Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part V (Ext. 1) Dt. 25-2-2019, महाराष्ट्र कृषि विद्यापीठ अधिनियम, 1983 यात आणखी सुधारणा करण्याकरिता विधेयक.

Published 25 February 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part 5 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-02-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २५, २०१९/फाल्गुन ६, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/40124

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग पाच

वर्ष ५, अंक १] सोमवार, फेब्रुवारी २५, २०१९/फाल्गुन ६, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक १

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

महाराष्ट्र विधानपरिषदेत दिनांक २५ फेब्रुवारी २०१९ रोजी पुर:स्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानपरिषद नियम १११ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे :----

L. C. BILL No. I OF 2019.

A BILL

FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA AGRICULTURAL

UNIVERSITIES (KRISHI VIDYAPEETHS) ACT, 1983.

सन २०१९ चे विधानपरिषद विधेयक क्रमांक १.

महाराष्ट्र कृषि विद्यापीठ अधिनियम, १९८३ यात आणखी सुधारणा

करण्याकरिता विधेयक.

१९८३ चा महा. ४१.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र कृषि विद्यापीठ अधिनियम, १९८३ यात आणखी सुधारणा करणे इष्ट आहे; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या सत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :---

संक्षिप्त नाव.

१. या अधिनियमास, महाराष्ट्र कृषि विद्यापीठ (सुधारणा) अधिनियम, २०१९, असे म्हणावे.

(१)

भाग पाच----१-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २५, २०१९/फाल्गुन ६, शके १९४० २. महाराष्ट्र कृषि विद्यापीठ अधिनियम, १९८३ याच्या कलम १७ मधील, पोट-कलम (१) च्या खंड (अ) १९८३ चा महा. ४१.

मध्ये, उप-खंड (दोन) ऐवजी, पुढील उप-खंड दाखल करण्यात येईल :----

'' (दोन) महासंचालक, भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली; किंवा पुढे दिलेल्या व्यक्तींमधील सन १९८३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१ याच्या कलम १७ ची सुधारणा.

त्याचा एक नामनिर्देशिती,----

(अ) महासंचालक, भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली म्हणून सेवानिवृत्त झाली असेल अशी कोणतीही व्यक्ती; किंवा

(ब) अध्यक्ष, कृषि वैज्ञानिक निवड मंडळ (एएसआरबी), नवी दिल्ली; किंवा

(क) संचालक, भारतीय कृषि संशोधन संस्था (आयएआरआय), नवी दिल्ली; '' .

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २५, २०१९/फाल्गुन ६, शके १९४० ३

उद्देश व कारणे यांचे निवेदन.

महाराष्ट्र कृषि विद्यापीठ अधिनियम, १९८३ (१९८३ चा महा. ४१) याच्या कलम १७ च्या पोट-कलम (१) मध्ये, कुलगुरूची नेमणूक करण्याची तरतूद आहे. उक्त कलम १७ च्या पोट-कलम (१) च्या खंड (अ) मध्ये, कुलगुरूची नेमणूक करण्यासाठी कुलपतीला योग्य अशा नावांची शिफारस करण्याकरिता एक समिती असेल, अशी तरतूद आहे. उप-खंड (दोन) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे, महासंचालक, भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली हा, उक्त समितीच्या सदस्यांपैकी एक सदस्य असतो. तसेच, महासंचालक, भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली हा, भारत सरकारच्या कृषि संशोधन आणि शिक्षण विभागाचा देखील सचिव असतो. उक्त महासंचालकाचे पद हे, संपूर्ण भारतभर अधिकारिता असलेले एकाकी पद आहे, आणि त्यामुळे महासंचालकाला अशा समितीवर काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे कठीण झाले आहे.

२. महासंचालकाचा कार्यभार विचारात घेता, आणि कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूची निवड प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जात असल्याबद्दलची सुनिश्चिती करण्यासाठी, कुलगुरूची नेमणूक करण्याकरिता कुलपतीला योग्य नावे सुचविण्यासाठी असलेल्या समितीवर महासंचालक, एकतर स्वत: किंवा सेवानिवृत्त महासंचालक, भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली, किंवा अध्यक्ष, कृषि वैज्ञानिक निवड मंडळ, नवी दिल्ली, किंवा संचालक, भारतीय कृषि संशोधन संस्था, नवी दिल्ली, यांच्यामधील त्याचा एक नामनिर्देशिती हा, एक सदस्य असेल, अशी तरतूद करणे इष्ट वाटते. उक्त प्रयोजनासाठी, उक्त अधिनियमाच्या कलम १७ मध्ये यथोचितरीत्या सुधारणा करणे इष्ट वाटते.

३. वरील उद्दिष्टे साध्य करणे हा, या विधेयकाचा हेतू आहे.

मुंबई,

चंद्रकांत (दादा) पाटील,

दिनांक ८ फेब्रुवारी २०१९.

कृषि मंत्री.

विधान भवन, मुंबई, दिनांक २५ फेब्रुवारी २०१९.

जितेंद्र भोळे, सचिव (का.), महाराष्ट्र विधानपरिषद.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 25 February 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-02-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-02-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-.