 Pt . in the area of ESR.
M-14
14
Site No. 27 Fire Brigade Station
Site No. 27 Fire Brigade Station is redesignated as Site No. 27 Parking .
15 M-15
Site No. 30 Garden and Site No. 31 Parking.
Boundaries of Site No. 30 Garden and Site No. 31 Parking are shown as per Sanctioned Development Plan .
16 M-16 Alignmentof 15 meters wide North- South Development Plan road in between Existing Commercial Complex in CTS No. 912 and Site No. 31 Parking .
Alignment of 15 meters wide North - South Development Plan road in between Existing Commercial Complex in CTS No. 912 and Site No. 31 Parking is reduced to 12 meters as shown in plan and land so released is included in adjoining zone .
८
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३ ९ , २०१९ / पौष १३ - १९ , शके १९४० Schedule of Modifications for the Draft Development Plan , Shirdi ( Revised ) contd.
Name of Site 3
Sr. No. 1
Changes made by the Appointed Officer 4
Site 2
17 M-17
Alignment of 15 meters wide East- WestDevelopment Plan road on the Northern side of Site No. 31 Parking .
Alignment of 15 mt wide East - West Development Plan road on the Northern side of Site No. 31 Parking is reduced to 12 meters as shown in plan and land so released is included in adjoining zone.
18 M-18 Alignmentof 18 meters wide North South Development Plan road in Survey No. 164 Pt . and 165 pt .
Alignment of 18 meters wide North South DevelopmentPlan road in Survey No. 164 Pt . , and 165 Pt . is realigned as shown in plan as per sanctioned Development Plan and land so released is included in adjoining zone .
M-19
19
Site No. 32 Camping Ground
Site No. 32 Camping Ground is deleted and land thereunder included in Residential zone . While preparing layout under area so released ; 15 per cent amenity space should be proposed in addition to 10 per cent compulsory openspace . Such 15 per cent amenity space should be handed over to Planning Authority free of cost .
20 M-20
Site No. 36 Extension to Sewage Treatment Plant .
Western portion of the Site No. 36 Extension to Sewage Treatment Plant is deleted from reservation and included in Agriculture Zone as shown in plan .
21
M-21
Site No. 46 Solid Waste Management.
Land from Survey No. 72 of Site No. 46 Solid Waste Management is deleted and included inAgriculture Zone as shown in plan .
22 M-22
Site No. 42 Educational Complex Site No. 42 Educational Complex is deleted and land thereunder is included in Residential Zone . While preparing layout under area so released ; 15 per cent amenity space should be proposed in addition to 10 per cent compulsory open space . Such 15 per cent amenity space should be handed over to Planning Authority free of cost .
23 M-23
Site No. 48 Primary School and Playground.
Outof total area of land reserved for Site No. 48 (as per plan u/s 26 ) Primary School and Playground , an area about 1.65 Ha . is reserved for Site No. 48 Primary School and Playground and remaining area is deleted from reservation and included in Residential Zone more specifically shown on plan . While preparing layout under area so released ; 15 per cent amenity space should be proposed in addition to 10 per cent compulsory open space . Such 15 per cent amenity space should be handed over to Planning Authority free of cost.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३ ९ , २०१९ / पौष १३ - १ ९, शके १ ९४० Schedule of Modifications for the Draft Development Plan , Shirdi ( Revised ) contd.
Name of Site 3
Changes made by the Appointed Officer 4
Sr. No. 1
Site 2
24 M-24
Alignment of 45 meters Development Plan road in Survey No. 114 and Survey No. 122.
Alignment of 45 meters Development Plan road in Survey No. 114 and Survey No. 122 is realigned as shown in plan as per Sanctioned Development Plan and land so released is included in adjoining zone.
25 M-25 Alignment of 45 meters Development Plan road in Survey No. 127 and Survey No. 128 .
Alignment of 45 meters Development Plan road in Survey No. 127 and Survey No. 128 is realigned as shown in plan as per Sanctioned Development Plan and land so released is included in adjoining zone .
26 M-26
Site No. 54 Dharmashala
Site No. 54 Dharmashala is deleted and land thereunder is included in Residential Zone . While preparing layout under area so released ; 15 per cent amenity space should be proposed in addition to 10 per cent compulsory openspace . Such 15 per cent amenity space should be handed over to Planning Authority free of cost .
