Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I (K.D.S.) Ext. 11 (28-1-2019) जिल्हाधिकारी, पालघर यांजकडून, क्रमांक एमएमआरडी/कावि-69/2019.

Published 28 January 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-01-28.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी २८, २०१९/माघ ८, शके १९४० RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ५, अंक ५(२)] सोमवार, जानेवारी २८, २०१९/माघ ८, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ११

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी, पालघर यांजकडून

अधिसूचना

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक एमएमआरडी/कावि-६९/२०१९.-----ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या पालघर जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश ""उक्त अधिनियम"" असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना जा. क्र. १८८०/२०१८, दिनांक २५ ऑक्टोबर २०१८ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूचि एक मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची दोन मध्ये अधिक तपशिलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, पालघर जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यता आहे याबाबत त्याची खात्री पटली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, अनुसूचीत तीन मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटूंबियाच्या पुनर्वसन व पुनस्र्थापनेच्या प्रयोजनासाठी ""पुनर्वसाहत क्षेत्र"" म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून पुनर्वसन व पुनस्र्थापना योजनेचा सारांश अनुसूची चार मध्ये विर्िनदिष्ट केला आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उप विभागीय अधिकारी, पालघर यांस पदनिर्देशित करीत आहे. भाग एक--(को.वि.पु.)--११-१ (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी २८, २०१९/माघ ८, शके १९४० अनुसूची-एक

संपादित करावयाच्या जमिनींचे वर्णन

गावाचे नाव मेंढवण व मौजे वरई, तालुका पालघर, जिल्हा पालघर

अ. क्र. गावाचे नाव भूमापन किंवा गट क्रमांक अंदाजित क्षेत्र (चौ.मी.) (१) (२) (३)

(४)

१ मेंढवण १०/२ २८०

२

१०/३ २१८०

३

१० अ/५ ६०

एकूण २५२०

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव : सुर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना.

प्रकल्पकार्याचे वर्णन : सुर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना.

समाजाला मिळणारे लाभ : पायाभूत सुविधा

(र्आथिक, रोजगार पायाभूत सुविधा सोयीसुविधा याबाबत व इतर लाभांसंबंधात)

अनुसूची-तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन.

निरंक

अनुसूची-चार

(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)

निरंक

टीप :----उक्त जमिनीच्या नकाशाचे उप विभागीय अधिकारी, पालघर यांचे कार्यालयात निरिक्षण करता येईल.

पालघर, दिनांक २३ जानेवारी २०१९.

डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी, पालघर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 January 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-01-28.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-01-28.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.