महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--क
वर्ष ५, अंक ८ (२)] गुरुवार, मार्च ७, २०१९/फाल्गुन १६, शके १९४० [पृष्ठ १ किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ११
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिका-यांनी तयार केलेले
(भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर)
वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क),
जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील
इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन, मुंबई
अधिसूचना
क्रमांक एम सी आय एम/१९०३१/२०१९.------महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायी अधिनियम, १९६१ (सुधारणा २०१८) नुसार कलम २३ (अ) च्या पोट-कलम (१) मधील खंड (अ) मधील प्रयोजनाकरिता महाराष्ट्र भारतीय औषध परिषद, मुंबई नोंदणी नुतनीकरण प्रक्रीया सुरू करीत आहे.
सर्व नोंदणीकृत व्यवसायींनी, ज्यांनी नोंदणी किंवा नोंदणीचे नुतनीकरण ३१ डिसेंबर २०१५ रोजी किंवा त्यापूर्वी केलेले आहे, त्यांनी आपल्या नोंदणीचे नुतनीकरण महाराष्ट्र भारतीय औषध परिषद, मुंबईच्या www.mcimindia.org.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या विहीत प्रक्रीयेप्रमाणे करावी.
डॉ. दिलीप उत्तमराव वांगे,
मुंबई, दिनांक ७ मार्च २०१९.
प्रबंधक, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन, मुंबई.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.