RNI No. MAHBIL /2009/35530
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ५, अंक ७] शनिवार, मार्च ९, २०१९/फाल्गुन १८, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक १०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
सन २०१९ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ८.--- महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, २०१६ यात पृष्ठे १-३ सुधारणा करण्यासाठी अध्यादेश.
. . . .
नगरविकास विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ मार्च २०१९.
MAHARASHTRA ORDINANCE No. VIII OF 2019.
AN ORDINANCE
TO AMEND THE MAHARASHTRA METROPOLITAN REGION
DEVELOPMENT AUTHORITY ACT, 2016.
सन २०१९ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ८.
महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, २०१६ यात
सुधारणा करण्यासाठी अध्यादेश.
ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही ;
२०१७ चा महा. ३.
आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, २०१६ यात सुधारणा करण्यासाठी, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे, अशी परिस्थिती अस्तित्वात आल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे ;
(१)
भाग चार----१०--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च ९, २०१९/फाल्गुन १८, शके १९४० त्याअर्थी, आता, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत :—
१. (१) या अध्यादेशास, महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (सुधारणा) अध्यादेश, २०१९, असे संक्षिप्त नाव व प्रारंभ. म्हणावे.
(२) तो, तात्काळ अंमलात येईल.
२. महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, २०१६ याच्या कलम ७ मधील, पोट-कलम २०१७ चा महा. ३.
(१) मध्ये, खंड (दहा) नंतर, पुढील खंड जादा दाखल करण्यात येईल :—
सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ७ ची सुधारणा.
"(अकरा) संबंधित महानगर प्रदेशाच्या क्षेत्रात समाजकल्याणाची कार्ये करणा-या आणि शासनाने मान्यता दिलेल्या, मान्यताप्राप्त अशासकीय संघटना आणि समुदाय आधारित संघटना यांच्या सदस्यांमधून, प्राधिकरणाने नामनिर्देशित केलेले, सहापेक्षा अधिक नसतील इतके इतर सदस्य :
परंतु, अशा व्यक्तींची, संबंधित महानगर प्रदेशाच्या अधिकार क्षेत्रात मतदार म्हणून नोंदणी केलेली असेल :
परंतु आणखी असे की, अशासकीय संघटनेच्या आणि समुदाय आधारित संघटनेच्या मान्यतेसाठीची मानके, सदस्य म्हणून नामनिर्देशनासाठीच्या आवश्यक अर्हता आणि त्यांना ज्या रीतीने नामनिर्देशित करावयाचे आहे ती रीत, राज्य शासन वेळोवेळी विर्िनदिष्ट करील त्याप्रमाणे असेल.".
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च ९, २०१९/फाल्गुन १८, शके १९४० ३निवेदन.
महानगर प्रदेशातील क्षेत्रांचे योग्य, सुव्यवस्थित व जलद विकासाचे नियोजन, समन्वयन व पर्यवेक्षण करण्याच्या प्रयोजनार्थ, त्या-त्या महानगर प्रदेशांकरिता महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे स्थापन करण्यासाठी, महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, २०१६ (२०१७ चा महा. ३) अधिनियमित करण्यात आला आहे.
२. त्या-त्या प्रदेशातील विकास कामांची व विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, त्या-त्या महानगर प्रदेशाच्या क्षेत्रांतर्गत समाजकल्याणाची कार्ये करणा-या वेगवेगळया अशासकीय संघटना व समुदाय आधारित संघटना यांसोबत काम करणा-या व्यक्तींची महानगर प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीवर नियुक्ती करण्यासाठी राज्याच्या विविध भागातील विविध लोकप्रतिनिधींकडून मागणी वाढत आहे.
३. म्हणून, प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीमध्ये, समाजकल्याणाच्या कार्यात गुंतलेल्या असतील अशा, प्राधिकरणाने नामनिर्देशित केलेल्या सहापेक्षा अधिक नसतील इतक्या सदस्यांचा समावेश असेल, अशी तरतूद करणे इष्ट वाटते. त्या कारणास्तव, उक्त अधिनियमाच्या कलम ७ च्या पोट-कलम (१) मध्ये यथोचित सुधारणा करणे इष्ट वाटते.
४. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, २०१६ (२०१७ चा महा. ३) यामध्ये सुधारणा करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे, अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे ; आणि, म्हणून, हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे.
मुंबई, दिनांक ९ मार्च २०१९.
चे. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे राज्यपाल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डॉ. नितीन करीर, शासनाचे प्रधान सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.