महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ५, अंक ७] गुरुवार, मार्च १४, २०१९/फाल्गुन २३, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक १०
प्राधिकृत प्रकाशन
बृहन्मुंबई महानगरपालिका
अधिसूचना
क्रमांक MGC/F/8710
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी, २०१७ नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक ९१ मधून श्री. सगुण वसंत नाईक निवडून आले होते. त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे दिनांक २० जून २०१८ पासून त्यांचे नगरसेवक पद आपोआप रद्द झाल्याचे औपचारिक आदेशाचे पत्र देण्यात आले होते.
उच्चतम द्वितीय क्रमांकाची मते मिळवणारे उमेदवार श्री. शेख मोहम्मद रफीक मुस्तफा हुसेन यांनी लघुवाद न्यायालयात याचिका क्रमांक EP/65/2017 दाखल केली होती. यामध्ये विजयी उमेदवार श्री. सगुण वसंत नाईक यांच्या जातीचे प्रमाणपत्राच्या वैधतेचा मुद्दा उपस्थित केला होता.
सदर प्रकरणी मा. लघुवाद न्यायालयाने याचिका क्रमांक EP/65/2017 ची सुनावणी घेऊन दिनांक ७ मार्च २०१९ रोजी श्री. सगुण वसंत नाईक यांची नगरसेवकपदी झालेली निवड दिनांक २३ फेब्रुवारी २०१७ पासून रद्दबातल करण्यात येत आहे आणि श्री. शेख मोहम्मद रफीक मुस्तफा हुसेन यांना विजयी घोषित करण्यात येत आहे, असे आदेश दिले आहेत.
यास्तव, श्री. शेख मोहम्मद रफीक मुस्तफा हुसेन (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांना दिनांक ७ मार्च २०१९ पासून प्रभाग क्रमांक ९१ मधून निर्वाचित घोषित करण्यात येत आहे.
मुंबई, दिनांक १४ मार्च २०१९.
अजोय मेहता, महापालिका आयुक्त.
(१) ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.