RNI No. MAHBIL/2009/31743
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार--ब
वर्ष ५, अंक १४] गुरुवार ते बुधवार, एप्रिल ४-१०, २०१९/चैत्र १४-२०, शके १९४१ [पृष्ठे २०, किंमत : रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत :-----
१४५
बुधवार, मे १८, २०१६/वैशाख २८, शके १९३८
सामान्य प्रशासन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ मे २०१६
अधिसूचना
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५.
क्रमांक संकीर्ण २०१५ / प्र. क्र. १३५ / १८ (र. व का.).----महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ (२०१५ चा महा. ३१) याच्या कलम २८ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन प्रस्तावित करीत असलेला महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम, २०१६ या नियमांचा पुढील मसुदा हा, उक्त कलम २८ च्या पोट-कलम (१) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे सदर नियम ज्यांना लागू ठरण्याची शक्यता आहे. अशा सर्व व्यक्तींच्या माहितीकरिता, याव्दारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येत आहे की, उक्त मसुदा, महाराष्ट्र शासनाकडून दिनांक १६ जून २०१६ रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल.
२. उपरोक्त दिनांकापूर्वी, उक्त मसुद्याच्या संबंधात, कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना, अपर मुख्य सचिव (प्र. सु., र. व का.), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ यांच्याकडे प्राप्त होतील, त्या शासन विचारात घेईल.
नियमांचा मसुदा
१. संक्षिप्त नाव.---- या नियमांना, महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम, २०१६ असे म्हणावे.
२. व्याख्या.----- (१) या नियमांमध्ये संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,-----
(अ) " अधिनियम " याचा अर्थ, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ असा आहे, (ब) " नमुना " याचा अर्थ, या नियमांना जोडलेले नमुने असा आहे, (क) " कलम " याचा अर्थ, अधिनियमाचे कलम, असा आहे.
(२) या नियमांमध्ये वापरलेले परंतु व्याख्या न केलेले व अधिनियमामध्ये व्याख्या केलेले शब्द व शब्दप्रयोग यांना अधिनियमामध्ये अनुक्रमे जे अर्थ नेमून दिलेले असतील तेच अर्थ असतील.
(१)
भाग चार--ब---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ४-१०, २०१९/चैत्र १४-२०, शके १९४१ ३. सूचना फलकावर माहिती प्रर्दशित करणे.------ (१) प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण, त्याच्याकडून पुरविण्यात येणा-या लोकसेवांची सूची, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिलीय प्राधिकारी, व्दितीय अपिलीय प्राधिकारी यांची नावे, नमुना किंवा शुल्क असल्यास, त्याबाबतची माहिती त्यांच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर, शासनाचे पोर्टल असल्यास त्यावर तसेच विभागाच्या / कार्यालयाच्या संकेत स्थळावर प्रर्दशित करील किंवा प्रर्दशित करण्याची व्यवस्था करील.
(२) सेवा प्राप्त करण्यासाठी अर्जासोबत जोडावयाच्या सर्व आवश्यक कागदपत्रांची यादी आणि या नियमांना जोडलेले नमुने देखील कार्यालयाच्या सूचना फलकावर, शासनाचे पोर्टल असल्यास त्यावर तसेच विभागाच्या / कार्यालयाच्या संकेत स्थळावरसुद्धा प्रर्दशित करण्यात येईल.
(३) अशी माहिती मराठी भाषेत तसेच जेथे आवश्यक असेल तेथे इंग्रजी भाषेमध्ये प्रर्दशित करण्यात येईल. तसेच पदनिर्देशित अधिका-याच्या कार्यालयात येणा-या अभ्यागताला ती सहजपणे पाहता येईल अशा ठिकाणी लावण्यात येईल.
(४) सार्वजनिक ठिकाणी / कार्यालयात / संकेत स्थळावर / पोर्टलवर अशी माहिती प्रसिद्ध केली नसेल तर मुख्य आयुक्त किंवा संबंधित आयुक्त स्वत: त्याची दखल घेतील आणि संबंधित कार्यालय किंवा विभाग किंवा पदनिर्देशित अधिका-याच्या विरोधात यथोचित कारवाई करतील.
