महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--ल
वर्ष ५, अंक १५] शुक्रवार, मार्च ८, २०१९/फाल्गुन १७, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक ३७
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक ८ मार्च २०१९
अधिसूचना
वाचा.---शासन अधिसूचना क्र. मुऔस. ६२०१६/प्र. क्र. १७७/कामगार-२, दिनांक ६ मार्च २०१९ क्रमांक मुऔस. ६२०१६/प्र. क्र. १७७/कामगार-२.------महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम, १९४६ (१९४७ चा ११) मधील कलम ८६- अ व ८६-ब अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्त्तींचा वापर करून बँकिंग रेग्युलेशन अधिनियम, १९४६ च्या तरतुदी लागू असलेल्या सहकारी बँकांच्या उद्योगाकरिता महाराष्ट्र राज्यासाठी शासन अधिसूचना क्र. मुऔस. ६२०१६/प्र. क्र. १७७/कामगार-२, दिनांक ६ मार्च २०१९ अन्वये वेतन मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे.
२. महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम, १९४६ (१९४७ चा ११) मधील कलम ८६-अ व ८६-ब अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्त्तींचा वापर करून, आता सदरहू वेतन मंडळावर या अधिसूचनेन्वये कामगार प्रतिनिधी म्हणून श्री. जयंत आदमने, ९९, बालाजी नगर, नागपूर व मालक प्रतिनिधी म्हणून श्री. अजय मुंदडा, चेअरमन, यवतमाळ अर्बन बँक, यवतमाळ यांची नियुक्त्ती करण्यात येत आहे.
३. तसेच क्र. मुऔस. ६२०१६/प्र. क्र. १७७/कामगार-२, दिनांक ६ मार्च २०१९ रोजीच्या अधिसूचनेतील अ. क्र. (१) मधील कामगार प्रतिनिधींच्या रकान्यात ""श्री. गोविंद येनुरे"" च्या ऐवजी ""श्री. मोहन येनुरे"" असे वाचावे. तसेच सदर रकान्यातील अ. क्र. (४) येथे ""श्री. भरत तांबळेकर"" च्या ऐवजी ""श्री. भारत तांबोळकर"" असे वाचावे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
श. मा. साठे, शासनाचे उप सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.