Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

पुणे जिल्ह्यातील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती.

Published 11 January 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-01-11.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL 2012/47976

www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ८ , अंक - १ ]

शुक्रवार , जानेवारी ११ , २०१९ / पौष २१ , शके १ ९ ४०

[ पृष्ठे २

असाधारण क्रमांक १

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

प्रपत्र "ड"

विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका

संदर्भ : ( १ ) शासन निर्णय क्रमांक सा.प्र.वि.क्र. विकाअ-२००७/४४०/प्र. क्र. १७४/२००७/५ , दिनांक २५ जुलै २००७ .

(२ ) शासन शुद्धीपत्रक, सामान्य प्रशासन विभाग , क्रमांक विकाअ-२००७/प्र. क्र. ३८९ /५ , दिनांक १५ जानेवारी २००८ .

(३ ) शासन निर्णय , सामान्य प्रशासन विभाग , क्रमांक न्यायप्र-२०० ९/प्र . क्र. १७४/५ , दिनांक २२ एप्रिल २०० ९ .

(४ ) शासन निर्णय , सामान्य प्रशासन विभाग क्रमांक विकाअ-२००८/प्र . क्र. २७६/५ , दिनांक २४ जुलै २००८ .

(५ ) शासन परिपत्रक क्रमांक विकाअ-२०० ९/प्र. क्र. २७६/५ , दिनांक २४ जुलै २०० ९ .

( ६ ) शासन निर्णय क्रमांक विकाअ-२०१०/१५५०/प्र. क्र. ४८७/५ , दिनांक ३१ जानेवारी २०१० .

( ७) शासन निर्णय , सामान्य प्रशासन विभाग क्रमांक विकाअ-१११५/प्र. क्र. ८८/५ , दिनांक ३१ जानेवारी २०१५ .

( ८ ) कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन , पुणे यांचेकडील पत्र क्रमांक विकाअ-१११६/८८/प्र. क्र. ५३/का. ५ , दिनांक २० जून २०१६ रोजीचे पत्र.

क्रमांक पगम/एसआर-१/२०१ ९.-- संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मी, नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे , जिल्हा पुणे आता सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती ही त्यांच्या वयाच्या ७० वर्षांपर्यंत चालू राहील व वयाच्या ७० वर्षांनंतर त्यांना अनर्ह ठरविण्यात येईल अथवा पुढील आदेश होईपर्यंत अस्तित्वात राहील. तसेच राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधीवरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही , कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील. ही मुदत संपताच किंवा ती त्यापूर्वी संपुष्टात आणण्यात आल्यास विशेष कार्यकारी अधिकारी राहील. ही मुदत संपताच किंवा ती त्यापूर्वी संपुष्टात आणण्यात आल्यास विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित पोलीस ठाणे किंवा जिल्हाधिकारी, पुणे यांचे कार्यालयापुढे तत्काळ परत करणेची प्राथमिक जबाबदारी सर्वस्वी संबंधित विशेष कार्यकारी अधिकाऱ्याची राहील.

२. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील .

(एक) साक्षांकनाचे काम

विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ " साक्षांकनाचे " काम करतील. मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू

(१)

एच-५५४, भाग एक-असा. (पु.वि.पु.) - १ २

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक असाधारण-- पुणे विभागीय पुरवणी, ११ जानेवारी , २०१९ / पौष २१ , शके १९ ४०

नये. तसेच परिशिष्ट " ५ " मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतींवर न चुकता दिनांकासहित साक्षांकन करावे . मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये . वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर " सत्य प्रत " म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामांकरिता " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील . अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल.

(दोन ) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी " असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला कोणतेही मानधन अथवा वेतन/ भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत .

(तीन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर, दुकानावर , कार्यालयावर स्वतःच्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा. त्यांच्या नियुक्तीबाबत कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत . तथापि, त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये.

(चार) "ओळख परेड " तसेच " मृत्युपूर्व जबानी " यासाठी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये.

(पाच) " उत्पन्नाचे प्रमाणपत्र " देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना नसतील .

(सहा) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्ह्याधिकारी यांचेकडे तात्काळ परत करावे . अन्यथा अशी व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीसाठी अपात्र ठरेल.

(सात) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजीकच्या तहसीलदार कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावा . तसेच साक्षांकित केलेल्यांची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी व ज्या वेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी मागणी संबंधित पोलीस आयुक्त/जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडून केली जाईल त्यावेळी ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.

अनुसूची

उमेदवाराचे नाव

पत्ता

अनु. नियुक्ती क्रमांक

क्र.

१

४

२

३

१

१

श्री. प्रभाकर विठोबा फुलसुंदर

रा . २५ , कुबेर व्हिला , मु. वारुळवाडी, पो . नारायणगाव , ता . जुन्नर , पुणे-४१० ५०४.

नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे.

पुणे , ९ जानेवारी २०१ ९ .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 11 January 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-01-11.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-01-11.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1.