| १ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, डिसेंबर २, २०१६/अग्रहायण ११, शके १९३८ RNI No. MAHBIL /2009/31745 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग वर्ष ५, अंक १०] मंगळवार, फेब्रुवारी ५, २०१९/माघ १६, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये ४.०० असाधारण क्रमांक १४ प्राधिकृत प्रकाशन सामान्य प्रशासन विभाग राजशिष्टाचार शाखा, ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ फेब्रुवारी २०१९. अधिसूचना क्रमांक डीआयपी-२०१९/प्र.क्र.२३/३०.----महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती आणि माजी मंत्री शिवाजीराव देशमुख (वय ८३) यांचे सोमवार, दिनांक १४ जानेवारी २०१९ रोजी मुंबई येथे झालेल्या दु:खद निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे ठराव पारित करून श्रद्धांजली अर्पण केली. महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती आणि माजी मंत्री शिवाजीराव देशमुख (वय ८३) यांचे सोमवार, दिनांक १४ जानेवारी २०१९ रोजी मुंबई येथे निधन झाले. श्री. देशमुख यांच्या निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळ तीव्र शोक व्यक्त करीत आहे. त्यांच्या निधनाने राजकारणासोबतच सहकार आणि सामाजिक क्षेत्रात महवाचे योगदान देणारा नेता आपण गमावला आहे. श्री. देशमुख यांचा जन्म १ सप्टेंबर १९३५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यच्या हातकणंगले तालुक्यातील तिळवणी येथे झाला. त्यांचे शिक्षण बी. ए. पयर्ंत झाले होते. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान असलेल्या श्री. देशमुख यांनी काही काळ शासकीय सेवाही केली होती. बिळाशी जिल्हापरिषद मतदारसंघातून ते १९६७ मध्ये बिनविरोध निवडून गेले. कोयना येथे झालेल्या भूकंपावेळी त्यांनी केलेल्या मदत कार्यामुळे त्यांची जनतेशी नाळ जोडली गेली. राज्यातील पहिली डोंगरी परिषद यशस्वीरित्या आयोजित करून ४० तालुक्यांचा डोंगरी विकास योजनेमध्ये समावेश करण्यात त्यांचा विशेष पुढाकार होता. १९७८ पासून सलग चार वेळा ते विधानसभेवर निवडून गेले. सामान्य प्रशासन, गृह, माहिती व जनसंपर्क आणि परिवहन खात्याचे राज्यमंत्री, पाटबंधारे आणि अन्न व नागरी पुरवठा, पुनर्वसन आणि ग्रामविकास, कृषी-फलोत्पादन, सहकार, सार्वजनिक बांधकाम अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरी महवपूर्ण आहे. १९९६ पासून चारदा ते विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. विधानपरिषदेचे सभापती म्हणून त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. श्री. देशमुख यांच्या निधनाबद्दल हे मंत्रिमंडळ तीव्र दु:ख व्यक्त करीत आहे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांच्या निधनाचे दु:ख सहन करण्याची ताकद कुटु बीयांमध्ये येवो, अशी प्रार्थना करण्यात येत आहे. ं महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने, दिनेशकुमार जैन, शासनाचे मुख्य सचिव. (१) भाग एक-(म.उ.वि.)--१४-१ ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE. | ||
Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
Part I Cent. Ext. 14 (5-2-2019)सामान्य प्रशासन विभाग,विधानपरिषद माजी सभापती,माजी मंत्री शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाबद्दल मंत्रीमंडळाची श्रद्धांजली.
Published 05 February 2019
Cite this issue.
Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 February 2019.
Indian Gazettes,
https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-02-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/.
Archive identifier in.gazette.maharashtra.2019-02-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.