RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ५, अंक २६(२)] शनिवार, फेब्रुवारी १६, २०१९/माघ २७, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ५८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
ग्रामविकासविभाग बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक१२फेब्रुवारी२०१९
अधिसूचना
महाराष्ट्रलोकसेवा हक्क अधिनियम, २०१५.
क्रमांक आरटीएस-२०१८/प्र.क्र. १४५/आस्था.५.—ज्याअर्थी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ (सन २०१५ चा महा. अध्यादेश क्रमांक ५) च्या कलम-३ चे पोट-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार काढण्यात आलेल्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचना क्रमांक आरटीएस-२०१५/प्र.क्र. ३२/पंरा-५, दिनांक १० जुलै २०१५ (यापुढे जिचा " उक्त अधिसूचना " असा उल्लेख करण्यात येत आहे.) द्वारे ग्रामविकास विभागामार्फत ग्रामपंचायतीद्वारे पात्र व्यक्तींना देण्यात यावयाच्या लोकसेवा आणि त्यासोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उक्त अध्यादेशाच्या प्रयोजनार्थ अशा लोकसेवा देण्याकरिता विहित कालमर्यादेसह पदनिर्देशित अधिकारी आणि प्रथम अपील प्राधिकारी व द्वितीय अपील प्राधिकारी अधिसूचित करण्यात आले आहेत ;
आणि ज्याअर्थी, सेवा पुरविण्याचा कालावधी वाढविण्याबाबत महाराष्ट्र शासनास काही निवेदने प्राप्त झालेली आहेत, आणि त्याअर्थी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत सेवा पुरविण्याचा कालावधी वाढविणे व काही सेवा वगळणे उचित असल्याचे शासनास वाटले आहे ;
त्याअर्थी, आता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ (सन २०१५ चा महा. अधिनियम ३१) च्या कलम ३ चे पोट-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणा-या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन सदर अधिसूचनेमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :----
सदर अधिसूचनेसोबत जोडलेल्या अनुसूचीऐवजी खालीलप्रमाणे अनुसूची प्रतिस्थापित करण्यात येत आहे :----
(१)
भाग चार--ब----५८----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी १६, २०१९/माघ २७, शके १९४०
अनुसूची
अ. क्र. लोकसेवेचे लोकसेवा पदनिर्देशित प्रथम अपील द्वितीय अपील नाव
पुरविण्यासाठीची अधिकारी प्राधिकारी प्राधिकारी
कालमर्यादा
(कामकाजाचे दिवस)
(१) (२) (३) (४) (५) (६) १ जन्म नोंद दाखला ७ दिवस ग्रामसेवक सहायक गट गट विकास
विकास अधिकारी अधिकारी २ मृत्यु नोंद दाखला ७ दिवस ग्रामसेवक सहायक गट गट विकास विकास अधिकारी अधिकारी ३ विवाह नोंद दाखला ७ दिवस ग्रामसेवक सहायक गट गट विकास विकास अधिकारी अधिकारी ४ दारिद्रय रेषेखालील ७ दिवस सहायक गट गट विकास अधिकारी उपमुख्य कार्यकारी असल्याचा दाखला
विकास अधिकारी अधिकारी (पंचायत) ५ ग्रामपंचायत येणेबाकी ५ दिवस ग्रामसेवक सहायक गट गट विकास विकास अधिकारी अधिकारी नसल्याचा दाखला
६ नमुना ८ चा ५ दिवस ग्रामसेवक सहायक गट गट विकास विकास अधिकारी अधिकारी उतारा
७ निराधार असल्याचा २० दिवस ग्रामसेवक सहायक गट गट विकास विकास अधिकारी अधिकारी दाखला
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
पंडित जाधव,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी १६, २०१९/माघ २७, शके १९४० ३RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bhandhakam Bhavan, 25, Marzhaban Path, Fort, Mumbai 400 001, dated the 12th February 2019
NOTIFICATION
MAHARASHTRA RIGHT TO PUBLIC SERVICES ACT, 2015.
No. RTS-2018/C.R. 145/Astha-5.—Whereas by Government Notification, Rural Development and Water Conservation Department, No. RTS-2015/CR-32/PR-5, dated the 10th July 2015, issued in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 3 of the Maharashtra Right to Public Services Ordinance, 2015 (Mah. ORD. No. V of 2015) (hereinafter referred to as " the said notification "), notified the public services rendered by the Rural Development and Water Conservation Department, through the Grampachayats to the eligible persons, and the suitable time limits for providing such public services, along with the Designated Officers, First Appellate Authorities and Second Appellate Authorities, as specified in the Schedule appended thereto, for the purposes of the said Ordinance ;
And whereas, the Government of Maharashtra has received the representation to enhance the time limits for providing certain public services and, therefore, the Government considers it expedient to enhance the said time limits and exclude certain services from the purview of the Maharashtra Right to Public Services Act, 2015 ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by clause by sub-section (1) of Section 3 of the Maharashtra Right to Public Services Act, 2015 (XXXI of 2015), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby amends the said notification as follows, namely :—
for SCHEDULE appended to the said notification, the following SCHEDULE shall be substituted, namely :—
Schedule
Sr. Public Time limit for Designated First Appellate Second Appellate No. Service providing service Officer Officer Officer (working days)
(1) (2) (3) (4)
(5)
(6) 1 Birth 7 days Gramsevak
Block Development Officer
Assistant Block Development Officer
Certificate
2 Death 7 days Gramsevak
Block Development Officer
Assistant Block Development Officer
Certificate
3 Marriage 7 days Gramsevak
Block Development Officer
Assistant Block Development Officer
Certificate
4 Below Poverty 7 days Assistant
Line Certificate Block
Deputy Chief Executive Officer (Panchayat)
Block Development Officer
Development
Officer
5 No Dues 5 days Gramsevak
Block Development Officer
Assistant Block Development Officer
Certificate
6 Assessment 5 days Gramsevak
Block Development Officer
Assistant Block Development Officer
Certificate
7 Certificate 20 days Gramsevak
Block Development Officer
Assistant Block Development Officer
of Niradhar
By order and in the name of the Governor of Maharashtra,
PANDIT JADHAV, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.