27 M-27
Site No. 56 Camping Ground
Area of land from Survey No. 164 and 168 Pt . of Site No. 56 Camping Ground is deleted from reservation and included in Residential Zone as shown in plan . While preparing layout under area so released ; 15 per cent amenity space should be proposed in addition to 10 per cent compulsory open space . Such 15 per cent amenity space should be handed over to Planning Authority free of cost .
Site No. 57 Public Latrine
28 M-28
Boundary of Site No. 57 Public Latrine is rearranged as shown in plan .
29 M-29 Site No. 58 Parking.
Boundary of Site No. 58 Parking is rearranged as shown in plan .
30 M-30 Alignment of 18 meters wide North- South Development Plan road from North - East corner of Weekly Bazar in Survey No. 56 to South- East corner of exiting Kondwada .
Alignment of 18 meters wide North- South Development Plan road from North - East corner of Weekly Bazar in Survey No. 56 to South- East corner of exiting Kondwada is reduced to 12 meters as shown in plan and land so released is included in adjoining zone.
AAKASH BAGUL ,
Appointed Officer, Development Plan of Shirdi ( R. ) and
Assistant Director, Town Planning , Ahmednagar.
Ahmednagar, 20th December 2018 .
१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३ ९ , २०१९ / पौष १३ - १९ , शके १९४० प्रादेशिक सहसंचालक ( साखर ) तथा सहनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून
कारखान्याचे नाव : कुकडी सहकारी साखर कारखाना लिमिटेड, पिंपळगावपिसा , तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर संपूर्ण पत्ता
: पिंपळगावपिसा, तालुका श्रीगोंदा , जिल्हा अहमदनगर
नोंदणी क्रमांक व दिनांक : एएनआर/ एसजीए/पीआरजी/(ए)/एस-८४, दिनांक १ ऑगस्ट १ ९९ ७
ज्ञापन
क्रमांक प्राससं/ नियमन/पोनिदु/कुकडी ससाका/१०४४/२०१८ . कुकडी सहकारी साखर कारखाना लिमिटेड, पिंपळगावपिसा, तालुका श्रीगोंदा , जिल्हा अहमदनगर या कारखान्याच्या दिनांक २८ सप्टेंबर २०१८ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील संमत ठराव क्रमांक ११ नुसार मी , संगिता रविंद्र डोंगरे , प्रादेशिक सहसंचालक ( साखर ) तथा सहनिबंधक , सहकारी संस्था, अहमदनगर, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १३ (२) व १५ तसेच त्याखालील नियम, १ ९ ६१ चे नियम १२ व १४ अन्वये प्राप्त अधिकारानुसार खालीलप्रमाणे आदेश देत आहे .
आदेश
उपविधी क्रमांक
उपविधी क्रमांक १
सोबतच्या पुरवणी क्रमांक ४ नुसार मंजूर
(पोट- नियम दुरुस्तीची शब्दयोजना पुढीलप्रमाणे)
पोट-नियम दुरुस्ती तक्ता नंबर ४
आदेश
पोट-नियम क्रमांक
दुरुस्तीनंतर अस्तित्वात येणारा पोट- नियम १
मंजूर
प्रास्ताविक या संस्थेचे नाव कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना लिमिटेड असे असून तिचा नोंदविलेला पत्ता मुक्काम पोस्ट पिंपळगावपिसा, तालुका श्रीगोंदा , जिल्हा अहमदनगर असा आहे . पत्त्यात होणारा बदल मा . प्रादेशिक सहसंचालक ( साखर) , अहमदनगर , मा . साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य , पुणे यांना बदल झाल्यापासून १४ दिवसांचे आत कळविण्यात येईल .
कारखान्याच्या दप्तरी असलेल्या उपविधी धारिकेस हे ज्ञापन जोडून ठेवण्यात येत आहे.
संगिता रविंद्र डोंगरे,
प्रादेशिक सहसंचालक ( साखर) तथा
सहनिबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर .
अहमदनगर , ३१ ऑक्टोबर २०१८ .
महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३ ९ , २०१९ / पौष १३ - १ ९, शके १ ९४० ११ अपर जिल्हादंडाधिकारी यांजकडून
(ख) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ विनापरवानगी बरोबर नेणे;
मुंबई पोलीस अधिनियम , १ ९ ५१ चे कलम ३७ ( १) (३) अन्वये
आदेश
(ग ) दगड किंवा क्षेपणास्त्रे , सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने घेऊन फिरणे अगर बाळगणे;
(घ) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा चित्राचे प्रतिकृतिक प्रदर्शन अगर दहन करणे ;
(ड) विनापरवाना सार्वजनिकरित्या समाजात तेढ व क्लेश निर्माण होईल अशा घोषणा करणे , गाणी म्हणणे , वाद्ये वाजविणे .
(च) सभ्यता अगर नीतिविरुद्ध असतील अशी किंवा शांतता धोक्यात आणतील अशी भाषणे करणे, हावभाव करणे अगर सोंग आणणे आणि तशी चिन्हे, फलक लावणे किंवा इतर कोणताही जिन्नस अगर वस्तू तयार करणे अगर त्याचा प्रसार करणे .
हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे , अशा व धार्मिक कार्यक्रमातील इसमांना आवश्यक असणारी शस्त्रे वापरण्यास , तसेच शीख समाजाचे व्यक्तींना कृपाण बाळगण्यास प्रतिबंध असणार नाही.
तसेच मुंबई पोलीस कायदा , कलम ३७ (३) अन्वये संबंधित तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीखेरीज पाच अगर पाचपेक्षा जास्त समावेश असलेल्या कोणत्याही मंडळीस ( जमावास ) किंवा मिरवणुकीस, मोर्चा , सभा इत्यादींकरिता मनाई करीत आहे .
सदरहू निर्बंध लग्नकार्य , धार्मिक कार्यक्रम , आठवडे बाजार अगर प्रेतयात्रेचे जमावास लागू होणार नाही. त्याचप्रमाणे हा आदेश पोलीस अधिकारी व कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी , कर्मचारी यांना सभा घेणेस अगर मिरवणुका काढणेस संबंधित तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांची रीतसर परवानगी घेतली आहे , अशा व्यक्तींना लागू राहणार नाहीत.
क्रमांक कक्ष-१/पीओएल-१/५८८८/२०१८ . ज्याअर्थी , पोलीस अधीक्षक, नाशिक ( ग्रामीण) यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक कक्ष-१४ / ३७ (१) (३)/६५०८/२०१८ , दिनांक ६ डिसेंबर २०१८ अन्वये नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यातील विविध आंदोलने , धार्मिक सण , उत्सव व राज्यातील कायदा व सुव्यवस्थाविषयक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशात कोठेही जातीय घटना घडल्यास , अशा घटनेच्या जिल्ह्यात प्रतिक्रिया उमटतात . विविध कामगार संघटनांचे गेटबंद व साखळी उपोषण चालू असते . हिंदू- मुस्लीम यांच्यात क्षुल्लक कारणांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता असते , त्यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही . राज्यात इंधनाची दरवाढ होत असल्याने विविध पक्ष , संघटनांकडून आंदोलने चालू आहेत . सध्या राज्यात मराठा तसेच धनगर समाजाचे आरक्षणासंदर्भात आंदोलन चालू आहे. तसेच मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गासाठी , शेतकऱ्यांना शेतीमालास भाव कमी मिळत असल्याने , त्याचे निषेधार्थ शेतकरी यांचेमार्फत मोर्चे , धरणे , रास्ता रोको , उपोषण करण्याची शक्यता नाकारता येत नाही . नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर हे अतिसंवेदनशील असून मनमाड, बागलाण , येवला, चांदवड व इगतपुरी ही ठिकाणे संवेदनशील आहेत . जिल्ह्यात विविध कंपन्या असून, कामगारांच्या विविध मागण्यांसाठी औद्योगिक कलह निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण नाशिक ( ग्रामीण ) जिल्ह्यात दिनांक १४ डिसेंबर २०१८ चे ००.०० ते दिनांक २८ डिसेंबर २०१८ चे २४.०० वाजेपावेतो मुंबई पोलीस कायदा, १ ९ ५१ चे कलम ३७ (१) (३) चे आदेश लागू करण्याची पोलीस अधीक्षक , नाशिक ( ग्रामीण ) यांनी विनंती केली आहे .
