Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Nagpur Part 1-A (7-3-2019) Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Chief Officer, nagar Parishad, Wanadongari. Extra Ordinary No. 16, Sr. No. 42 to 43.

Published 07 March 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-03-07.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi
Reg. No. NP CITY/236/2018-20.

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ५, अंक १६ ] गुरूवार मार्च ७, २०१९/फाल्गुन १६, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी

--------------- (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ---------------

भाग १-अ (असा.) (ना.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ४२.

अध्यक्षा, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६.

क्रमांक नपवा-३०७३-२०१९.----

ज्याअर्थी, मौजे वानाडोंगरी ग्रामपंचायतचे क्षेत्र ग्रामीण क्षेत्रातून वगळून नागरी क्षेत्रात समाविष्ट झाल्याने दिनांक २६-१०-२०१६ रोजी नगर परिषदेची नव्याने स्थापना झालेली आहे. वानाडोंगरी नगर परिषदेद्वारे नव्याने स्थापन झालेल्या नगर परिषद हद्दीची विकास योजना तयार करण्याबाबत इरादा न.प. विशेष सभा दिनांक ०७-०३-२०१९ ठराव क्र. १ अन्वये ठराव पारित करण्यात आला आहे. त्यानुसार वानाडोंगरी नगर परिषदेच्या क्षेत्राधिकाराकरिता महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६चे कलम २१ (२) सह २३ (१) अन्वये विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करण्यात येत आहे.

वानाडोंगरी नगर परिषदेद्वारे ज्या हद्दीची विकास योजना करावयाची आहे, त्या संपूर्ण क्षेत्राचा महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २३ (२) अन्वये हद्द दर्शविणारा नकाशा वानाडोंगरी, नगर परिषद कार्यालयात कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आला आहे.

नियोजित विकास योजनेचे अनुषंगाने नागरिकांकडून सूचना/हरकती मागविण्यात येत असून अशा हरकती/सूचना असतील तर हे जाहीर प्रकटन शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ६० दिवसांच्या (साठ दिवस) आत लेखी स्वरुपात वानाडोंगरी नगर परिषदेकडे देण्यात याव्यात. ना.-एक-अ-१ (३१८०). (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, मार्च ७, २०१९/फाल्गुन १६, शके १९४० त्यामध्ये वर उल्लेख केल्याप्रमाणे उक्त अधिनियमाचे कलम २३ (१) नुसार नगर परिषद त्यावर योग्य तो विचार करेल. उशिरा आलेल्या सूचना/

हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.

वानाडोंगरी :

दिनांक ७ मार्च २०१९.

वर्षाताई सतिश शहाकार, अध्यक्षा, नगर परिषद वानाडोंगरी.

-----------------------

भाग १-अ (असा.) (ना.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ४३.

BY PRESIDENT, NAGAR PARISHAD

MAHARASHTRA REGIONAL & TOWN PLANNING ACT, 1966.

NO. NPW-3073-2019.—

Whereas, by the Government Notification, Dated 26-10-2016 Wanadongari Nagar Parishad was newly form in Nagpur District. The Wanadongari Nagar Paishad by its Special General Body Resolution No. 01, Dated 07-03-2019 has declared its intention to prepare Development Plan as per the provisions of Section 21 (2) and Section 23 (1) of the Maharashtra Regional Town Planning Act, 1966, For the area within its Jurisdiction.

A copy of the plan showing the area for which Development Plan is to be prepared is kept open for inspection by the public on the working days at the Office Wanadongari Nagar Parishad Office to the Wanadongari Nagar Parishad as required under Section 23 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Suggestions or objections regarding boundaries of the said Development Plan, if any should communicated in writing to the Wanadongari Nagar Parishad Office within 60 days from the date of publication of declaration of the said intention in the Maharashtra Government Gazette as required under Section 23 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. Suggestion/Objection received after the given period will not be take into consideration.

Wanadongari :

VARSHATAI SATISH SAHAKAR, Dated the 7th March 2019.

President,

Nagar Parishad, Wanadongari.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT PRESS, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. Editore Dr. Namdeo Kondaji Bhosale.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 07 March 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-03-07.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-03-07.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A.