Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ext. No. 93 (20th March 2019) : नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळ यांची कलम 12 द्वारे प्रदान केलेलेल्या अधिकाराचा वापर करून प्रथम बैठक दिनांक 1 एप्रिल 2019 रोजी दुपारी 2-30 वा. एस.जी.पी.सी. गेस्ट हाऊस, नांदेड येथे घेणेबाबत अधिसूचना

Published 20 March 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-03-20.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च ८, २०१९/फाल्गुन १७, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ५, अंक ४०] बुधवार, मार्च २०, २०१९/फाल्गुन २९, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ९३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त), नियम व आदेश.

महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २० मार्च २०१९

अधिसूचना

क्रमांक जीयुआर-२०१८/प्र.क्र.६७/ज-७ (अ).-----ज्याअर्थी, दि नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब अधिनियम, १९५६ (१९५६ चा हैद्राबाद अधिनियम ३७) (यात यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा केला आहे.) याच्या कलम ६ च्या पोट-कलम (४) व (५) तसेच कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून अधिसूचना, महसूल व वन विभाग क्र.जीयुआर-२०१८/प्र. क्र.६७/ज-७ (अ), दि. ८ मार्च २०१९ या अन्वये महाराष्ट्र शासनाने " नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळ " (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त मंडळ " असा करण्यात आला आहे.) गठित केले आहे व सदर अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, दिनांक ८ मार्च २०१९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम १२ द्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून उक्त मंडळाची प्रथम बैठक दिनांक १ एप्रिल २०१९ रोजी दुपारी २.३० वा. एस.जी.पी.सी. गेस्ट हाऊस, नांदेड येथे ठेवण्यात आली आहे.

शासन असाही आदेश देत आहे की, उक्त मंडळाचे प्रथम बैठकीचे आयोजनासंबंधी इतर आवश्यक कार्यवाही जिल्हाधिकारी, नांदेड यांच्यामार्फत करण्यात येईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रविराज फल्ले, शासनाचे उप सचिव.

(१) भाग चार--ब--९३--१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 20 March 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-03-20.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-03-20.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.