सदरचा आदेश दिनांक १४ डिसेंबर २०१८ चे ००.०० वाजेपासून ते दिनांक २८ डिसेंबर २०१८ चे २४.०० वाजेपावेतो संपूर्ण नाशिक जिल्ह्यात (पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची हद्द वगळून) अंमलात राहील.
सदरचा आदेश आज दिनांक १२ डिसेंबर २०१८ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी दिला असे.
वरील अहवालावरून माझी खात्री झाल्याने, खालील दर्शविलेल्या कालावधीत नाशिक ( ग्रामीण ) जिल्ह्यात ( मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची हद्द वगळून) पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यास मदत व्हावी व शांतता राहावी म्हणून मी , रामदास खेडकर , अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक , मला मुंबई पोलीस कायदा , १ ९ ५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून खालील कृत्ये करण्यास मनाई करीत आहे.
रामदास खेडकर ,
अपर जिल्हादंडाधिकारी,
नाशिक.
नाशिक, १२ डिसेंबर २०१८ .
(क) शस्त्रे, सोटे, तलवारी , भाले , दंडे, बंदुका, सुरे किंवा शारीरिक दुखापत करण्यासाठी वापरात येतील किंवा प्राणघातक असतील , अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर घेऊन फिरणे अगर बाळगणे;
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३ ९ , २०१९ / पौष १३ - १९ , शके १९४०
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून
वाचावे. - ( १ ) दिवाणी नियम पुस्तिका , भाग-१ , परिच्छेद ६ ९ ८ ते ७०२ .
( २ ) मा . उच्च न्यायालय , मुंबई , पत्र क्रमांक एक्स-०२०२/ २००१ , दिनांक १८ डिसेंबर २०००.
(३ ) मा. उच्च न्यायालय , मुंबई, पत्र क्रमांक एक्स (जन.) - ०२०२/२०१८/१५०७ , दिनांक १७ डिसेंबर २०१८ .
अधिसूचना
क्रमांक बी-०८/आस्था/३५/०६/सन २०१८. दिवाणी नियम पुस्तिका , १ ९ ८६ मधील परिच्छेद क्रमांक ६ ९९ (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश , अहमदनगर हे सन २०१ ९ सालाकरिता अहमदनगर जिल्ह्यातील सर्व न्यायालये व त्यांचे कार्यालयांकरिता खालीलप्रमाणे सुट्ट्या जाहीर करीत आहेत.
सन २०१ ९ सालातील सुट्ट्यांची यादी
अ. क्र.
सुट्टीचे नाव
१
२
छत्रपती शिवाजी महाराज जयंती १
दिनांक
वार ४
३
शेरा ५
मंगळवार
सार्वजनिक १ ९ फेब्रुवारी २०१ ९
महाशिवरात्री
२
धुलिवंदन
३
सोमवार
सार्वजनिक ४ मार्च २०१९
सार्वजनिक २१ मार्च २०१९
४
गुरुवार
शनिवार
सार्वजनिक ६ एप्रिल २०१९
गुढीपाडवा
५
स्थानिक १९ एप्रिल २०१९
गुडफ्रायडे
६
महाराष्ट्र दिन
७
बुद्ध पौर्णिमा
रमजान ईद
८
बकरी ईद
शुक्रवार
सार्वजनिक १ मे २०१९
बुधवार
शनिवार
सार्वजनिक १८ मे २०१९
सार्वजनिक
बुधवार
५ जून २०१९
सोमवार
सार्वजनिक १२ ऑगस्ट २०१ ९
९
स्वातंत्र्य दिन
१०
सार्वजनिक १५ ऑगस्ट २०१ ९
११
श्रीकृष्ण जयंती
गुरुवार
स्थानिक २३ ऑगस्ट २०१ ९
पोळा
१२
शुक्रवार
सार्वजनिक ३० ऑगस्ट २०१ ९
१३
शुक्रवार
सोमवार
सार्वजनिक २ सप्टेंबर २०१ ९
श्री गणेश चतुर्थी
१४
स्थानिक ६ सप्टेंबर २०१ ९
ज्येष्ठागौरी पूजन
मोहरम
१५
शुक्रवार
मंगळवार
सार्वजनिक १० सप्टेंबर २०१ ९
१६
स्थानिक १२ सप्टेंबर २०१ ९
अनंत चतुर्दशी
१७
महात्मा गांधी जयंती
गुरुवार
सार्वजनिक २ऑक्टोबर २०१ ९
दसरा
१८
बुधवार
मंगळवार
सार्वजनिक ८ऑक्टोबर २०१ ९
१९
दीपावली (धनत्रयोदशी)
स्थानिक २५ ऑक्टोबर २०१ ९
२०
शुक्रवार
सोमवार
सार्वजनिक २८ ऑक्टोबर २०१ ९
दीपावली ( बलिप्रतिपदा) २१
दीपावली (भाऊबीज)
मंगळवार
स्थानिक २९ ऑक्टोबर २०१९ १३ महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३ ९ , २०१९ / पौष १३ - १ ९, शके १ ९४०
सन २०१ ९ सालातील सुट्ट्यांची यादी
चालू
अ. क्र .
