Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील सातारा नगरपरिषदेतील नामनिर्देशित सदस्याचे नाव व वडूज नगरपंचायतीच्या अध्यक्षांचे नाव राजपत्रात प्रसिद्ध करणेबाबत.

Published 10 January 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-01-10.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ८ , अंक - २ ]

गुरुवार , जानेवारी १० , २०१९ / पौष २० , शके १९४०

[ पृष्ठे २

असाधारण क्रमांक २

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचा : (१ ) पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा , सातारा नगरपरिषद, सातारा यांचेकडील पत्र जा. क्रमांक सानप/२२/२०१८ , दिनांक ६ डिसेंबर २०१८ .

( २ ) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६ .

आदेश

क्रमांक साशा/नपा/(लोणंद न.पं.नि.स. निवडणूक)/४३१४/२०१८ . ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील सातारा नगरपरिषदेच्या दिनांक ४ डिसेंबर २०१८ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये नामनिर्देशित करण्यात आलेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार मी , श्वेता सिंघल , जिल्हाधिकारी , सातारा , सातारा नगरपरिषदेमधील नामनिर्देशित सदस्यांचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.

परिशिष्ट

अ. क्र.

नगरपरिषदेचे नाव

निवड झालेल्या पदाचे नाव १

४ २

निवडून आलेल्या सदस्याचे नाव ३

१

श्री. अविनाश नानासाहेब कदम

नामनिर्देशित सदस्य सातारा नगरपरिषद, सातारा

श्वेता सिंघल,

जिल्हाधिकारी , सातारा.

सातारा , १२ डिसेंबर २०१८ .

वाचा : ( १ ) पीठासन अधिकारी वडूज नगरपंचायत अध्यक्ष निवडणूक २०१८ तथा उपविभागीय अधिकारी , माण- खटाव उपविभाग , दहिवडी यांचेकडील पत्र जा. क्रमांक एम/ कावि-४०००२ /२०१८ , दिनांक १६ नोव्हेंबर २०१८ रोजीचे पत्र व इतिवृत्त व तसेच पत्र जा. क्रमांक वनपं/४०२६/२०१८ , दिनांक १ ९ नोव्हेंबर २०१८ .

(२ ) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती ( अध्यक्षपदाची निवडणूक) ( सुधारणा) नियम , २०० ९ चा नियम क्रमांक ७ (क) .

(१)

एच-५५३ , भाग एक-अ (असा. ) (पु.वि.पु.) - २ २

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक- अ पुणे विभागीय पुरवणी, १० जानेवारी २०१ ९ / पौष २० , शके १ ९४०

आदेश

क्रमांक साशा/नपा/ (वडूज न.पं.अ. निवडणूक)/४३१६/२०१८ .-- ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील वडूज नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिनांक १६ नोव्हेंबर २०१८ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये अध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) ( सुधारणा) नियम , २०० ९ चा नियम क्रमांक ७ (क) अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे . त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती ( अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम , २०० ९ चा नियम क्रमांक ७ (क) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, श्वेता सिंघल , जिल्हाधिकारी , सातारा, वडूज नगरपंचायतीच्या अध्यक्षांचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.

परिशिष्ट

नगरपंचायतीचे नाव

निवड झालेल्या पदाचे नाव अ. क्र.

१

२

१

४ अध्यक्ष

निवडून आलेल्या सदस्याचे नाव ३ श्री. गुरव महेश गणेश

वडूज नगरपंचायत , वडूज

श्वेता सिंघल,

जिल्हाधिकारी , सातारा .

सातारा , १२ डिसेंबर २०१८ .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 January 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-01-10.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-01-10.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.