RNI No. MAHBIL/2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ५, अंक १८] गुरुवार, मार्च १४, २०१९/फाल्गुन २३, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ३९
प्राधिकृत प्रकाशन
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका
जिल्हाधिकारी, ठाणे यांजकडून आदेश वाचा.---(१) शासनाचे सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. विकाअ-१११५/प्र.क्र. ८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५.
(२) मा. पालकमंत्री, ठाणे जिल्हा यांचेकडील पत्र क्र. मंत्री/सा.बां. (सा.उ.)/व्हीआयपी/जा.क्र. ३११०६५८/१८, दिनांक २४ मे २०१८.
(३) मा. उप सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडे या कार्यालयाकडील पाठविलेले पत्र क्र. गृह/क. १/टे. ३/विकाअ/ कावि-२२८९५/१८, दिनांक ५ जुलै २०१८.
(४) मा. अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन, यांचेकडील पत्र क्र. विकाअ-१११८/२३०/प्र.क्र. १४८/५, दिनांक १० जानेवारी २०१९.
क्रमांक गृह/क. १/टे.६/विकाअ/कावि-२७४८(३४)/१९.-----उपोद्घातातील शासन निर्णय अ.क्र. (१) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मी, राजेश ज. नार्वेकर, जिल्हादंडाधिकारी, ठाणे खालील नमूद केलेल्या अनुसूचिमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या ठाणे जिल्ह्यतील मा. पालकमंत्री यांचेकडून उपोद्घातातील क्र. (२) अन्वये शिफारस प्राप्त झालेल्या एकूण ३४ उमेदवारांची ठाणे जिल्ह्यचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून उपोद्घातातील क्र. (४) अन्वये नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यत: आदेश निर्गमित केल्याच्या तारखेपासून ५ वषार्ंकरिता अथवा पुढील आदेश होईपयर्ंत यापैकी जे आधी घडेल तोपयर्ंत अस्तित्वात राहील. तसेच राज्य शासन, जिल्हादंडाधिकारी, ठाणे यांस विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील.
२. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील :----
(एक) साक्षांकनाचे काम.------ विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ "साक्षांकनाचे" काम करतील. मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये. तसेच उपोद्घातातील शासन निर्णयामधील परिशिष्ट "५" मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतीवर न चुकता दिनांकासहित साक्षांकन करावे. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करु नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर "सत्य प्रत" म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाया सर्व प्रकारच्या परिणामांकरिता " विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुर्ननियुक्तीस अपात्र असेल.
३. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती "मानसेवी" असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकायाला कोणतेही मानधन अथवा वेतन/भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.
(१)
भाग एक (को.वि.पु.)—३९-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १४, २०१९/फाल्गुन २३, शके १९४० ४. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर, दुकानावर, कार्यालयावर स्वत:च्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा. त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत. तथापि, त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये.
५. नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकायाने साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्हाधिकारी यांचेकडे तात्काळ परत करावे. अन्यथा अशी व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुर्ननियुक्तीसाठी अपात्र ठरेल. नियुक्तीचा कालावधी संपल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकायाने साक्षांकन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्याचेविरुद्ध जिल्हाधिकारी यांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवावा.
अनुसूची
वर्ष शासन आधारकार्ड नंबर अ.क्र. अर्जदाराचे नाव
स्थायी पत्ता निर्णया- नुसार जिल्हा क्रमांक
(१) (२) (३) (४) (५)
(६)
ं
,
2019
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १४, २०१९/फाल्गुन २३, शके १९४० ३अनुसूची
(१) (२) (३) (४) (५)
(६)
मु
2019
ठाणे, दिनांक २ मार्च २०१९.
राजेश ज. नार्वेकर, जिल्हादंडाधिकारी, ठाणे.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.