महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ५, अंक ३५] बुधवार, मार्च ६, २०१९/फाल्गुन १५, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ७५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, पहिला मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ मार्च २०१९
अधिसूचना
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६.
क्रमांक जमीन २०१८/प्र.क्र.९१ /ज-१.----महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (१९६६ चा महा. ४१) याच्या कलम ३२८, च्या पोट-कलम (१) आणि पोट-कलम (२) च्या खंड (चार), (दहा), (चौदा) आणि (त्रेसष्ठ) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व त्याबाबत समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने " महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, १९७१ " यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे, हे नियम उक्त संहितेच्या कलम ३२९ च्या, पोट-कलम (१) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे, यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
१. या नियमांना, " महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) (सुधारणा) नियम, २०१८ " असे म्हणावे.
२. महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम, १९७१ च्या नियम ७ च्या पोट-नियम (२) नंतर पुढीलप्रमाणे पोट-नियम समाविष्ट करण्यात येत आहे :-----
(३) (अ) राज्य शासनाच्या सामान्य किंवा विशेष आदेशास अधीन राहून पोट-नियम (१) अन्वये अथवा प्रारंभाच्या लगतपूर्वी अंमलात असलेल्या जमीन महसूल विषयक कोणत्याही विधिच्या उपबंधान्वये अथवा अन्यथा, क्रीडांगण किंवा खेळाचे मैदान, व्यायामशाळा, या प्रयोजनासाठी एक रुपया (रु. १) या नाममात्र दराने अथवा सवलतीच्या दराने वर्ाषिक भुईभाडे आकारून, भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीवरील भाडेपट्टयांचे नुतनीकरण मूळ जमीन प्रदान आदेशातील अटी व शतर्ींच्या अधीन राहून, अशा जमिनीवरील भाडेपट्टयांचे ३० वर्ष इतक्या कालावधीपयर्ंत, महाराष्ट्र मुद्रांक (संपत्तीचे वास्तविक बाजार मूल्य ठरवणे) नियम, १९९५ अन्वये प्रसिद्ध केलेल्या प्रचलित वर्ाषिक दर विवरण
(१)
भाग चार--ब----७५----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च ६, २०१९/फाल्गुन १५, शके १९४० पत्रानुसार अशा जमिनीच्या येणाया मुल्यांकनाच्या दहा टक्के रकमेच्या ०.१ टक्के इतकी रक्कम वर्ाषिक भुईभाडयाची रक्कम म्हणून आकारून नुतनीकरण करण्यास संबंधीत जिल्ह्यचे जिल्हाधिकारी सक्षम राहतील :-----
परंतु, बृहन्मुंबई क्षेत्रातील अशा भाडेपट्टयांचे नुतनीकरण राज्यशासनाची पूर्वमान्यता घेतल्याशिवाय जिल्हाधिकारी यांना करता येणार नाही :----
परंतु आणखी असे की, संबंधीत भाडेपट्टाधारकाने अशा भाडेपट्टयातील अटी व शतर्ींचा भंग केला असल्याचे निदर्शनास आल्यास, अशा भाडेपट्टयाचे नुतनीकरण, राज्यशासनाची पूर्वमान्यता घेतल्याशिवाय संबंधित जिल्हाधिकारी यांना करता येणार नाही.
(ब) या नियमांमधील तरतुदीनुसार किंवा अन्यथा, क्रीडांगण किंवा खेळाचे मैदान, व्यायामशाळा यांच्या उभारणीसाठी एक रुपया (रू. १) या नाममात्र दराने वर्ाषिक भुईभाडे आकारून अथवा सवलतीच्या दराने भूईभाडे आकारून भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या शासकीय जमिनींच्या भाडेपट्टयाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर, जर संबंधीत शासकीय जमीन शासनास अथवा शासनाच्या नामनिर्देशित कोणत्याही शासकीय यंत्रणांना, कोणत्याही सार्वजनिक प्रयोजनार्थ अथवा सार्वजनिक प्रकल्पाकरिता आवश्यक असेल, तर अशी जमीन परत ताब्यात घेण्याची मुभा जिल्हाधिकारी यांना राहील आणि अशा जमिनीच्या भाडेपट्टयाचे नुतनीकरण करणे जिल्हाधिकायास किंवा राज्य शासनास बंधनकारक राहणार नाही.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
राजेंद्र क्षीरसागर,
शासनाचे सह सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च ६, २०१९/फाल्गुन १५, शके १९४० ३REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 6th March 2019
NOTIFICATION
MAHARASHTRA LAND REVENUE CODE, 1966.
No. Jamin 2018/C.R.91/J-1.—In exercise of the powers conferred by sub-section (1) and clauses (iv),(x), (xiv), and (lxiii) of sub-section (2) of section 328 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) and all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend the Maharashtra Land Revenue (Disposal of Government Lands) Rules, 1971, the same having been previously published as required by sub-section (1) of section 329 of the said Code, namely :—
1. These rules may be called the Maharashtra Land Revenue (Disposal of Government Lands) (Amendment) Rules, 2019.
2. In rule 7 of the Maharashtra Land Revenue (Disposal of Government Lands) Rules, 1971, after sub-rule (2), the following sub-rule shall be added, namely :—
(3)(a) Subject to the general or special order of the State Government, leases granted under sub-rule (1) or under the provisions of any law relating to land revenue in force immediately before the commencement of the code or otherwise, for the purpose of playground or gymnasium at a nominal annual lease rent of one rupee (Rs.1) or at concessional rate, may be renewed by the Collector for a period of thirty years on the same terms and conditions specified in instrument of grant of lease, at annual lease rent of 0.1 per cent. of ten per cent. of market value of such land as per the current Annual Statement of Rates published under the provisions of the Maharashtra Stamp (Determination of True Market Value of Property) Rules, 1995 :
Provided that, such leases within the area of Greater Mumbai shall not be renewed by the Collector without prior approval of the State Government :
Provided further that, where it is found that the lessee has committed breach of the terms and conditions of such lease, the concerned Collector shall not renew such lease without the prior approval of the State Government.
(b) On expiry of lease period, if the land leased out for playground or gymnasium under the provisions of these rules or otherwise, at a nominal annual lease rent of one rupee (Rs.1) or at a concessional rate, is required by Government or any Government agency authorized by Government for any public purpose or public project then, such land may be resumed by the Collector and renewal of such lease shall not be binding upon the Collector or the State Government.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
RAJENDRA KSHIRSAGAR,
Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.