Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ext 66 (26th Feb. 2019), सहकार, पणन व वस्त्रोद्याोग विभाग, क्रमांक ससंनि. 0518/प्र.क्र. 57/13-सी.

Published 26 February 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-02-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी २६, २०१९/फाल्गुन ७, शके १९४० १

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ५, अंक २९] मंगळवार, फेब्रुवारी २६, २०१९/फाल्गुन ७, शके १९४० [पृष्ठे ४ किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ६६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ फेब्रुवारी २०१९

अधिसूचना

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०.

क्रमांक ससंनि. ०५१८/प्र.क्र.५७/१३-सी.---महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा महा. २४) याच्या कलम १६५ च्या पोट-कलम (१) आणि (२) तसेच कलम १४४-२० अ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, राज्य शासन महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियमाच्या कलम १६५ च्या पोट-कलम (३) द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले नियम पुढीलप्रमाणे :---

१. या नियमांना, महाराष्ट्र सहकारी संस्था (पहिली सुधारणा) नियम, २०१८, असे म्हणावे.

२. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ यांच्या प्रकरण अकरा-नऊ नंतर, पुढील मजकूर समाविष्ट करण्यात येईल :----

" प्रकरण अकरा अ

नियामक मंडळाचे कामकाज चालविणे

१०६ ब-महाराष्ट्र राज्य बिगर कृषि सहकारी पतसंस्था नियामक मंडळाची बैठक, गणपूर्ती आणि त्यांचे कामकाज चालविण्यासंबंधीची कार्यपद्धती,-----

(१) नियामक मंडळाची प्रत्येक दोन महिन्यातून किमान एकदा बैठक होईल.

(२) नियामक मंडळाचा सचिव, त्या नियामक मंडळाच्या अध्यक्षाच्या सांगण्यावरून बैठक बोेलावील.

(३) नियामक मंडळाच्या बैठकी ह्य साधारणपणे सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयात किंवा नियामक मंडळाने निश्चित केलेल्या इतर कोणत्याही ठिकाणी घेण्यात येतील.

(१)

भाग चार--ब--६६---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी २६, २०१९/फाल्गुन ७, शके १९४० (४) (अ) नियामक मंडळाच्या बैठकीचा अध्यक्ष हा नियामक मंडळाचा अध्यक्ष किंवा त्याच्या अनुपस्थितीत, नियामक मंडळाने नियुक्तकेलेला अधिकारी असेल किंवा त्याच्या अनुपस्थितीत कलम १४४-१४अ च्या (ब) या खंडान्वये निबंधकाने नियुक्त केलेला अधिकारी असेल, आणि अध्यक्ष व असे अधिकारी या दोघांच्या अनुपस्थितीत, नियामक मंडळाची बैठक रद्द करण्यात येईल.

(५) नियामक मंडळाची बैठक बोलावण्यासाठी त्यांच्या सदस्यांना साधारणत: सात दिवस अगोदर सूचना देणे सामान्यपणे आवश्यक असेल.

(६) नियामक मंडळाचा सचिव आपल्या स्वाक्षरीने, मंडळाच्या सदस्यांना नियामक मंडळाच्या बैठकीची सूचना पुढीलपैकी कोणत्याही एका पद्धतीने देईल.

(अ) सदस्याच्या पयावर नोंदणीकृत टपालाद्वारे किंवा शीघ्र टपालाद्वारे; किंवा

(ब) ई-मेलद्वारे ; किंवा

(क) सदस्याच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे किंवा संदेशाद्वारे; किंवा

(ड) हात बटवडयाद्वारे.

(७) नियामक मंडळाच्या बैठकीसाठी आवश्यक असलेली गणसंख्या ही पाच इतकी असेल. त्या गणसंख्येच्या प्रयोजनार्थ, नियामक मंडळाच्या सचिवाची उपस्थिती गणण्यात येणार नाही.

(८) गणपूर्ती होत नसेल तर, नियामक मंडळाची बैठक, अशा बैठकीच्या अध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीकडून ठरविण्यात येईल अशा दिनांकापयर्ंत स्थगित करण्यात येईल.

(९) नियामक मंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त, त्या प्रयोजनार्थ ठेवावयाच्या कार्यवृत्त पुस्तिकेमध्ये नियामक मंडळाच्या सचिवाकडून नोंदविण्यात येईल.

(१०) नियामक मंडळाचा सचिव, प्रत्येक बैठकीच्या कार्यवृत्ताच्या मसुद्यास अशा बैठकीच्या दिनांकापासून सात दिवसांच्या आत अंतिमरुप देईल आणि त्यावर नियामक मंडळाच्या अध्यक्षाची स्वाक्षरी घेईल. नियामक मंडळ सदस्यांचे कोणतेही म्हणणे असेल तर ते विचारात घेतल्यानंतर त्यांच्या नंतरच्या बैठकीत नियामक मंडळाच्या सचिवाकडून कार्यवृत्त पुस्तिकामध्ये ते म्हणणे नोंदवून घेईल.