४. निवडणुकीच्या कालावधी दरम्यान तसेच नैर्सगिक आपत्तींच्या वेळी नियत कालमर्यादा वाढवणे.----स्थानिक प्राधिकरणे, राज्य विधानमंडळे, संसद यांच्या निवडणुकांच्या वेळी किंवा भूकंप, पूर, अतिवृष्टी, आग यांसारख्या नैर्सगिक आपत्तींच्या वेळी, आवश्यक असेल तर, अधिनियमाच्या कलम ३ अन्वये संबंधित प्रशासकीय विभागास, सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेने, आदेश निर्गमित करून अधिसूचित लोकसेवेसाठी कालमर्यादा वाढवून घेता येईल.
५. अर्ज स्वीकारण्याकरिता पदनिर्देशित अधिका-याने अन्य अधिका-यास प्राधिकृत करणे.-----पदनिर्देशित अधिका-यास, पात्र व्यक्तींनी, या अधिनियमांतर्गत अधिसूचित केलेली कोणतीही सेवा प्राप्त करण्यासाठी केलेले अर्ज स्वीकारण्याकरिता आणि त्या अजार्ंची रीतसर पोच देण्याकरिता, त्यास दुय्यम असलेल्या कोणत्याही अधिका-यास किंवा कर्मचा-यास, आदेशाव्दारे, प्राधिकृत करता येईल. अशा रीतीने अर्ज स्वीकृत करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेल्या दुय्यम अधिका-याचे किंवा कर्मचा-याचे नाव विभागाच्या किंवा कार्यालयाच्या संकेतस्थळावर किंवा पोर्टलवर प्रर्दशित केले जाईल.
६. अर्जदारास पोच देणे.----पात्र व्यक्तीकडून लोकसेवेसाठीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर, यथास्थिती पदनिर्देशित अधिकारी किंवा प्राधिकृत दुय्यम अधिकारी किंवा कर्मचारी व्यक्ती अर्जाची पडताळणी करून अर्जदारास नमुना एक मध्ये पोच देईल. जर सेवा पुरविण्यासाठी आवश्यक असलेले एखादे कागदपत्र अर्जासोबत जोडलेले नसेल तर, पोच पावती देताना त्यात तसे स्पष्ट नमूद करण्यात येईल, आणि ती सेवा पुरविण्यासाठीची नियत कालमर्यादा ही आवश्यक कागदपत्र सादर केल्याच्या दिनांकापासून गणणे सुरू केले जाईल.
७. अर्जाचा नमुना, त्या सोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे.---- (१) लोकसेवा देण्यासाठी आवश्यक असलेल्या अर्जाचा विहित नमुना जर संबंधित अधिनियम, नियम, अधिसूचना, आदेश, शासन निर्णय किंवा अन्य कोणत्याही दस्ताऐवज यांमध्ये विहित करण्यात आलेला नसेल, तर प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण तो नमुना विहित करील.
(२) अर्जाचा नमुना मराठी व इंग्रजी भाषेमध्ये असेल. अर्जाच्या नमुन्यासोबत सादर करावयाच्या कागदपत्रांची यादी, अर्जाच्या नमुन्यामध्येच नमूद करण्यात येईल.
(३) अर्जाचा नमुना पदनिर्देशित अधिका-याच्या कार्यालयात आणि सेतू सुविधा केंद्र, महा-ई सेवा केंद्र, संग्राम केंद्र यांच्या अधिपत्याखालील कार्यालयात आणि अन्य कोणत्याही संबंधित नागरिक सेवा केंद्रात सहजपणे उपलब्ध होईल. सदर अर्जाच्या नमुन्याची प्रत कार्यालयाचे किंवा विभागाचे संकेतस्थळ किंवा आपले सरकार पोर्टलवर देखील उपलब्ध होईल व ती मोबाईल अॅप वरून अथवा ऑनलाइन उपलब्ध (Download) होऊ शकेल.
(४) केवळ लोकसेवा मिळविण्यासाठीची आवश्यक माहितीच अर्जदाराकडून मागविण्यात येत असल्याबाबत पदनिर्देशित अधिकारी खातरजमा करील.
(५) अर्ज सादर करतेवेळी, शक्य असेल तेथवर आवश्यक कागदपत्रे जोडलेले व पूर्ण भरलेले अर्जच केवळ स्वीकारण्यात येत असल्याबाबत पदनिर्देशित अधिकारी खातरजमा करील. ऑनलाईन सादर केलेले अर्जसुद्धा पदनिर्देशित अधिका-याकडून स्वीकृत केले जातील.