सुट्टीचे नाव
१
२
दीपावली
२२
दिनांक
वार
शेरा
४
३
५
स्थानिक
बुधवार
३० ऑक्टोबर २०१ ९
दीपावली
२३
अतिरिक्त ३१ ऑक्टोबर २०१ ९
ख्रिसमस
२४
गुरुवार
स्थानिक २५ डिसेंबर २०१ ९
बुधवार
खालील सण सुट्टीच्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या/ चौथ्या शनिवारी व रविवारी येत असल्यामुळे स्वतंत्रपणे सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही.
अ. क्र.
सुट्टीचेनाव
१
२
प्रजासत्ताक दिन
१
दिनांक
शेरा
वार ४
३
५
शनिवार
सार्वजनिक २६ जानेवारी २०१ ९
श्रीराम नवमी
२
शनिवार
सार्वजनिक १३ एप्रिल २०१९
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ३
रविवार
सार्वजनिक १४ एप्रिल २०१९
४
रविवार
सार्वजनिक २७ ऑक्टोबर २०१ ९
दीपावली अमावस्या (लक्ष्मीपूजन) ईद-ए -मिलाद
५
सार्वजनिक
रविवार
१० नोव्हेंबर २०१ ९
भाग दोन
उन्हाळी सुट्टी
( SUMMER VACATION )
गुरुवार , दिनांक २ मे २०१ ९ ते रविवार दिनांक २ जून २०१ ९ पर्यंत ( दोन्ही दिवस धरून)
हिवाळी सुट्टी
( WINTER VACATION )
सोमवार , दिनांक २३ डिसेंबर २०१ ९ ते रविवार , दिनांक २ ९ डिसेंबर २०१ ९ पर्यंत ( दोन्ही दिवस धरून)
टीप.- ( १ ) अहमदनगर जिल्ह्यातील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालये व त्यांची कार्यालये महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बंद राहतील .
(२ ) रविवार व इतर सार्वजनिक सुट्ट्या वगळून अहमदनगर जिल्ह्यातील सर्व फौजदारी न्यायालये व त्यांची कार्यालये उन्हाळी व हिवाळी सुट्टीत चालू राहतील .
(३ ) मा . उच्च न्यायालय , मुंबई यांचे दिनांक १६ डिसेंबर २०१० रोजीचे पत्रातील सूचनेप्रमाणे सदर सुट्ट्यांमध्ये मा. शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार व मा . सर्वोच्च न्यायालयाचे याचिका अर्ज क्रमांक १०२२/ ८ ९ मधील निर्देशान्वये वर नमूद केलेल्या सुट्ट्यांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे.
अहमदनगर , १८ डिसेंबर २०१८ .
रमेश आर. देशमुख,
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ,
अहमदनगर .
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३ ९ , २०१९ / पौष १३ - १९ , शके १९४०
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून
सन २०१ ९ सालच्या सुट्ट्यांची यादी
क्रमांक आस्था/६० /९३८३/ सन २०१८. दिवाणी नियम पुस्तिका भाग-१ , १ ९ ८६ च्या परिच्छेद ६ ९९ आणि ७०२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश , नाशिक सन २०१ ९ या वर्षासाठी नाशिक जिल्हा न्यायिक विभागाकरिता खालीलप्रमाणे सुट्ट्या जाहीर करीत आहेत.
(१ )सर्व रविवार
(२) सर्व दुसरे व चौथे शनिवार अ. क्र.
