Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A Cent. Ext. 26 राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र, शुद्धीपत्र, अनुसूची 1 मध्ये अंशत बदल

Published 02 March 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-03-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, जानेवारी ९, २०१९/पौष १९, शके १९४० १ RNI No. MAHBIL/2009/31748

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग

वर्ष ५, अंक १५(४)] शनिवार, मार्च २, २०१९/फाल्गुन ११, शके १९४० [ पृष्ठ १, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक २६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि

स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात

आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई ४०० ०३२, दिनांक २१ फेब्रुवारी २०१९.

वाचा.----राज्य निवडणूक आयोगाचे क्रमांक रानिआ/जिपपंस/२०१५/प्र.क्र.५१/का.७, दिनांक १३ ऑगस्ट २०१८ चे आदेश

शुद्धिपत्र

क्रमांक रानिआ/जिपपंस/२०१५/प्र.क्र.५१/का.७.------राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक १३ ऑगस्ट, २०१८ च्या आदेशान्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये उमेदवाराने नामनिर्देशन पत्रासोबत सादर करावयाच्या एकत्रित शपथपत्राचा नमुना विहित करण्यात आला आहे. सदर आदेशासोबतच्या अनुसूची-१ मध्ये खालीलप्रमाणे अंशत: बदल करण्यात येत आहे.

१. परिच्छेद १५(ब) मध्ये मतदार संघ योजना या शिर्षाखाली प्रश्न उत्तर या स्तंभात (जास्तीत जास्त ५०० शब्द) असा उल्लेख आहे.

त्याऐवजी (कमीत कमी १०० शब्द व जास्तीत जास्त ५०० शब्द) असे वाचावे.

२. परिच्छेद १६.३ मध्ये पुढीलप्रमाणे उल्लेख आहे :--

" निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात कसूर केल्यास माझी निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल आणि मी जिल्हा परिषद/पंचायत समिती सदस्य राहण्यास अनर्ह/अपात्र ठरेन याची मला जाणीव आहे."

त्याऐवजी पुढीलप्रमाणे मजकूर समाविष्ट करण्यात आला आहे, असे वाचावे.

परिच्छेद १६.३(अ) " निवडून आल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात कसूर केल्यास माझी निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल आणि मी जिल्हा परिषद/पंचायत समिती सदस्य राहण्यास अनर्ह/अपात्र ठरेन याची मला जाणीव आहे." ३. उपरोक्त दिनांक १३ ऑगस्ट २०१८ च्या आदेशासोबतच्या अनुसूची-१ मधील परिच्छेद १६.३(अ) च्या खाली पुढीलप्रमाणे मजकूर नव्याने समाविष्ट करण्यात येत आहे :--

परिच्छेद १६.३(ब) मी निवडून आल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या मुदतीत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करीन, अशी हमी देत आहे.

मा. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार,

राजाराम झेंडे, सह सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र.

(१) भाग एक-(म.उ.वि.)--२६-१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIO- NERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 02 March 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-03-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-03-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A.