(६) अर्जावर, पदनिर्देशित अधिकारी किंवा त्याने प्राधिकृत केलेला दुय्यम अधिकारी किंवा कर्मचारी रीतसर पोच देईल आणि त्यावर अर्ज प्राप्तीचा दिनांक, वेळ आणि ठिकाण, अनन्य ओळख क्रमांक (Unique Identification Number) अर्ज स्वीकारणा-या कर्मचा-याचे नाव, ज्या कालमर्यादेच्या आत सेवा पुरविण्यात येईल ती नियत कालमर्यादा या बाबी नमूद करण्यात येतील.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ४-१०, २०१९/चैत्र १४-२०, शके १९४१ ३(७) अर्ज जर व्यक्ितश: स्वरुपात मिळाला असेल तर, त्याची पोच व्यक्ितश: देण्यात येईल. अर्ज ऑनलाईन पोर्टल सुविधेमार्फत मिळाला असेल तर, त्याची पोच ई-मेल किंवा एसएमएस किंवा अन्य कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनांमार्फत देण्यात येईल. ऑनलाईन देण्यात आलेली पोच ही अर्जास देण्यात आलेली पोचपावती समजली जाईल.
८. शुल्क (Fee) चे प्रदान.---- अर्जदारास सेवा प्राप्त करण्यासाठी संबंधित प्राधिकरणाने प्रत्येक सेवेसाठी वेळोवेळी अधिसूचित केलेल्या शुल्काचे प्रदान एकतर थेट प्राधिकरणाकडे किंवा इलेक्ट्रॉनिक सुविधेमार्फत ऑनलाईन करावे लागेल.
९. अर्ज फेटाळण्याची सूचना.----- जेथे संबंधित पदनिर्देशित अधिकारी हा, वैध कारणांमुळे, अर्जदाराला अधिसूचित लोकसेवा पुरविता येऊ शकत नाहीत या निष्कर्षाप्रत आला असेल त्याबाबतीत, ज्या विशिष्ट सेवांसाठी अर्ज करण्यात आला असेल त्या विशिष्ट सेवा पुरविण्याकरिता दिलेल्या नियत कालमर्यादेच्या कालावधीत ती बाब अर्जदाराला कारणांसह लेखी कळवील. अर्ज फेटाळण्याच्या सूचनेसोबत, अपिलीय प्राधिका-याचे नाव व पदनाम, अपीलेट प्राधिका-याशी संपर्क साधण्यासाठी उपलब्ध सर्व माहितीसह त्याचा पत्ता, ज्या कालमर्यादेत अपील सादर करण्याची गरज आहे ती कालमर्यादा नमूद करण्यात येईल. जर अर्ज ऑनलाईन करण्यात आला असेल तर अर्जदाराचा अर्ज फेटाळण्याबाबतचे आदेश ऑनलाईन अथवा मोबाईल अॅप वर पाठविण्यात येतील.
१०. अर्जाची स्थिती पाहण्यासाठी यंत्रणा.----- (१) सार्वजनिक प्राधिकरण, शक्य असेल तेथवर, अर्जदाराला दिलेल्या अनन्य ओळख क्रमांकाचा (Unique Identification Number) वापर करून अर्जाची स्थिती पाहण्यासाठी एक यंत्रणा निर्माण करील.
(२) सार्वजनिक प्राधिकरण, शक्य असेल तेथवर, ज्यामार्फत पात्र व्यक्तीला एसएमएस किंवा इ मेल याद्वारे किंवा इतर कोणत्याही साधनांमार्फत अर्जाच्या स्थितीबाबतची अद्ययावत माहिती वेळेवर पाठविली जाऊ शकेल, अशी यंत्रणा निर्माण करील जेणेकरून ज्या पात्र व्यक्तीने सेवांकरिता अर्ज केला असेल अशी पात्र व्यक्ती, तिच्या सेवांबाबतच्या अर्जाच्या स्थितीची ऑनलाईन पाहणी करू शकेल.
११. अपिलाची कार्यपद्धती.------ (१) कलम ९ च्या पोट-कलम (१) अन्वये, प्रथम अपिलीय प्राधिका-याकडे नमुना दोन मध्ये व्यक्तीश: किंवा ऑनलाईन अपील दाखल करता येईल.
(२) कलम ९ च्या पोट-कलम (३) अन्वये, व्दितीय अपिलीय प्राधिका-याकडे नमुना तीन मध्ये व्यक्तीश: किंवा ऑनलाईन करता येईल.
