महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग
वर्ष ५, अंक ४] शुक्रवार, जानेवारी ११, २०१९/पौष २१, शके १९४० [ पृष्ठे २, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक ५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि
स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात
आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ जानेवारी २०१९
संदर्भ : महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) च्या कलम ११ अन्वये आयोगास प्रदान करण्यात आलेले अधिकार.
आदेश
क्रमांक रानिआ/नप-२०१९/प्र.क्र. १/का. ६.----उक्त संदर्भीय अधिनियमाद्वारे प्राप्त अधिकारांचा वापर करून क्रमांक रानिआ/जिपपंस. २०१८/प्र.क्र. १८/का-७, दिनांक २७ जुलै २०१८ च्या आदेशान्वये माहे नोव्हेंबर, २०१८ ते फेब्रुवारी, २०१९ या कालावधीत होणाया नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक/पोट निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी दिनांक १ सप्टेंबर २०१८ या दिवशी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार याद्या वापरण्यासंदर्भात अधिसूचित करण्यात आले होते.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, जानेवारी ११, २०१९/पौष २१, शके १९४० २३. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, समक्रमांकाच्या दिनांक २७ जुलै २०१८ रोजीच्या आदेशान्वये अधिसूचित केलेली अधिसूचना अंशत: सुधारित करून सिल्लोड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता मंगळवार, दिनांक १ जानेवारी २०१९ हा अर्हता दिनांक ग्रा धरून दिनांक ११ जानेवारी २०१९ रोजी अस्तित्वात येणारी महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी, या अधिनियमांतर्गत प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येईल, असे अधिसूचित करण्यात येत आहे.
मा. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार,
किरण कुरुंदकर, सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र.