सुट्टीचे नाव १
२
छत्रपती शिवाजी महाराज जयंती १
महाशिवरात्री
२
३ धुलिवंदन
४ गुढीपाडवा
५ महावीर जयंती
६ गुड फ्रायडे
७ महाराष्ट्र दिन
८ बुद्ध पौर्णिमा
रमजान ईद
९
१० बकरी ईद
स्वातंत्र्य दिन
११
पोळा
१२
१३ श्री गणेश चतुर्थी
१४ गौरी पूजन
१५ मोहरम (ताजिया)
१६ अनंत चतुर्दशी
१७ महात्मा गांधी जयंती
दसरा
१८
१९ दीपावली (अतिरिक्त)
२० दीपावली ( बलिप्रतिपदा)
२१ दीपावली (अतिरिक्त)
२२ दीपावली ( अतिरिक्त)
२३ दीपावली ( अतिरिक्त)
नाताळ
२४
अनुसूची
दिनांक दिवस / वार
४
३
मंगळवार
१९ फेब्रुवारी २०१९ सोमवार
४ मार्च २०१९
२१ मार्च २०१९ गुरुवार
शनिवार
६ एप्रिल २०१ ९ बुधवार
१७ एप्रिल २०१९
१९ एप्रिल २०१ ९ शुक्रवार
१ मे २०१९ बुधवार
शनिवार
१८ मे २०१९ बुधवार
५ जून २०१९ सोमवार
१२ ऑगस्ट २०१ ९
१५ ऑगस्ट २०१ ९ गुरुवार
३० ऑगस्ट २०१ ९ शुक्रवार
सोमवार
२ सप्टेंबर २०१ ९
६ सप्टेंबर २०१ ९ शुक्रवार
मंगळवार
१० सप्टेंबर २०१ ९
१२ सप्टेंबर २०१ ९ गुरुवार
२ ऑक्टोबर २०१ ९ बुधवार
मंगळवार
८ ऑक्टोबर २०१ ९
२५ ऑक्टोबर २०१९ शुक्रवार
सोमवार
२८ ऑक्टोबर २०१ ९ मंगळवार
२ ९ ऑक्टोबर २०१ ९
३० ऑक्टोबर २०१ ९ बुधवार
गुरुवार
३१ ऑक्टोबर २०१ ९
२५ डिसेंबर २०१ ९ बुधवार १५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३ ९ , २०१९ / पौष १३ - १ ९, शके १ ९४०
उन्हाळी सुट्टी
गुरुवार , दिनांक २ मे २०१ ९ ते रविवार दिनांक २ जून २०१ ९ ( दोन्ही दिवस धरून )
हिवाळी सुट्टी
सोमवार , दिनांक २३ डिसेंबर २०१ ९ ते रविवार, दिनांक २ ९ डिसेंबर २०१ ९ ( दोन्ही दिवस धरून )
कार्यालये उन्हाळी व हिवाळी सुट्टीत (Summer and Winter Vacation ) चालू राहतील.
खालील सुट्ट्यांचे दिवशी दुसरा / चौथा शनिवार येत असल्यामुळे सदर दिवशी सुट्टी दर्शविलेली नाही .
१. गणराज्य दिन
चौथा शनिवार
२. श्रीराम नवमी
२६ जानेवारी २०१ ९
१३ एप्रिल २०१९ दुसरा शनिवार
चौथा शनिवार
३. गोकुळअष्टमी
२४ ऑगस्ट २०१९
खालील सुट्ट्यांचे दिवशी रविवार येत असल्यामुळे सदर दिवशी सुट्टी दर्शविलेली नाही.
१. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
२. दीपावली अमावस्या
३. ईद -ए-मिलाद
रविवार
१४ एप्रिल २०१ ९ रविवार
२७ ऑक्टोबर २०१ ९ रविवार
१० नोव्हेंबर २०१ ९ टीप. - ( १ ) नामदार उच्च न्यायालय , मुंबई यांचे पत्र क्रमांक एक्स ( जनरल )/२०२/२००७ , दिनांक १४ डिसेंबर २००७ मधील सूचनेप्रमाणे व सर्वोच्च न्यायालय , दिल्ली याचिका क्रमांक १०२२/८ ९ अन्वये व शेट्टी आयोगाने शिफारस केल्याप्रमाणे सदर सुट्ट्यांचे यादीत , उन्हाळी व हिवाळी सुट्ट्यांमध्ये नजीकच्या भविष्यकाळात बदल होण्याची शक्यता आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
(२ ) सन २०१९ या वर्षात सर्व प्रकारच्या सुट्ट्या वगळता २३७ कार्यालयीन कामकाजाचे दिवस आहेत.