१२. अपिलासोबत जोडावयाची कागदपत्रे.--- (१) पहिल्या किंवा दुस-या अपिलासोबत, अर्जदार पुढील कागदपत्रे जोडील :----
(अ) अपिलासोबत जोडावयाच्या कागदपत्रांची यादी.
(ब) ज्या आदेशाविरुद्ध प्रथम किंवा व्दितीय अपील करण्यात येत असेल त्या आदेशांची स्व-साक्षांकित प्रत.
(क) अर्जदाराने प्रथम किंवा व्दितीय अपिलामध्ये ज्याचा आधार घेतला असेल अशा आणि त्या संर्दभित करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या प्रती.
१३. सुनावणीची नोटीस देणे.---- यथास्थिती, पहिला किंवा दुस-या अपीलाची नोटीस खाली नमूद करण्यात आलेल्या पद्धतींपैकी कोणत्याही पद्धतीने पाठविण्यात येईल :-----
(१) विशेष संदेशवाहकामार्फत अथवा आदेशिकावाहकामार्फत (Process-server) हस्तबटवडयाने;
(२) पोचपावतीसह नोंदणीकृत डाकेने ;
(३) ई-मेल किंवा एसएमएस किंवा मोबाईल अॅप्स व्दारे ऑनलाईन ;
(४) शासकीय कर्मचा-याच्या प्रकरणी, त्याच्या नियंत्रक अधिका-यामार्फत किंवा ई- मेल किंवा एसएमएस किंवा मोबाईल अॅप्स व्दारे.
१४. अर्जदार किंवा पदनिर्देशित अधिकारी यांची व्यक्तिश: उपस्थिती.------ (१) प्रथम व द्वितीय अपिलाच्या सर्व प्रकरणी अर्जदार आणि पदनिर्देशित अधिकारी त्याचप्रमाणे द्वितीय अपिलाचे प्रकरण असल्यास प्रथम अपिलीय प्राधिकारी यांना सुनावणीचा दिनांक किमान सात पूर्ण दिवस अगोदर कळविण्यात येईल.
(२) सुनावणीची नोटीस विहित पद्धतीने पाठविण्यात येऊनही जर एखादा पक्षकार सुनावणीच्या वेळी अनुपस्थित राहिला तर त्याचे अपील त्याच्या अनुपस्थितीत निकाली काढले जाईल.
भाग चार--ब---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ४-१०, २०१९/चैत्र १४-२०, शके १९४१ १५. अपिलावर निर्णय घेण्याची कार्यपद्धती.----- अपील अर्जाबाबत निर्णय घेताना अपिलीय प्राधिकारी,-----
(१) पदनिदर्ेशित अधिकारी आणि अर्जदार यांना अपिलाच्या सुनावणीच्या वेळी बोलावतील.
(२) अपिलाशी संबंधित कागदपत्रे व प्रतींची छाननी करतील.
(३) अपिलाच्या सुनावणीच्या वेळी पदनिर्देशित अधिकारी व अर्जदाराची बाजू ऐकतील.
१६. प्रथम किंवा व्दितीय अपिलावरील आदेश.----- (१) प्रथम किंवा व्दितीय अपिलावरील आदेश लिखित स्वरुपात असतील.
(२) अपिलामध्ये देण्यात आलेल्या आदेशाची प्रत, ज्याने अपील दाखल केले असेल तो अपिलकर्ता, पदनिर्देशित अधिकारी किंवा यथा:स्थिती प्रथम अपील प्राधिकारी यांना देण्यात येईल.
१७. अधिनियमांतर्गत प्रकरणांची नोंदवही ठेवणे.---- पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपीलीय प्राधिकारी आणि व्दितीय अपील प्राधिकारी नमुना चार मध्ये प्रकरणांची नोंदवही व्यक्तीश: किंवा ईलेक्ट्रॉनिक नमुन्यात ठेवतील.
१८. मुख्य आयुक्त किंवा आयुक्त यांच्या कार्यालयात प्रतिनियुक्तीवर नेमलेले अधिकारी व अन्य कर्मचारी यांचे वेतन व भत्ते, सेवेच्या अटी व शर्ती.------ (१) राज्य शासनाचा कोणताही विभाग, राज्य शासनाचे मंडळ, महामंडळ अथवा अन्य सांविधिक संस्था यांमधून मुख्य आयुक्त किंवा आयुक्त यांच्या कार्यालयात प्रतिनियुक्तीवर नेमणूक करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांना, त्यांच्या सेवेबाबत लागू असतील अशा नियमांनुसार त्यांना अनुज्ञेय असतील असे वेतन व भत्ते देण्यात येतील आणि उक्त नियम व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या संबंधित सूचना यांनुसार त्यांचे नियमन करण्यात येईल.
