महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ५, अंक २५] मंगळवार, फेब्रुवारी २६, २०१९/फाल्गुन ७, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ५६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
अल्पसंख्याक विकास विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २६ फेब्रुवारी २०१९
अधिसूचना
वक्फ अधिनियम, १९९५.
क्रमांक वक्फ २०१८/प्र.क्र. १२२/कार्यासन-४.---वक्फ अधिनियम, १९९५ (१९९५ चा ४३ वा) यामधील कलम १४ च्या पोट-कलम ९ आणि पोट-कलम १ मधील खंड (ब) मधील उपखंड (दोन) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून, आणि जेथवर महाराष्ट्र राज्य विधानमंडळाच्या मुस्लीम सदस्यांचा संबध आहे, तेथवर, यासंदर्भात यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या सर्व अधिसूचना अधिक्रमित करून, महाराष्ट्र शासन याद्वारे श्रीमती हुस्नबानू निझामुद्दीन खलीफे, महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य, आणि श्री. अब्दुल सत्तार अब्दुल नबी, महाराष्ट्र विधानसभा सदस्य, हे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे मुस्लीम सदस्य असल्याने आणि " महाराष्ट्र विधिमंडळाचे मुस्लीम सदस्य" या निर्वाचक गणातून यथोचितरित्या निवडून आल्याचे, निवडणूक निर्णय अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या सदस्यांची निवडणूक, यांनी घोषित केले असल्याने, त्यांची पनचक्की, औरंगाबाद येथे मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
श्याम तागडे, शासनाचे प्रधान सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २६, २०१९/फाल्गुन ७, शके १९४० MINORITIES DEVELOPMENT DEPARTMENTMadam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 26th February 2019
NOTIFICATION
WAKF ACT, 1995.
No. Waqf. 2018/C.R.122/Desk.4.—In exercise of the powers conferred by sub-section (9) and sub-clause (ii) of clause (b) of sub-section (1) of section 14 of the Wakf Act, 1995 (43 of 1995), and in supersession of all earlier notifications issued in this behalf in so far as they relate to the appointment of the Muslim Members of the State Legislature of Maharashtra, the Government of Maharashtra hereby appoints Smt. Husnabanoo Nizamuddin Khalife, the Member of Maharashtra Legislative Council and Shri Abdul Sattar Abdul Nabi, the Member of Maharashtra Legislative Assembly, being the Muslim Members of the State Legislature of the Maharashtra and duly declared elected from the electoral college of the Muslim Members of the State Legislature of the Maharashtra, by the Returning Officer, Elections, to the Members of the Maharashtra State Board of Wakfs, as Members of Maharashtra State Board of Wakfs, having its headquarters at Panchakki, Aurangabad.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SHYAM TAGADE, Principal Secretary to Government.