महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग
वर्ष ५, अंक ६(२)] मंगळवार, जानेवारी १५, २०१९/पौष २५, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक १०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि
स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात
आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र नवीन प्रशासन भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ जानेवारी २०१९.
संदर्भ.--- (१) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ (१९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३) चे कलम १०-अ व १२ चे पोट-कलम (१) अन्वये राज्य निवडणूक आयोगास प्रदान करण्यात आलेले अधिकार.
(२) आयोगाची समक्रमांकांच्या दिनांक ६ नोव्हेंबर २०१८ व दिनांक ९ जानेवारी २०१९ च्या अधिसूचना.
आदेश
क्रमांक रानिआ/ग्रापंनि-२०१८/प्र. क्र. १९/का. ०८.----उपरोक्त संदभार्ंकित अधिकारांचा वापर करून विषयांकित निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या समक्रमांकांच्या दिनांक ९ जानेवारी २०१९ च्या अधिसूचनेन्वये शनिवार, ११ जानेवारी २०१९ हा दिनांक मतदार यादी ग्रा धरण्यासाठी अधिसूचित करण्यात आला होता.
२. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक २ जानेवारी २०१९ च्या पत्रान्वये दिनांक १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकांवर आधारित विधानसभेच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यासाठी ११ जानेवारी २०१९ हा दिनांक भारत निवडणूक आयोगाकडून निर्धारीत केल्याचे आयोगास कळविल्याने नवीन नोंदणी झालेले मतदार मतदानापासून वंचित राहू नये तसेच उक्त कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता दिनांक ११ जानेवारी २०१९ हा विधानसभेची मतदार यादी ग्रा धरण्याचा दिनांक अधिसूचित करण्यात आला होता.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, जानेवारी १५, २०१९/पौष २५, शके १९४०४. सबब, वरील वस्तुस्थिती लक्षात घेता, समक्रमांकाच्या दिनांक ९ जानेवारी २०१९ रोजीची अधिसूचना रद्द करून उक्त कालावधीपैकी फक्त माहे मार्च, २०१९ मध्ये मुदत संपणा-या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता दिनांक १ सप्टेंबर २०१८ रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी, या अधिनियमांतर्गत प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येईल, असे अधिसूचित करण्यात येत आहे.
आदेशानुसार,
किरण कुरुंदकर, सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र.