(११) नियामक मंडळाच्या बैठकीमधील सर्व विषय, उपस्थित सदस्यांच्या साध्या बहुमताने व बैठकीमधील मतदानाद्वारे निश्चित करण्यात येतील. समसमान मते पडल्यास, त्याबाबतीत अशा बैठकीच्या अध्यक्षपदस्थ व्यक्तीस एक निर्णायक मत देण्याचा अधिकार असेल.

(१२) नियामक मंडळाच्या बैठकीत, नियामक मंडळाच्या प्रत्येक सदस्याला फक्त एकच मत देण्याचा अधिकार असेल आणि ते मत देण्याच्या अधिकाराचा वैयक्ितकरित्या वापर करण्यात येईल आणि प्रतिनिधीद्वारा मत देण्याचा अधिकाराचा वापर केला जाणार नाही.

(१३) जर कोणत्याही ठरावावर नियामक मंडळाच्या सदस्यांची मत विभागणी झाली असेल तर अशा बैठकीच्या अध्यक्षपदावरील व्यक्ती तो ठराव मतदानासाठी ठेवील. मतदान हात उंचावून करण्यात येईल.".

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

आभा शुक्ला, शासनाचे प्रधान सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी २६, २०१९/फाल्गुन ७, शके १९४० ३

CO-OPERATION, MARKETING AND TEXTILES DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk Mantralaya, Mumbai 400 032, dated the 25th February 2019

NOTIFICATION

MAHARASHTRA CO-OPERATIVE SOCIETIES ACT, 1960.

No. Sansani 0518/C.R.57/13-C.—In exercise of the power conferred by sub-section (1) and (2) of section 165 read with Section 144-20A of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 (Mah. XXIV of 1961), the Government of Maharashtra, hereby makes the following rules further to amend the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, the same having previously published as required by sub-section (3) of section 165 of the said Act, as follows, namely :—

1. These rules may be called the Maharashtra Co-operative Societies (First Amendment ) Rules, 2019.

2. After CHAPTER-IX of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, the following CHAPTER shall be inserted, namely :—

" CHAPTER XI-A

CONDUCT OF BUSINESS OF THE REGULATORY BOARD

106-B—The meeting, quorum and procedure regarding transaction of the business of the Maharashtra State Non-Agricultural Co-operative Credit Societies Regulatory Board,—

(1) The Regulatory Board shall meet at least once in every two months.

(2) The Secretary of the Regulatory Board shall convene the meeting at the instance of the Chairman of the Regulatory Board.

(3) The meetings of the Regulatory Board shall normally be held at the office of the Commissioner for Co-operation and Registrar for Co-operative Societies, Maharashtra State, Pune or at any other place decided by the Regulatory Board.

(4) The meetings of the Regulatory Board shall be presided over by the Chairman of the Regulatory Board or in his absence by the officer appointed by the Registrar under clause Regulatory clause (b) of section 144-14A and in the absence of both the Chairman and such officer, the meeting of the Regulatory Board shall be cancelled.

(5 ) Seven days prior notice to its members shall ordinarily be necessary for convening the meeting of the Regulatory Board.

(6) The Secretary of the Regulatory Board by his signature shall issue the notice of meeting of the Regulatory Board to the members of the Board by one of the following modes :—

(a) by Registered Post or Speed Post at the address given by the member ; or (b) by e-mail ; or

(c) by S.M.S. or message on the Mobile phone number given by the member ; or (d) by hand delivery.

(7) Necessary quorum for the meeting of the Regulatory Board shall be five. For the purpose of the quorum, the presence of the Secretary of the Regulatory Board shall not be counted.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी २६, २०१९/फाल्गुन ७, शके १९४०

(8) If there is no quorum, the meeting of the Regulatory Board shall be adjourned to such a date as decided by the person presiding such meeting.

(9) The proceeding of meetings of the Regulatory Board shall be recorded, by the Secretary of the Regulatory Board, in the minute's book to be kept for this purpose.

(10) The Secretary of the Regulatory Board shall finalise the draft minutes of every meeting within seven days from the date of such meeting and get it signed by the Chairman of the Regulatory Board.

The Regulatory Board, at its subsequent meeting after taking into consideration the observations, if any, made by the members, cause them to be recorded in the minute's book maintained by the Secretary of the Regulatory Board.

(11) All the subjects in the meeting of the Regulatory Board shall be decided by a simple majority of members present and voting at the meeting.

In case of equality of votes, the person presiding such meeting shall have a casting vote.

(12) At the meeting of the Regulatory Board, every member of the Regulatory Board shall have only one vote and right to vote shall be exercised personally and not by proxy.

(13) When the members of the Regulatory Board are divided on any resolution, the person presiding such meeting shall put the resolution for voting. Voting shall be by show of hands.".

By order and in the name of the Governor of Maharashtra,

ABHA SHUKLA,

Principal Secretary (Co-operation) to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 26 February 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-02-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-02-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.