Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-L Ext. No. 45 (3rd April 2019), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकाने व आस्थापना वगळून सर्व आस्थापना 7-00 ते 6-00 या वेळेत बंद ठेवण्याबाबत अधिसूचना.

Published 03 April 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-04-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, एप्रिल ३, २०१९/चैत्र १३, शके १९४१ १ RNI No. MAHBIL /2009/31747

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--ल

वर्ष ५, अंक १७] बुधवार, एप्रिल ३, २०१९/चैत्र १३, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १६.००

असाधारण क्रमांक ४५

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडे.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ एप्रिल २०१९

अधिसूचना

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७.

क्रमांक एमएसए. ०३/२०१९/प्र.क्र.६३/ कामगार-१०.----महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ (महा. ६१/२०१७), (यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा करण्यात आलेला आहे) च्या कलम ११ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, तसेच अवर सचिव, भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या दिनांक २२ मार्च २०१९ च्या पत्रात नमूद करण्यात आल्यानुसार, महाराष्ट्र शासन, याद्वारे, असे आदेश देत आहे की, महाराष्ट्र राज्यात दिनांक ११ एप्रिल, २०१९ ते दिनांक २९ एप्रिल, २०१९ या चार टप्प्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुका, २०१९ होत असल्याने, या अधिसूचनेसोबतच्या अनुसूचीत नमूद केल्यानुसार, त्या त्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांमध्ये, अत्यावश्यक सेवा देणाया दुकाने व आस्थापना वगळून, सर्व आस्थापना सकाळी ७-०० ते संध्याकाळी ६-०० या वेळात बंद ठेवण्यात याव्यात. तसेच त्या दिवशी बंद राहिलेल्या दुकाने/आस्थापनांमधील कर्मचायांच्या वेतनातून कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये.

परिशिष्ट १

मतदानाचे टप्पे मतदानाचा दिनांक लोकसभा मतदारसंघाचे नाव पहिला टप्पा दिनांक ११ एप्रिल, २०१९ ८ वर्धा, ९ रामटेक, १० नागपूर, ११ भंडारा-गोंदिया,

१२ गडचिरोली-चिमुर, १३ चंद्रपूर, १४ यवतमाळ-वाशिम.

दुसरा टप्पा दिनांक १८ एप्रिल, २०१९ ५ बुलढाणा, ६ अकोला, ७ अमरावती, १५ हिंगोली, १६ नांदेड, १७ परभणी, ३९ बीड, ४० उस्मानाबाद, ४१ लातूर, ४२ सोलापूर.

(१) भाग एक--ल-----४५-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, एप्रिल ३, २०१९/चैत्र १३, शके १९४१ परिशिष्ट १--समाप्त मतदानाचे टप्पे मतदानाचा दिनांक लोकसभा मतदारसंघाचे नाव

तिसरा टप्पा दिनांक २३ एप्रिल, २०१९ ३ जळगाव, ४ रावेर, १८ जालना, १९ औरंगाबाद,

३२ रायगड, ३४ पुणे, ३५ बारामती, ३७ अहमदनगर, ४३ माढा, ४४ सांगली, ४५ सातारा, ४६ रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ४७ कोल्हापूर, ४८ हातकणंगले.

चौथा टप्पा दिनांक २९ एप्रिल, २०१९ १ नंदुरबार, २ धुळे, २० दिंडोरी, २१ नाशिक, २२ पालघर,

२३ भिवंडी, २४ कल्याण, २५ ठाणे, २६ मुंबई उत्तर, २७ मुंबई उत्तर-पश्चिम, २८ मुंबई उत्तर-पूर्व, २९ मुंबई उत्तर- मध्य, ३० मुंबई दक्षिण-मध्य, ३१ मुंबई-दक्षिण, ३३ मावळ, ३६ शिरुर, ३८ शिर्डी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. महेंद्र कल्याणकर, शासनाचे सहसचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 April 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-04-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-04-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.