Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांजकडून आलेली पुणे महानगरपालिका वाढीव हद्दीतील मौजे खराडी, जिल्हा पुणे येथील प्राथमिक शाळा/क्रीडांगणाचे आरक्षण वगळून जमीन रहिवास विभागात समाविष्ट करणेबाबत. (2) जुन्नर नगरपरिषदेमधील क्षेत्रावर प्राथमिक शाळेचे आरक्षण वगळून सदर जमीन रहिवास विभागात समाविष्ट करणेबाबत. (3) By Under Secretary to publish the corrigendum in the final Development Plan of Jejuri Municipal Council in Substantial Modification Nos. (4) जिल्हाधिकारी, सांगली यांजकडील वाळवा व पलूस, तालुका व जिल्हा सांगली येथील विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध करणेबाबत. (5) प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली यांजकडील वांगी, पलूस-1, कुंडल-1 व वाजेगाव या सजांस महसुली गावांचा दर्जा देणेबाबत. (6) अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील करवीर तालुक्यातील सजाचे करवीर-1 या महसुली गावात रूपांतर करणेबाबत. (7) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड यांजकडील ढोलेमळा, गुलटेकडी, पुणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करणेबाबत. (8) अध्यक्षा, सांगोला नगरपरिषद, सांगोला यांजकडील सांगोला शहराच्या दुसऱ्या सुधारित योजनेत फेरबदल करणेबाबत. (9) कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, सातारा यांजकडील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाणीवापर संस्थेबाबत अधिसूचना. (10) कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा, फलटण, जिल्हा सातारा यांजकडील उपविभाग तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथील पाणीवापर संस्थाबाबत अधिसूचना. (11) कार्यकारी अभियंता, भीमा पाटबंधारे विभाग, पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथील पाणीवापर संस्थांबाबत अधिसूचना. (12) पोलीस उपायुक्त, पुणे शहर, पुणे यांजकडील वाहतूक व्यवस्थेबाबत अधिसूचना. (12) जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांजकडील वाई सजातील गावांची पुनर्रचनेनंतरची स्थितीबाबत अधिसूचना. (13) उपविभागीय दंडाधिकारी, इचलकरंजी, कोल्हापूर, कराड, सातारा, हवेली उपविभाग, पुणे, पुणे उपविभाग, पुणे, वाळवा विभाग, इस्लामपूर, सांगली, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर, सोलापूर, गडहिंग्लज उपविभाग, गडहिंग्लज, कोल्हापूर तसेच विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर यांजकडील मयत समरी प्रसिद्ध करणेबाबत.
Published 07 February 2019
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.