RNI No. MAHBIL 2012/47976
www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ८ , अंक - ८ ]
सोमवार , मार्च ११ , २०१ ९ / फाल्गुन २० , शके १ ९ ४०
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक ८
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
प्रपत्र " क "
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका
जिल्हाधिकारी , पुणे ( गृह शाखा)
संदर्भ : ( १ ) शासन निर्णय क्रमांक सा.प्र.वि.क्र. विकाअ-२००७/४४०/प्र . क्र. १७४/२००७/५ , दिनांक २५ जुलै २००७ .
(२ ) शासन शुद्धीपत्रक, सामान्य प्रशासन विभाग , क्रमांक विकाअ-२००७ /प्र. क्र. ३८ ९/५ , दिनांक १५ जानेवारी २००८ .
( ३ ) शासन निर्णय , सामान्य प्रशासन विभाग , क्रमांक न्यायप्र-२०० ९ /प्र . क्र. १७४/५ , दिनांक २२ एप्रिल २०० ९ .
(४ ) शासन निर्णय , सामान्य प्रशासन विभाग क्रमांक विकाअ-२००८/प्र . क्र. २७६/५ , दिनांक २४ जुलै २००८.
(५ ) शासन परिपत्रक क्रमांक विकाअ-२०० ९/प्र . क्र. २७६/५ , दिनांक २४ जुलै २०० ९ .
( ६ ) शासन निर्णय क्रमांक विकाअ-२०१०/१५५०/प्र. क्र. ४८७/५ , दिनांक ३१ जानेवारी २०१० .
(७ ) शासन निर्णय , सामान्य प्रशासन विभाग क्रमांक विकाअ-१११५/प्र. क्र. ८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५ .
( ८ ) कक्ष अधिकारी , महाराष्ट्र शासन, पुणे यांचेकडील पत्र क्रमांक विकाअ-१११६/ ८८/प्र. क्र. ५३/का. ५ , दिनांक २० जून २०१६ रोजीचे पत्र.
क्रमांक पगम/एसआर-१०/२०१ ९ . संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मी , नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे , जिल्हा पुणे आता सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती ही त्यांच्या वयाच्या ७० वर्षांपर्यंत चालू राहील व वयाच्या ७० वर्षांनंतर त्यांना अनर्ह ठरविण्यात येईल अथवा पुढील आदेश होईपर्यंत अस्तित्वात राहील . तसेच राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही , कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील . ही मुदत संपताच किंवा ती त्यापूर्वी संपुष्टात आणण्यात आल्यास विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित पोलीस ठाणे किंवा जिल्हाधिकारी , पुणे यांचे कार्यालयापुढे तात्काळ परत करणेची प्राथमिक जबाबदारी सर्वस्वी संबंधित विशेष कार्यकारी अधिकाऱ्याची राहील.
(१)
एच-६८ ९ , भाग एक-असा. ( पु.वि.पु.)- ८ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक असाधारण-- पुणे विभागीय पुरवणी , ११ मार्च, २०१ ९ / फाल्गुन २० , शके १९४० २. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील .
(एक) साक्षांकनाचे काम
विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ " साक्षांकनाचे " काम करतील. मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये . तसेच परिशिष्ट " ५ " मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतींवर न चुकता दिनांकासहित साक्षांकन करावे. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये . वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर " सत्य प्रत " म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामांकरिता " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील . अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल.
(दोन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी " असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला कोणतेही मानधन अथवा वेतन/ भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत .
(तीन ) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर , दुकानावर , कार्यालयावर स्वतःच्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा . त्यांच्या नियुक्तीबाबत कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत. तथापि, त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये.
(चार) " ओळख परेड " तसेच " मृत्युपूर्व जबानी " यासाठी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये .
(पाच) " उत्पन्नाचे प्रमाणपत्र " देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना नसतील .
(सहा) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्हाधिकारी यांचेकडे तात्काळ परत करावे अन्यथा अशी व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीसाठी अपात्र ठरेल .
(सात) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजीकच्या तहसीलदार कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावा . तसेच साक्षांकित केलेल्यांची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी व ज्या वेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी मागणी संबंधित पोलीस आयुक्त/जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडून केली जाईल त्यावेळी ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.
अनुसूची
गुणवंत कामगार
उमेदवारांची नावे
पत्ता
नियुक्ती क्रमांक
अनु. क्र.
१
४
२
३
श्री. शामकांत वसंतराव नांगरे
१ ४३
रा . मु. पो . राजुरी , तालुका जुन्नर, जिल्हा पुणे .
४४
२
श्री. उद्धव रेवणप्पा कानडे
रा . बिबवेवाडी, पुणे .
श्री. भास्कर श्रीरंग गायकवाड
३ ४५
४ ४६
श्री. प्रकाश जगन्नाथ कुलकर्णी
रा . शिवदीप अपार्टमेंट , सर्व्हे नंबर १ ९/३-अ , प्लॉट नंबर ५ , फ्लॅट नंबर २ , मौजे गारमाळ , धायरी , पुणे-४१ . रा . फ्लॅट नंबर २ , स्नेह अपार्टमेंट्स, सर्व्हे नंबर ८ , तपोधाम रोड, वारजे , पुणे.
नवल किशोर राम, जिल्हाधिकारी , पुणे .
पुणे , ७ मार्च २०१९ .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA.