महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ५, अंक १३(२)] शुक्रवार, जानेवारी २५, २०१९/माघ ५, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ३४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यामध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश याव्यतिरिक्त) नियम व आदेश.
ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक २५ जानेवारी २०१९
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक व्हीपीएम. २०१७/प्र.क्र.११/पंरा. ४ (२२).— भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४३ च्या खंड (छ) व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ( १९५९ चा तीन) च्या कलम ४ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि यासंदर्भात समर्थ करणा या इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि यासंदर्भात काढण्यात आलेल्या पूर्वीच्या सर्व अधिसूचनांचे किंवा संलेखांचे अधिक्रमण करून तसेच सातारा जिल्हापरिषदेची स्थायी समिती, सातारा जिल्ह्यतील फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत आणि ग्रामसभा कुरवली खु. यांच्याशी विचारविनिमय करून व सातारा जिल्ह्यतील फलटण तालुक्यातील पुनर्वसित जोर (पुनर्वसित) महसुली गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे सातारा जिल्ह्यतील फलटण तालुक्यातील कुरवली खु. व जोर (पुनर्वसित) या सोबतच्या अनुसूचीतील स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे महसुली गावाचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्र हे ज्या दिनांकापासून स्वतंत्र गाव असेल आणि संविधानाच्या भाग ९ च्या प्रयोजनासाठी अनुसूचीतील स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे कुरवली खु. आणि जोर पुनर्वसित (कुरवली खु.) या नावाने ओळखले जातील तो दिनांक म्हणून २५ जानेवारी २०१९ हा दिवस विर्िनदिष्ट करीत आहेत.
अनुसूची
अ.क्र. गावाचे नाव महसुली गाव
(१) (२)
(३)
१ कुरवली खु. कुरवली खु.