RNI No. MAHBIL / 13 / 2 / 2011 - TC
www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- अ- नाशिक विभाग वर्ष - ८ , अंक - १२ ]
बुधवार , मार्च ६ , २०१ ९ / फाल्गुन १५ , शके १ ९ ४०
[ पृष्ठे ०२
असाधारण क्रमांक १२
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचले . - ( १ ) मुख्याधिकारी , नगरपंचायत , मुक्ताईनगर यांचे पत्र क्रमांक नपमु/ जा.क्र. /२८७/२०१८ , दिनांक २ ९ ऑक्टोबर २०१८.
(२) या कार्यालयाकडील नोटिस क्रमांक पालिका-३/कावि-६ ९ ४/२०१८, दिनांक ६ नोव्हेंबर २०१८ .
( ३ ) दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ रोजी घेण्यात आलेली मा . जिल्हाधिकारी यांचेकडील सुनावणी.
(४ ) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १६ (१- ड) (अ) (ब) .
आदेश
क्रमांक पालिका-३ / कावि-६ ९ ४ /२०१८ . ज्याअर्थी, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक दिनांक १५ जुलै २०१८ रोजी झालेली असून , सदर निवडणुकीची मतमोजणी दिनांक २० जुलै २०१८ रोजी झालेली आहे .
तथापि, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाची माहिती शपथपत्रासह निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून तीस दिवसांच्या कालावधीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी , मुक्ताईनगर नगरपंचायत , मुक्ताईनगर यांचेकडे सादर करणे आवश्यक होते . त्याअनुषंगाने पुढील नमूद केलेल्या उमेदवारांनी निवडणूक कालावधीत केलेल्या खर्चाची माहिती प्रतिज्ञापत्रासह निवडणूक निर्णय अधिकारी , मुक्ताईनगर नगरपंचायत , मुक्ताईनगर यांच्याकडे विहित मुदतीत सादर केले नसलेबाबत मुख्याधिकारी , नगरपंचायत , मुक्ताईनगर यांनी या कार्यालयास अहवाल सादर केलेला आहे.
त्याअनुषंगाने पुढील नमूद केलेल्या उमेदवारांना त्यांचे म्हणणे मांडणेकामी उपोद्घातातील नमूद अ. क्र. २ अन्वये नोटिस देण्यात येऊन दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ रोजी सुनावणी घेण्यात आली, परंतु सदर सुनावणीस सदरचे उमेदवार हे गैरहजर आढळले , तसेच त्यांनी त्यांचा लेखी खुलासाही या कार्यालयास सादर केलेला नाही.
यास्तव , पुढील नमूद केलेल्या उमेदवारांना त्यांनी निवडणूक कालावधीत केलेल्या खर्चाची माहिती विहित मुदतीत प्रतिज्ञापत्रासह निवडणूक निर्णय अधिकारी, मुक्ताईनगर नगरपंचायत , मुक्ताईनगर यांच्याकडे सादर न केल्यामुळे त्यांना महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ चे कलम १६ (१ - ड) (अ) (ब) अन्वये निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून (दिनांक २० जुलै २०१८ पासून ) तीन वर्षांसाठी अनर्ह ठरविण्यात येत आहे.
(१)
वि (एच) ६८२ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , मार्च ६ , २०१ ९ / फाल्गुन १५ , शके १ ९४०
परिशिष्ट
अ. क्र.
उमेदवारांचे नाव
१
२
१
धनगर रविंद्र देविदास , राहणार मुक्ताईनगर
२
नाईक विजया दिपक , राहणार मुक्ताईनगर
३
बोदडे राजश्री विशाल, राहणार मुक्ताईनगर
४
खुरपडे पौर्णिमा पवन , राहणार मुक्ताईनगर
५
शाह जुबेर शाह निसार , राहणार मुक्ताईनगर
६
राणे रामचंद्र पुरुषोत्तम, राहणार मुक्ताईनगर
७
जाधव माधुरी आत्माराम , राहणार मुक्ताईनगर
किशोर राजे निंबाळकर , जिल्हाधिकारी , जळगाव.
जळगाव , २८ नोव्हेंबर २०१८ .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA .