Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) जिल्हाधिकारी, सांगली यांचेकडील सांगली जिल्ह्यातील वारणा प्रकल्प/चांदोली अभयारण्य प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रतांचे पुनर्वसन. (2) जिल्हाधिकारी, सातारा यांचेकडील सातारा जिल्ह्यातील वगळलेल्या तलाठी सजांचे नवीन महसुली मंडळ अस्तित्वात आणणेबाबत. (3) अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडून कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी मध्यम प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील जमिनीचे भूसंपादन झालेने उर्वरित बुडित क्षेत्रातील जमिनीवरील हस्तांतरण/विभाजन इत्यादीबाबतचे निर्बंध उठविणे व कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातील मौजे वडरगे या गावाचे नवीन गावात रूपांतर करणे. (4) मुख्याधिकारी, सातारा यांचेकडील सातारा नगरपरिषद हद्दीतील फेरफारबाबतची नोटीस. (5) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांचेकडील झोपडपट्टी पुनर्वसन आदेश. (6) पोलीस उपायुक्त, वाहतूक, पुणे शहर यांजकडून पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबतची अधिसूचना. (7) कार्यकारी अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सातारा यांचेकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापनबाबतची अधिसूचना-3. (8) पोलीस उपायुक्त, पुणे शहर, पुणे यांजकडून पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबतची अधिसूचना. (9) सहायक पोलीस आयुक्त यांजकडून पुणे शहरातील पुणे शहर, येरवडा विभाग, खडकी विभाग, फरासखाना, पिंपरी-चिंचवड विभाग तसेच उपविभागीय दंडाधिकारी, सातारा, उपविभागीय दंडाधिकारी, बारामती विभाग, फलटण विभाग, माळशिरस विभाग, सोलापूर विभाग, सोलापूर विभाग क्रमांक 2, मिरज उपविभाग, सांगली, पंढरपूर विभाग, पंढरपूर, आजरा-भुदरगड विभाग, कोल्हापूर यांजकडील मयत समरी.
Published 14 February 2019
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.