Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, पुणे यांजकडून आलेली पुणे जिल्ह्यातील विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नावे प्रसिद्ध करणेबाबत.

Published 15 February 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-02-15.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL 2012/47976

www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ८ , अंक - ४ ]

शुक्रवार , फेब्रुवारी १५ , २०१९ / माघ २६ , शके १ ९ ४०

[ पृष्ठे २

असाधारण क्रमांक ४

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

प्रपत्र 'ड'

विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका

जिल्हाधिकारी, पुणे ( गृह शाखा)

क्रमांक पगम / एसआर -७/२०१ ९ .-- जिल्हाधिकारी, पुणे जिल्हा , पुणे या आदेशाद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पात्र व्यक्तींची पुणे जिल्ह्याचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यतः हा निर्णय निर्गमित केलेच्या तारखेपासून ५ वर्षांकरिता अथवा पुढील आदेश होईपर्यंत अस्तित्वात राहील , तसेच राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील .

२. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील .

(एक) साक्षांकनाचे काम

विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ " साक्षांकनाचे " काम करतील . मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये , तसेच परिशिष्ट " ५ " मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतींवर न चुकता दिनांकासहित साक्षांकन करावे. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये . वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर " सत्य प्रत " म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामांकरिता " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल.

(दोन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी " असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला कोणतेही मानधन अथवा वेतन/ भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत .

(तीन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर , दुकानावर , कार्यालयावर स्वतःच्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा. त्यांच्या नियुक्तीबाबत कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत . तथापि , त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये .

(चार) " ओळख परेड " तसेच " मृत्युपूर्व जबानी " यासाठी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये .

(पाच) " उत्पन्नाचे प्रमाणपत्र " देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना नसतील .

(१)

एच-६४ ९ , भाग एक-असा . (पु.वि.पु. )- ४ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक असाधारण- पुणे विभागीय पुरवणी, १५ फेब्रुवारी , २०१ ९ / माघ २६ , शके १९ ४०

(सहा) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्ह्याधिकारी यांचेकडे तात्काळ परत करावे . अन्यथा अशी व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीसाठी अपात्र ठरेल.

(सात) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजीकच्या तहसीलदार कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावा , तसेच साक्षांकित केलेल्यांची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी व ज्या वेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी मागणी संबंधित पोलीस आयुक्त/जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडून केली जाईल त्यावेळी ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.

अनुसूची अ. क्र.

उमेदवारांची नावे

नियुक्ती क्रमांक

१

२

३ पत्ता ४

श्री. तेजेश वामन जाधवर

१

१६५५

रा . २/२५ , सिंधू, राम सोसायटी, येरवडा, पुणे .

श्री. संजीव ओमप्रकाश अगरवाल

२

१६५६

३

१६५७

रा . महालक्ष्मी विहार, आळंदी रोड, पुणे .

श्री . चिन्मय चंद्रशेखर मुसळे

४

१६५८

रा . बी-१२/ ९ , नक्षत्र बंगला, बंधन सोसायटी, कर्वे पुतळ्याजवळ , कर्वे रोड, कोथरूड, पुणे -३८ .

श्री. अभिजीत चंद्रकांत शिवपुजे

५

१६५९

जयश्री सुनिल देशपांडे ६

१६६०

रा. ९ - बी विंग , पोल हाइटस्, लोढा हॉस्पिटल- मागे , वारजे , पुणे -५८ .

रा . बी-४ , घर क्रमांक ६ , माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे -५१ .

श्री. संजय रघुनाथ खराडे

रा . स. नं. २ ९ , प्रतीकनगर , बिल्डिंग बी-२ , ससाणेनगर, पुणे.

श्री. हर्षल दत्तात्रय भोसले

७

१६६१

रा. ए-६ , पी. एस . टेरेस , ससाणेनगर , महंमदवाडी रोड, हडपसर , पुणे -२८ .

श्री. अनिल आप्पासाहेब चाकोते

८

१६६२

श्री. अशोक मारुती भोर ९

१६६३

रा. स. नं. १५१/११ , श्री समर्थ कृपा , ज्ञानदीप सोसायटी , मगरपट्टा रोड, हडपसर , पुणे .

रा . सातववाडी, हडपसर , पुणे.

श्री . राजेंद्र महादेव राऊत

१०

१६६४

११

१६६५

रा . स. नं . ३११ , ससाणेनगर , लेन नंबर ७ , हडपसर , पुणे-२८ .

श्री. महेश तुकाराम रेणुसे

१२

श्री. सुरेंद्र बबन शिंदे १३

१६६७

श्री. नरेंद्र सुदाम लोखंडे पुणे, १३ फेब्रुवारी २०१ ९ .

रा . ४८/४/६ , कपिलनगर , कोंढवा बु. , पुणे-४८.

रा . २४७ , सोलापूर बाजार , पूलगेट, कॅम्प , पुणे.

रा . प्लॉट नंबर ४६ , दौलतनगर, धनकवडी, पुणे.

नवल किशोर राम, जिल्हाधिकारी , पुणे.

PRINTED ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 15 February 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-02-15.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-02-15.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1.