महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ५, अंक २] सोमवार, जानेवारी २८, २०१९/माघ ८, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ५५.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक----नागपूर विभागीय पुरवणी
--------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश. ---------------
भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, यांजकडून
वाचा : शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, विकाअ क्र. १११५-प्र.क्र. ८८-का. ५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५.
नियुक्ती आदेश
क्रमांक सामान्य-कक्ष-९-कावि-८५-२०१९.----
मी, अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, नागपूर, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, विकाअ क्र. १११५-प्र.क्र. ८८- का. ५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५, अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून आता सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यत: हा निर्णय निर्गमित केल्याच्या तारखेपासून ५ वर्ष किंवा विद्यमान विधानसभा बरखास्त होणे किंवा पुढील आदेशापयर्ंत यापैकी जे आधी घडेल तोपयर्ंत अस्तित्वात राहील. तसेच राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी, यांची नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही कोणतेही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील ही मुदत संपताच किंवा त्यापूर्वी आणण्यात आल्यास विशेष कार्यकारी पदाकरिता प्राप्त झालेले सर्व साहीत्य संबंधित पोलीस ठाणे किंवा जिल्हाधिकारी, यांच्या कार्यालयाकडे तात्काळ परत करण्याची प्राथमिक जबाबदारी सर्वस्वी संबंधित विशेष कार्यकारी अधिका यांची राहील;
विशेष कार्यकारी अधिकारी, पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यात सक्षम राहतील.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी २८, २०१९/माघ ८, शके १९४०(३) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिका यांना मोहोर उमटविण्यासाठी शिक्का संबंधित तहसील कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावा. तसेच साक्षाकिंत केलेल्या कागदपत्राची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी व ज्या वेळेस ही नोंदवही अवलोकनासाठी संबंधित पोलीस आयुक्त/अधीक्षक/जिल्हाधिकारी यांचेकडून मागणी केली जाईल त्यावेळेस ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.
(४) या शासन निर्णयाद्वारे नेमण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिका यांची शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यकतेनुसार त्या क्षेत्रातील मोहल्ला समिती/शांतता समितीवर पोलीस आयुक्त/जिल्हाधिकारी/पोलीस अधीक्षक यांनी नियुक्ती करावी.
(५) या शासन निर्णयाद्वारे केलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी, यांच्या नियुक्त्या " मानसेवा " असून त्यांना सोपविण्यात आलेल्या वरील कामांबाबत कोणतेही मानधन, वेतन किंवा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
(६) प्रत्येक विशेष कार्यकारी अधिकारी, यांनी आपल्या नियुक्तीची वैधता सुस्पष्टपणे दर्शविणारे प्रमाणपत्र आपल्या विशेष कार्यकारी अधिकारी, पदाच्या कामाच्या जागी सवार्ंना सहजपणे दिसेल अशा ठिकाणी लावावे व कामासाठी येणा या व्यक्तीने मागणी केल्यास ते त्या व्यक्तीस दाखवावे.
अनुसूची
अ. क्र. नाव
पत्ता
(१) (२)
(३)
१ श्री. भिमराव लक्ष्मणराव इंगळे रा. अंबाझरी खदान, सुदामनगरी, प्रभाग क्र. २, हिलटॉप, नागपूर.
२ श्री. शरद रामाजी अवथरे रा. जुना सक्करदरा, विश्वशांती बुद्ध विहाराजवळ, नागपूर.
३ श्री. रामकृष्णजी सुकानुजी पौनीकर रा. लालगंज, गुजरी चौक, उत्तम आटा चक्की जवळ, नागपूर.
नागपूर :
दिनांक २३ जानेवारी २०१९.
अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नागपूर.