महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ५, अंक ४] मंगळवार, मार्च ५, २०१९/फाल्गुन १४, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक ४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
सन २०१९ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ४.----महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ यामध्ये आणखी पृष्ठे १--३ सुधारणा करण्याकरिता अध्यादेश . . . . . . . . . . . .
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ मार्च २०१९.
MAHARASHTRA ORDINANCE No. IV OF 2019.
AN ORDINANCE
FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA PUBLIC UNIVERSITIES ACT, 2016.
सन २०१९ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ४.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ यामध्ये आणखी सुधारणा
करण्याकरिता अध्यादेश.
ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही ;
२०१७ चा महा. ६.
आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ यांमध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे ;
(१)
भाग चार---४-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च ५, २०१९/फाल्गुन १४, शके १९४० त्याअर्थी, आता, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत :---
संक्षिप्त नाव व प्रारंभ.
१. (१) या अध्यादेशास, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, २०१९, असे म्हणावे. (२) तो, तात्काळ अंमलात येईल.
२०१७ चा महा. ६.
२. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ याच्या अनुसूचीच्या भाग एक मधील, नोंद १० मध्ये, स्तंभ (१) मधील, '' सोलापूर विद्यापीठ, सोलापूर '' या मजकुराऐवजी '' पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर '' हा मजकूर दाखल करण्यात येईल.
सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ याच्या अनुसूचीची सुधारणा.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च ५, २०१९/फाल्गुन १४, शके १९४० ३निवेदन.
शासकीय अधिसूचना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक सुएसजी. १००४-(९४/२००४)-सुएनआय-१, दिनांक २२ जुलै, २००४ अनुसार सोलापूर जिल्ह्यच्या भागासाठी २००४ या वर्षी सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अन्वये घटित करण्यात आले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे शिक्षण, साहित्य, प्रशासन, नेतृत्व व सामाजिक सुधारणा या क्षेत्रांतील बहुमोल व गौरवास्पद कार्य लक्षात घेता, सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने एक ठराव संमत करून, '' सोलापूर विद्यापीठ, सोलापूर '' याच्या नावाचा '' पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर '' असा नामविस्तार करण्याची शिफारस केली आहे, तसेच सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी लोकप्रतिनिधींकडूनही शासनाकडे निवेदने प्राप्त झाली आहेत.
२. सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचे नाव बदलण्यासंबधीचा निर्णय घेण्यासाठी मंत्री उप-समिती घटित करण्याच्या कृतीला जनहित याचिका (एस टी) क्रमांक ८४५८/२०१८ द्वारे मुंबई येथील उच्च न्यायालयात आव्हान देण्याते आले. उक्त जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान, शासनाच्या वतीने असे निवेदन करण्यात आले आहे की, सर्व संबंधित संघटनांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय, मंत्री उप-समिती कोणताही निर्णय घेणार नाही.
उक्त उप-समितीने सर्व संबंधित संघटनांना, आपले म्हणणे मांडण्याची संधी दिलेली आहे आणि उक्त विद्यापीठाचे '' पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर '' असे पुनर्नामांकरण करण्याचे ठरविले आहे. ३. उक्त उप-समितीचा अहवाल विचारात घेतल्यानंतर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ (२०१७ चा महा. ६) यामध्ये यथोचितरित्या सुधारणा करून, '' सोलापूर विद्यापीठ, सोलापूर '' याचा '' पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर '' असा नामविस्तार करणे इष्ट वाटते.
४. राज्य विधानमंडाळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ (२०१७ चा महा. ६) यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे, म्हणून हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे.
मुंबई, दिनांक ५ मार्च २०१९.
चे. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे राज्यपाल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सौरभ विजय, शासनाचे सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.