Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, पुणे यांजकडून आलेली पुणे जिल्ह्यातील विशेष कार्यकारी अधिकारी यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे.

Published 12 March 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-03-12.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL 2012/47976

www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ८ , अंक - ९ ]

मंगळवार , मार्च १२ , २०१ ९ / फाल्गुन २१ , शके १ ९ ४०

[ पृष्ठे २

असाधारण क्रमांक ९

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

प्रपत्र 'ड'

विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका

जिल्हाधिकारी , पुणे ( गृह शाखा)

क्रमांक पगम/ एसआर -११ /२०१ ९ .-- जिल्हाधिकारी, पुणे जिल्हा , पुणे या आदेशाद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पात्र व्यक्तींची पुणे जिल्ह्याचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यतः हा निर्णय निर्गमित केलेच्या तारखेपासून ५ वर्षांकरिता अथवा पुढील आदेश होईपर्यंत अस्तित्वात राहील , तसेच राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही , कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील .

२. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील .

(एक) साक्षांकनाचे काम

विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ " साक्षांकनाचे " काम करतील . मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये, तसेच परिशिष्ट " ५ " मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतींवर न चुकता दिनांकासहित साक्षांकन करावे . मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये . वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर " सत्य प्रत " म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामांकरिता " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल.

(दोन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी " असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला कोणतेही मानधन अथवा वेतन/ भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.

(तीन ) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर , दुकानावर , कार्यालयावर स्वतःच्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा . त्यांच्या नियुक्तीबाबत कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत. तथापि , त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये .

(चार) " ओळख परेड " तसेच " मृत्युपूर्व जबानी " यासाठी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये.

(पाच) " उत्पन्नाचे प्रमाणपत्र " देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना नसतील .

(१)

एच-६ ९ ० , भाग एक- असा . (पु.वि.पु. )- ९ २ महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक असाधारण- पुणे विभागीय पुरवणी , १२ मार्च, २०१ ९ / फाल्गुन २१ , शके १ ९४०

(सहा) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्ह्याधिकारी यांचेकडे तात्काळ परत करावे . अन्यथा अशी व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीसाठी अपात्र ठरेल.

(सात) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजीकच्या तहसीलदार कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावा , तसेच साक्षांकित केलेल्यांची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी व ज्या वेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी मागणी संबंधित पोलीस आयुक्त/जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडून केली जाईल त्यावेळी ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.

अनुसूची अ. क्र.

पत्ता

उमेदवारांची नावे

नियुक्ती क्रमांक

१

२

३ १

१८ ९०

४

सौ . ज्योती अर्जुन रायकर

रा . स . नं . १५/२ , गोंधळेनगर , हडपसर , पुणे -२८.

श्री . राकेश राजेंद्र गायकवाड

२

१८९१

श्री. चैतन्य हर्षद शहा ३

१८९ २

४

१८९३

श्री. प्रसाद काळुराम मते

श्री . समीर अनिल रुपदे ५

१८ ९४

रा . २२/४६ , गोविंद अपार्टमेंट , बालाजीनगर , धनकवडी, पुणे.

रा. खडकी, १५६ , जुना बाजार, खडकी, पुणे-३.

रा. १००३ , ए-१ , गंगा भाग्योदय , माणिकबाग, सिंहगड राड, पुणे .

रा . ए -४ /१४ , सनसिटी सोसायटी, आनंदनगर , सिंहगड रोड , पुणे .

श्री. विवेकानंद श्रीराम रानडे

६

१८ ९५

७

१८९६

रा . ५०० /ब , नारायण पेठ , ब्लॉक क्रमांक ६ , सुवर्णगंगा सोसायटी, पुणे .

श्री. शामकुमार मुकुंद कदम

८

रा . श्रावस्तीनगर , स. नं. ७४ , घोरपडी गाव , पुणे -१ .

सौ. साधना लक्ष्मण शितोळे

१८९७

रा . पडवी , तालुका दौंड , पुणे.

श्री. महेंद्र भवानजी रुपरेल

९

१८ ९ ८

१०

श्री . हर्षल राजेंद्र मोरे

१८९९

रा . ११ ९ ४/२७ , कमला क्लासिक अपार्टमेंट , घोले रोड, पुणे -५ .

रा . डेक्कन जिमखाना, पुणे .

श्रीमती उज्वला गणेश यादव

११

१९००

पुणे , ११ मार्च २०१९ .

रा. ९ ३/९ ४ , सोमवार पेठ, पुणे.

नवल किशोर राम , जिल्हाधिकारी, पुणे.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 12 March 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-03-12.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-03-12.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1.