RNI No. MAHBIL /2009/35530
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ५, अंक ८(२)] रविवार, मार्च १०, २०१९/फाल्गुन १९, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक १४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
सन २०१९ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १२.--- स्पायसर अॅडवेनटिस्ट विद्यापीठ अधिनियम, २०१४ यामध्ये सुधारणा पृष्ठे (१-३) करण्याकरिता अध्यादेश. . .
. .
. .
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० मार्च २०१९.
MAHARASHTRA ORDINANCE No. XII OF 2019.
AN ORDINANCE
TO AMEND THE SPICER ADVENTIST UNIVERSITY ACT, 2014.
सन २०१९ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १२.
स्पायसर अॅडवेनटिस्ट विद्यापीठ अधिनियम, २०१४ यामध्ये सुधारणा करण्याकरिता अध्यादेश.
२०१४ चा महा. १४.
ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही ; आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, स्पायसर अॅडवेनटिस्ट विद्यापीठ अधिनियम, २०१४ यामध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे ;
(१)
भाग चार--१४-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च १०, २०१९/फाल्गुन १९, शके १९४० त्याअर्थी, आता, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत :---
१. (१) या अध्यादेशास, स्पायसर अॅडवेनटिस्ट विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, २०१९ असे म्हणावे.
संक्षिप्त नाव व प्रारंभ.
(२) या अध्यादेशात, अन्यथा तरतूद केली असेल त्याव्यतिरिक्त, तो तात्काळ अंमलात येईल.
२०१४ चा महा. १४.
२. स्पायसर अॅडवेनटिस्ट विद्यापीठ अधिनियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश '' मुख्य अधिनियम '' असा करण्यात आला आहे) याचे कलम ५१ ऐवजी, पुढील कलम बदली दाखल करण्यात येईल, आणि ते कायमस्वरूपी बदली दाखल करण्यात आल्याचे मानण्यात येईल.
२०१४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १४ मध्ये कलम ५१ बदली दाखल करणे.
'' ५१. (१) प्रयोजक मंडळाकडून देण्यात येणाया हमीच्या पूर्ततेची पडताळणी व सुनिश्चिती सचिवस्तरीय समिती. करण्यासाठी एक सचिवस्तरीय समिती असेल.
(२) उक्त समितीमध्ये, सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वित्त विभाग व नियोजन विभाग यांचा अंतर्भाव असेल. समिती राज्य शासनाला आपला अहवाल सादर करील. तो अहवाल विचारात घेतल्यानंतर, शासनास आवश्यक ते आदेश देता येतील.
३. मुख्य अधिनियमाच्या, अशा बदली दाखल करण्यात आलेल्या कलम ५१ नंतर, पुढील कलम जादा दाखल करण्यात येईल.
२०१४ चा महा. १४ मध्ये कलम ५२ जादा दाखल करणे.
शिक्षा.
'' ५२. या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन करणे हा अपराध ठरेल, आणि विद्यापीठ तसेच, कलम ११ खाली विर्िनदिष्ट केलेले विद्यापीठाचे सर्व अधिकारी, अशा अपराधाबद्दल तीन महिन्यापेक्षा कमी नसेल परंतु एक वर्षापयर्ंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या आणि पन्नास हजार रूपयांपेक्षा कमी नसेल परंतु पाच लाख रूपयांपयर्ंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र ठरतील :
२०१९ चा महा. अध्या. १२.
परंतु, या कलमातील कोणत्याही गोष्टीमुळे, मुख्य अधिनियमात स्पायसर अॅडवेनटिस्ट विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, २०१९ याद्वारे सुधारणा करण्यापूर्वी, त्या मुख्य अधिनियमाच्या तरतुदींचे अनुपालन न केल्याबद्दल विद्यापीठाच्या परिसमापनाच्या कारवाईसह कोणतीही कारवाई-मग ती दिवाणी असो किंवा फौजदारी असो, सुरू करण्यापासून शासनास प्रतिबंध होतो, असा त्याचा अन्वयार्थ लावण्यात येणार नाही.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च १०, २०१९/फाल्गुन १९, शके १९४० ३उद्देश
स्पायसर अॅडवेनटिस्ट विद्यापीठ अधिनियम, २०१४ याच्या कलम ५१ मध्ये, प्रायोजक मंडळाने दिलेल्या हमीनुसार उद्दिष्टांच्या पूर्ततेची पडताळणी करण्यासाठी व सुनिश्चिती करण्यासाठी एका सचिवस्तरीय समितीची तरतूद आहे. तसेच उक्त कलम ५१ मध्ये, सचिवस्तरीय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, विद्यापीठ सुरू करण्याची अधिसूचना काढण्याची देखील तरतूद आहे. उक्त विद्यापीठ दिनांक २६ जुलै २०१६ रोजी म्हणजे उक्त कलमान्वये राज्य शासनाने अधिसूचना निर्गमित केल्याच्या दिनांकापासून कार्यान्वित झाले आहे.
२. तथापि, असे निदर्शनास आले आहे की, उक्त कलम ५१ च्या तरतुदींच्या पुर्ततेपुर्वीच आणि अधिनियमाखालील आवश्यकता तसेच, त्याबाबतीतील विद्यापीठ अनुदान आयोगाची मार्गदर्शक तत्वे यांची पूर्तता न करता, शैक्षणिक सत्र २०१४-२०१५, पासून विद्यापीठाने विद्याथ्यार्ंना प्रवेश दिला आहे.
३. उक्त अधिनियमाच्या कलम ५१ अन्वये अधिसूचना काढण्यापूर्वीच विद्यापीठाने विद्याथ्यार्ंना प्रवेश दिलेला असल्याने, त्या विद्याथ्यार्ंचे प्रवेश अनियमित ठरले आहेत. तथापि, अधिसूचना निर्गमित करण्यापूर्वी म्हणजे, दिनांक २६ जुलै २०१६ पूर्वी, ज्या विद्याथ्यार्ंना प्रवेश देण्यात आला आहे त्या विद्याथ्यार्ंच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने उक्त कलम ५१ बदली दाखल करणे इष्ट वाटते.
विद्यापीठ व विद्यापीठाचे सर्व अधिकारी भविष्यात अधिनियमाच्या तरतुदींचे अनुपालन करतील याची सुनिश्चिती करण्यासाठी, विद्यापीठाने तसेच, विद्यापीठाच्या अधिकायांनी उक्त अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदींचे केलेले उल्लंघन हा अपराध असेल आणि अशा अपराधासाठी कारावासाची व द्रव्यदंडाची शिक्षा असेल. म्हणून उक्त अधिनियमामध्ये योग्य त्या सुधारणा करणे इष्ट वाटते.
४. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही, आणि, उपरोक्त प्रयोजनांसाठी, स्पायसर अॅडवेनटिस्ट विद्यापीठ अधिनियम, २०१४ (२०१४ चा महा. १४) यामध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे ; आणि, म्हणून, हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे.
मुंबई,
चे. विद्यासागर राव,
दिनांक ९ मार्च २०१९.
महाराष्ट्राचे राज्यपाल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सौरभ विजय,
शासनाचे सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.