महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-क
वर्ष ५, अंक १४] शुक्रवार, मार्च २२, २०१९/चैत्र १, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक १९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले
(भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर)
वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क),
जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील इतर
प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन, मुंबई
नोंदणीच्या नूतनीकरणाविशयी महत्वाची सूचना
क्रमांक एमसीआयएम/१९०३४८१/२०१९.– महाराश्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन मधील नोंदणी—त वैद्यकीय व्यवसायींच्या नोंदणीच्या नूतनीकरण प्रक्रियेला सुरुवात झाली असून या नोंदणी नूतनीकरण प्रक्रियेसोबतच आपली सर्व माहिती परिशदेद्वारा सुरु करण्यात आलेल्या MCIM TATPAR या अॅप्लिकेषनच्या माध्यमातून नूतनीकरण अर्जामध्ये भरावयाची आहे. त्याचसोबत छायाचित्र, स्वाक्षरी व आवष्यक कागदपत्रे सुद्धा विनिर्दिश्ट पद्धतीने अॅप्लिकेषनमध्ये अपलोड करावयाची आहेत.
अॅप्लिकेषन च्या लिंक खालीलप्रमाणे आहेत : – Website/ Desktop – http://bit.ly/mcimwebapp Android Application – http://bit.ly/mcimandroidapp IOS Application – http://bit.ly/mcimiosapp २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, मार्च २२, २०१९/चैत्र १, शके १९४१ वेगळे शुल्क भरावयाची आवष्यकता राहणार नाही. त्याचबरोबर आपल्या नावातील बदल व पत्त्यामधील बदल हे सुद्धा कुठलेही शुल्क न आकारता परिशदेद्वारा निःषुल्क केले जाणार आहे याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी.
जे वैद्यकीय व्यवसायी दि. 18 एप्रिल 2019 पूर्वी या अॅप्लिकेषनच्या माध्यमातून नोंदणी नूतनीकरणाचा अर्ज भरुन शुल्काचा भरणा करतील त्यांनाच परिशदेद्वारा जिल्हास्तरावर प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी उभारण्यात येणाया नोंदणी नूतनीकरण केंद्रावर प्रत्यक्ष पडताळणी, कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्याची सुविधा उपलब्ध राहील. प्रत्यक्ष पडताळणी व कागदपत्रांचे स्कॅनिंग झाल्यानंतर नूतनीकरण केंद्रावरच आपल्याला नवीन नोंदणी प्रमाणपत्र, ओळखपत्र व माहिती पुस्तिका हस्तांतरित करण्यात येणार असून आपले जुने नोंदणी प्रमाणपत्र व ओळखपत्र त्याठिकाणी जमा करावयाचे आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आपल्या नोंदणीचे नूतनीकरण पूर्ण झाले असे समजण्यात येईल.
दि. 18 एप्रिल 2019 नंतर अर्ज व शुल्क भरणाया वैद्यकीय व्यवसायींना प्रत्यक्ष पडताळणीकरिता मुंबई येथे परिशदेच्या कार्यालयामध्ये वेळ घेऊन स्वतः उपस्थित राहावे लागेल याची सुद्धा सर्व वैद्यकीय व्यवसायींनी नोंद घ्यावी.
दि. 31 डिसेंबर 2015 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वैद्यकीय व्यवसायींनी दि. 31 जानेवारी 2019 रोजी शासनाद्वारे प्रकाषित राजपत्रानुसार रु. 2,000/- नोंदणी नूतनीकरण शुल्क भरुन नोंदणीचे नूतनीकरण करावे लागेल. सदर नोंदणी नूतनीकरण अर्ज व शुल्क भरण्यास महाराश्ट्र वैद्यकीय व्यवसायी अधिनियम, 1961 सुधारणा 2018 मधील नोंदणी नूतनीकरणाच्या संदर्भात असणाया तरतूदीनुसार निर्धारित कालमर्यादेपेक्षा अधिक विलंब झाल्यास उपरोक्त राजपत्रातील तरतूदीनुसार रु. 3,500/- अधिक रु. 100/- प्रति महिना यानुसार विलंब शुल्क आकारण्यात येईल याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी.
दि. 01 जानेवारी 2016 व त्यानंतर नोंदणी झालेल्या वैद्यकीय व्यवसायींनीसुद्धा या प्रक्रियेत सहभागी होणे अपेक्षित असून त्यांना नवीन नोंदणी प्रमाणपत्र, ओळखपत्र व माहिती पुस्तिका तसेच प्रत्यक्ष पडताळणी व कागदपत्रांचे स्कॅनिंग ही सुविधा कुठलेही शुल्क भरल्याषिवाय उपलब्ध राहणार असून त्यांच्या नोंदणीच्या नूतनीकरणासाठी अपेक्षित असणाया दिनांकाला अर्थात त्यांची नोंदणी झाल्याच्या दिनांकापासून पाच वर्शानंतरच्या दिनांकाला नोंदणी नूतनीकरणाचे शुल्क ऑनलाईन भरावे लागेल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
सर्वांनी आपल्या नोंदणीचे नूतनीकरण या प्रक्रियेमध्ये तात्काळ करुन घ्यावे. आपल्या नोंदणीचे नूतनीकरण न झाल्यास महाराश्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम, 1961 तथा अन्य कायद्यांच्या तदतूदींनुसार अडचण उ॰वल्यास वैद्यकीय व्यवसायी स्वतः त्यासाठी जबाबदार राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी.
डॉ. दिलीप उत्तमराव वांगे, प्रबंधक, महाराश्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन, मुंबई.