नाशिक, २१ डिसेंबर २०१८ .
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून
आदेश
क्रमांक बी-२/४४५०/सन २०१८. श्री . अतुल भानुदास जाधव , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग, शिरपूर यांना दिनांक १० सप्टेंबर २०१८ ते दिनांक १५ सप्टेंबर २०१८ पावेतो अशी एकूण ६ दिवसांची अर्जित रजा दिनांक ८ सप्टेंबर २०१८ ( दुसरा शनिवार ) , दिनांक ९ सप्टेंबर २०१८ ( रविवार) व दिनांक १६ सप्टेंबर २०१८ ( रविवार ) रोजीच्या सुट्ट्यांना जोडून याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक ७ सप्टेंबर २०१८ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १७ सप्टेंबर २०१८ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
सुर्यकांत सो. शिंदे,
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ,
नाशिक.
रजेवरून परत आल्यावर श्री. अतुल भानुदास जाधव यांना सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग , शिरपूर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , शिरपूर या पदी पर्यायी इसमाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्री. अतुल भानुदास जाधव, सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग, शिरपूर यांचे उपरोक्त अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे पदाचा रिमांडचे कामकाजासह अतिरिक्त कार्यभार श्री. संभाजी सोपानराव देशमुख , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग , शिरपूर यांचेकडेस सोपविण्यात येत आहे.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३ ९ , २०१९ / पौष १३ - १९ , शके १९४० महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन) नियम , १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप -२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री . अतुल भानुदास जाधव , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , शिरपूर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते , तर ते सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग, शिरपूर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते .
धुळे , ७ सप्टेंबर २०१८ .
आदेश
क्रमांक बी-२/४४७४/सन २०१८. श्री. शैलेश रंगनाथ उगले , जिल्हा न्यायाधीश -२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे यांना दिनांक १० सप्टेंबर २०१८ ते दिनांक १२ सप्टेंबर २०१८ पावेतो अशी एकूण ३ दिवसांची अर्जित रजा दिनांक १३ सप्टेंबर २०१८ ( श्री गणेश चतुर्थी) रोजीचे सुट्टीस जोडून याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री . शैलेश रंगनाथ उगले यांना जिल्हा न्यायाधीश -२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश -२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , धुळे या पदी पर्यायी इसमाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्री. शैलेश रंगनाथ उगले, जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , धुळे यांचे उपरोक्त अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. वाय. ए. राणे , जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , धुळे यांचेकडेस सोपविण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन) नियम , १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री . शैलेश रंगनाथ उगले , जिल्हा न्यायाधीश -२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , धुळे हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते जिल्हा न्यायाधीश -२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
धुळे , १० सप्टेंबर २०१८.
आदेश
क्रमांक बी-२/४५३ ९/ सन २०१८. श्री . राजेश त्रिंबकराव नागरे , दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , धुळे यांना दिनांक २४ सप्टेंबर २०१८ ते दिनांक २६ सप्टेंबर २०१८ पावेतो अशी एकूण ३ दिवसांची अर्जित रजा दिनांक २२ सप्टेंबर २०१८ ( चौथा शनिवार) व दिनांक २३ सप्टेंबर २०१८ ( रविवार ) रोजीचे सुट्ट्यांना जोडून याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक २१ सप्टेंबर २०१८ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते मुख्यालयास परत येईपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री. राजेश त्रिंबकराव नागरे यांना दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर , धुळे या पदी पर्यायी इसमाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्री. राजेश त्रिंबकराव नागरे, दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , धुळे यांचे उपरोक्त अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती करूणा रामकुमार राजपूत , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी , धुळे यांचेकडेस सोपविण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम , १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. राजेश त्रिंबकराव नागरे, दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , धुळे हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते .
श्याम छगनलाल चांडक ,
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ,
धुळे .
धुळे , १२ सप्टेंबर २०१८ .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA .