RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ५, अंक ४(३)] बुधवार, जानेवारी ९, २०१९/पौष १९, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक १०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय,
मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ जानेवारी २०१९
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक न्यायाप्र-२२१३/(१४१/१७)/तांशि-२.—भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३०९ खालील परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून ; आणि या संदर्भात सध्या अस्तित्वात असलेले सर्व नियम, आदेश आणि अनुदेश यांचे अधिक्रमण करून, महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय व अशासकीय अनुदानित संस्थांमधील गट-क संवर्गातील " निदेशक [प्रयोगशाळा सहाय्यक (तांत्रिक)] " या पदांवरील सेवा प्रवेशाचे विनियम करणारे पुढील नियम करीत आहेत :—
१. या नियमांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय व अशासकीय अनुदानित संस्थांमधील निदेशक [प्रयोगशाळा सहाय्यक (तांत्रिक)] (सेवा प्रवेश) नियम, २०१९ असे म्हणावे.
२. या नियमांमध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,—
(क) " नियुक्ती प्राधिकारी " याचा अर्थ निदेशक [प्रयोगशाळा सहाय्यक (तांत्रिक)] या पदांवर नेमणुका करण्यास जो सक्षम आहे असे संबंधित तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाचे सहसंचालक ;
(ख) " मंडळ " याचा अर्थ महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण कायदा, १९९७ (सन १९९७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३८) नुसार स्थापित महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, असा आहे ;
(ग) " परिषद " याचा अर्थ अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद कायदा, १९८७ नुसार स्थापित अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद असा आहे ;
(घ) " विभाग " याचा अर्थ महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग, असा आहे ;
(१)
भाग चार--अ--१०-१महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी ९, २०१९/पौष १९, शके १९४० २ (च) " पदविका " याचा अर्थ, परिषदेने मान्यता दिलेली मंडळाची यंत्र अभियांत्रिकी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकी किंवा अणुविद्युत अभियांत्रिकी किंवा अणुविद्युत व दूरसंचरण अभियांत्रिकी किंवा अणुविद्युत व संचरण अभियांत्रिकी किंवा संगणक अभियांत्रिकी किंवा संगणक तंत्रज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी किंवा रसायन अभियांत्रिकी किंवा रसायन तंत्रज्ञान किंवा उपकरणीकरण अभियांत्रिकी किंवा औद्योगिक अणुविद्युत अभियांत्रिकी किंवा स्वयंचल अभियांत्रिकी यापैकी कोणत्याही विद्याशाखेतील पदविका परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, असा आहे आणि त्यामध्ये मंडळाने त्यास समतुल्य म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही पदविका याचा समावेश होतो ;
(छ) " संचालनालय " याचा अर्थ तंत्रशिक्षण संचालनालय, असा आहे ; (ज) " शासन " याचा अर्थ महाराष्ट्र शासन, असा आहे ; (झ) " शासकीय संस्था " याचा अर्थ तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नियंत्रणाखालील, शासनाद्वारे स्थापित व संचालित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये, तंत्रनिकेतने, प्रिंटींग टेक्नॉलॉजी पदविका संस्था आणि हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरींग टेक्नॉलाजी पदविका संस्था असा आहे ;
(ट) " उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा " याचा अर्थ महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, १९६५ (१९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ४१) अन्वये गठीत केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा, असा आहे आणि त्यामध्ये, शासनाने त्यास समतुल्य म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही परीक्षा याचा समावेश होतो ;
(ठ) " अशासकीय अनुदानित संस्था " याचा अर्थ तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नियंत्रणाखालील अशासकीय अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालये, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये, वास्तुशास्त्र महाविद्यालये, तंत्रनिकेतने असा आहे;
(ड) " प्रादेशिक विभाग " याचा अर्थ तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नियंत्रणाखालील प्रादेशिक विभाग असा आहे.
३. निदेशक [प्रयोगशाळा सहाय्यक (तांत्रिक)] पदावरील नेमणुका पुढीलप्रमाणे कोणत्याही मार्गाने करता येतील :—
(क) (एक) प्रयोगशाळा सहाय्यक (अतांत्रिक) पद धारण करणाया व त्या पदावर ५ वर्षापेक्षा कमी नाही इतकी नियमित सेवा पूर्ण केलेल्या ; आणि
(दोन) ज्यांनी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा भौतिकशास्त्र व रसायन शास्त्र या विषयांसह उत्तीर्ण केली आहे ;
अशा व्यक्तींमधून ज्येष्ठता अधीन पात्रता या निकषावर योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने ;
किंवा
(ख) (एक) एकोणीस वर्षापेक्षा कमी वय नसलेल्या आणि अडतीस वर्षापेक्षा जास्त वय नसलेल्या (आरक्षित गटातील उमेदवारासाठी पाच वर्षापयर्ंत उच्च वयोमर्यादा शिथिल केली जाऊ शकते) ; आणि
(दोन) पदविका धारण करणाया ; आणि (तीन) शासकीय किंवा निमशासकीय किंवा खाजगी, संस्था किंवा आस्थापना, किंवा शासन अंगीकृत महामंडळामधील प्रयोगशाळा सहाय्यक किंवा साईट सुपरवायजर पदावर, किंवा त्याने धारण केलेल्या पदविकेच्या विद्याशाखेशी संबंधित मॅन्युफॅक्चरिंग किंवा र्सव्िहसींग किंवा मेंटेनन्स किंवा सीएनसी मशीन हाताळण्याचा रोजंदारी किंवा कार्यव्ययी किंवा करार पद्धतीवर किंवा मानधन इत्यादी स्वरुपात पूर्ण वेळ कामाचा एक वर्षाचा अनुभव धारण करणाया ; उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे करण्यात येईल.
४. नियम ३ मध्ये नमूद केलेल्या पदावर नामनिर्देशनाने व पदोन्नतीने नियुक्ती ७५ : २५ या प्रमाणात राहील.
परंतु असे की, पदोन्नतीने नियुक्तीसाठी विहित अर्हता धारण करणारे उमेदवार उपलब्ध नसल्यास, नियुक्ती प्राधिकायांना पदोन्नतीचे प्रमाण शिथिल करून उमेदवारांची नामनिर्देशनाने नियुक्ती करता येईल.
५. नियम ३ मध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तीने, याबाबतीत करण्यांत आलेल्या नियमानुसार, हिंदी व मराठी भाषा परीक्षा अगोदरच उत्तीर्ण केलेल्या नसतील किंवा त्या परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तिला सूट मिळालेली नसेल, तर तिला सदर परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक राहील.
६. नियम ३ मध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तीने, महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेले संगणक संचलन प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.
७. नियम ३ मध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्त केलेल्या व्यक्ती, नियुक्त केलेल्या प्रादेशिक विभागातंर्गत कोठेही बदलीस पात्र ठरेल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सतीश ज. तिडके, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी ९, २०१९/पौष १९, शके १९४० ३HIGHER AND TECHNICAL EDUCATION DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, dated the 9th January, 2019
NOTIFICATION
CONSTITUTION OF INDIA
No. NyaYaPra-2213/ (141/17)/TE-2.—In exercise of the powers conferred by the proviso to article 309 of the Constitution of India and in the supersession of all the existing rules, orders or instruments issued in this behalf, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules regulating recruitment to the post of "Instructor (Laboratory Assistant (Technical))" in Group-C in the Government and Non-Government Aided Institutes under the control of Director of Technical Education under Higher and Technical Education Department of Government of Maharashtra namely :—
1. These rules may be called the Instructor (Laboratory Assistant (Technical)) Group-C in the Government and Non-Government Aided Institutes under the control of Director of Technical Education (Recruitment) Rules, 2018.
2. In these rules, unless the context requires otherwise,—
(a) "Appointing Authority" in relation to the post of Instructor (Laboratory Assistant (Technical)), means the Joint Director of Technical Education of concern regional Directorate ;
(b) "Board" means Maharashtra State Board of Technical Education established under the Maharashtra State Board of Technical Education Act, 1997(Mah. XXXVIII of 1997) ;
(c) "Council" means All India Council for Technical Education established under the All India Council for Technical Education Act, 1987 ;
(d) "Department" means the Higher and Technical Education Department of the Government of Maharashtra ;
(e) "Diploma" means passing certificate of diploma examination in Mechanical Engineering or Civil Engineering or Electrical Engineering or Electronics Engineering or Electronics and Telecommunication Engineering or Electronics and Communication Engineering or Computer Engineering or Computer technology or Information technology or Chemical Engineering or Chemical Technology or Instrumentation Engineering or Industrial Electronics or Automobile Engineering of Board, and it includes any other diploma examination declared by Board to be equivalent thereto;
(f) "Directorate" means the Directorate of Technical Education ;
(g) "Government" means the Government of Maharashtra ;
(h) "Government Institute" means Engineering Colleges, Pharmacy Colleges, Polytechnics, Printing Technology Diploma Institutes and Hotel Management and Catering Technology Institutes established and Governed by Government of Maharashtra through Directorate of Technical Education ;
(i) "Higher Secondary School Certificate Examination" means the Higher Secondary School Certificate Examination conducted by a Divisional Board constituted under the Maharashtra State Secondary and Higher Secondary Education Board Act, 1965 (Mah.XLI of 1965) and includes any other examination declared by Government to be equivalent thereto.
(j) "Non-Government Aided Institute" means Engineering Colleges, Pharmacy Colleges, Architecture Colleges and Polytechnics aided by Government of Maharashtra through Directorate of Technical Education ;
(k) "Region" means the regions under the control of Directorate of Technical Education.
3. Appointment to the post of Instructor [Laboratory Assistant (Technical)] shall be made either,- (a) by promotion of a suitable person with due regard to seniority subject to fitness from amongst the persons :—
(i) holding the post of Laboratory Assistant having not less than five years of regular service on that post; andमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी ९, २०१९/पौष १९, शके १९४० ४ (ii) have passed Higher Secondary School Certificate Examination with physics and chemistry subjects
or
(b) by nomination from amongst the candidates who,—
(i) are not less than nineteen years of age and not more than thirty eight years of age provided that the upper age limit may be relaxed up to five years for the candidates of reserved category; and (ii) possess diploma; and
(iii) possess experience as Laboratory Assistant or Site Supervisor or Manufacturing or servicing or maintenance or operating Computer Numerical Control machine in the field relevant to the branch of Diploma held by him of not less than one year in Government or Semi Government or Private, Institutes or establishments or Government Corporations on daily wages or work charges or contract system or honorarium basis.
4. Appointment to the post mentioned in rule 3 will be made by nomination and promotion in the ratio of 75: 25 ;
Provided that, if suitable candidates possessing qualification mentioned for promotion are not available, the Appointing Authority may relax the ratio for appointment by promotion and may appoint the candidate by nomination.
5. A person appointed to the post mentioned in rule 3 shall be required to pass examinations in Hindi and Marathi languages according to rules made in that behalf, unless he has already passed, or has been exempted from passing those examinations.
6. A person appointed to the post mentioned in rule 3 shall be required to possess a certificate of computer operating prescribed by the Directorate of Information and Technology of Government of Maharashtra from time to time.
7. A person appointed to the post mentioned in rule 3 shall be liable to transfer anywhere within the appointed region.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SATISH J. TIDKE,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.