(२) राज्य शासनाच्या कर्मचा-यांच्या सेवाशर्ती आणि शिस्तविषयक बाबी यांबाबत नियमन करणारे नियम हे, योग्य त्या फेरफारांसह, आयोगाच्या अधिका-यांना व इतर कर्मचा-यांना लागू असतील.
(३) अधिकारी व अन्य कर्मचारी यांचा पदावधी, राज्य शासनाने आदेशाव्दारे र्िवनिदिष्ट करण्यात आला असेल तेवढा असेल :
१९. आयोगाकडे दाखल करण्यात येणारे अपील.----- द्वितीय अपील प्राधिका-याच्या आदेशाविरुद्ध आयोगाकडे नमुना पाच मध्ये अपील दाखल करण्यात येईल.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ४-१०, २०१९/चैत्र १४-२०, शके १९४१ ५नमुना एक
(नियम ६ पहा)
पोच
प्रेषक
------------------------------------------------
------------------------------------------------
(पदनिर्देशित अधिकारी / प्राधिकृत अधिकारी)
प्रति,
------------------------------------------------
------------------------------------------------
(पात्र व्यक्तीचे नाव आणि पत्ता)
संदर्भ : दिनांक ................ रोजीचा आपला अर्ज.
मी, याद्वारे, आपल्या संर्दभित अर्जाची पोच देत आहे. अर्जातील पुढील त्रुटी तात्काळ दुरुस्त करण्यात याव्यात :
(त्रुटींचा उल्लेख, कोणत्याही असल्यास )
१. ------------------------------------------------
२. ------------------------------------------------
३. ------------------------------------------------
पुढील आवश्यक कागदपत्रे किंवा ना हरकत प्रमाणपत्रे कृपया तात्काळ सादर करावीत.
१. ------------------------------------------------
२. ------------------------------------------------
३. ------------------------------------------------
आपला / आपली विश्वासू,
(पदनिर्देशित अधिकारी/प्राधिकृत अधिकारी) ठिकाण :
(कार्यालयाची मोहोर) दिनांक :
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ४-१०, २०१९/चैत्र १४-२०, शके १९४१नमुना दोन
[ नियम ११ (१) पहा ]
प्रथम अपील प्राधिका-याकडे करावयाच्या पहिल्या अपिलाचा नमुना
------------------------------------------------ ( प्रथम अपील प्राधिका-याचे पदनाम व कार्यालयाचा पत्ता ) यांच्या समक्ष
------------------------------------------------
------------------------------------------------
------------------------------------------------ ( पात्र व्यक्तीचे नाव व पत्ता )
------------------------------------------------ ( पदनिर्देशित अधिका-याचे नाव व पत्ता )
(१) सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पदनिर्देशित अधिका-याकडे :
अर्ज सादर केल्याचा दिनांक
(२) पोच मिळाल्याचा दिनांक
:
(३) कागदपत्रे (जर सादर केली असतील तर) सादर केल्याचा दिनांक :
(४) मागणी केलेल्या लोकसेवेचा तपशील
:
(५) पदनिर्देशित अधिका-याचा निर्णय
:
(६) नियत कालमर्यादा
:
(७) पात्र व्यक्तीकडून मिळालेला अर्ज फेटाळण्यात आला असल्याचे ज्या :
पत्रान्वये कळविण्यात आले असेल त्याचा दिनांक
(८) अपिलाची कारणे
(एक) नियत कालमर्यादेत लोकसेवा देण्यात आली नाही, किंवा :
(दोन) अर्ज फेटाळण्यात आला
:
(९) करण्यात आलेली मागणी
:
(१०) अपील दाखल करण्यासाठीची इतर कोणतीही आवश्यक माहिती :
सोबत जोडलेल्या कागदपत्रांची यादी
(१) ------------------------------------------------
(२) ------------------------------------------------
प्रतिज्ञापत्र
वर दिलेला तपशील माझ्या संपूर्ण ज्ञानाप्रमाणे, माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे खरा व बिनचूक आहे.
दिनांक ........... माहे .......२०.... (वर्ष) रोजी
पात्र व्यक्तीची स्वाक्षरी.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ४-१०, २०१९/चैत्र १४-२०, शके १९४१ ७नमुना तीन
[ नियम ११ (२) पहा ]
द्वितीय अपील प्राधिकारी यांच्याकडे करावयाच्या दुस-या अपिलाचा नमुना
------------------------------------------------ समक्ष ( प्रथम अपील प्राधिका-याचे नाव व कार्यालयाचा पत्ता )
------------------------------------------------ ( पात्र व्यक्तीचे नाव व पत्ता )
------------------------------------------------ ( पदनिर्देशित अधिका-याचे नाव व पत्ता )
------------------------------------------------ ( प्रथम अपील प्राधिका-याचे नाव व पत्ता )
(१) पदनिर्देशित अधिका-याकडे सादर केलेल्या अर्जाचा दिनांक :
(२) पोच मिळाल्याचा दिनांक
:
(३) मागणी केलेल्या लोकसेवेचा तपशील
:
(४) पदनिर्देशित अधिका-याचा निर्णय
:
(५) प्रथम अपील प्राधिका-याचा निर्णय
:
(६) नियत कालमर्यादा
:
(७) प्रथम अपिलाचा दिनांक
:
(८) प्रथम अपील प्राधिका-याकडून कोणताही आदेश मिळाल्याचा दिनांक :
किंवा अपेक्षित दिनांक
(९) अपिलाची कारणे----
(एक) प्रथम अपिलावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही ; किंवा :
(दोन) अपील फेटाळण्याची कारणे; किंवा
:
(तीन ) पहिल्या अपिलावरील आदेश
:
समाधानकारक नसणे (कारणे)
सोबत जोडलेल्या कागदपत्रांची यादी
(१) ------------------------------------------------
(२) ------------------------------------------------
प्रतिज्ञापत्र
वर दिलेला तपशील माझ्या संपूर्ण ज्ञानाप्रमाणे, माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे खरा व बिनचूक आहे.
दिनांक ........... माहे .......२०.... (वर्ष) रोजी
पात्र व्यक्तीची/पदनिर्देशित अधिका-याची स्वाक्षरी.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ४-१०, २०१९/चैत्र १४-२०, शके १९४१नमुना चार
( नियम १७ पहा )
प्रकरणांची नोंदवही
(अ) पदनिर्देशित अधिका-याने ठेवावयाची नोंदवही
अनुक्रमांक अर्ज / अपील अर्जाची पोच पात्र व्यक्तीचे मागणी केलेली अर्ज /अपील निकाली प्राप्त झाल्याचा दिल्याचा नाव व पत्ता लोकसेवा काढण्याचा दिनांक, दिनांक
दिनांक
अर्ज /अपील फेटाळण्यात आले असेल तर त्याची कारणे (१) (२) (३) (४) (५) (६) (ब) प्रथम अपील प्राधिका-याने ठेवावयाची नोंदवही
अनुक्रमांक प्रथम अपील प्रथम अपिलाची पात्र व्यक्तीचे मागणी केलेली अर्ज निकाली जर कोणताही दंड दिनांक दिनांक
प्राप्त झाल्याचा पोच दिल्याचा नाव व पत्ता लोकसेवा काढल्याचा लादला असेल किंवा दिनांक / अर्ज वसूल केला असेल फेटाळण्यात आला तर त्याचा तपशील. असेल तर त्याची कारणे
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (क) द्वितीय अपील प्राधिका-याने ठेवावयाची नोंदवही
अनुक्रमांक द्वितीय द्वितीय अपिलाची पात्र व्यक्तीचे/ मागणी केलेली अर्ज निकाली जर कोणताही दंड लादला अपील प्राप्त पोच दिल्याचा पदनिर्देशित लोकसेवा काढल्याचा दिनांक/ असेल किंवा वसूल झाल्याचा दिनांक दिनांक अधिका-याचे अर्ज फेटाळण्यात केला असेल तर नाव व पत्ता आला असेल तर त्याचा तपशील
त्याची कारणे (१) (२) (३) (४) (५) (६) (७)महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ४-१०, २०१९/चैत्र १४-२०, शके १९४१ ९
नमुना पाच
( नियम १९ पहा )
महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाकडे अपील करण्याचा नमुना
प्रति,
(महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग / विभागीय आयुक्त / आयोगाचे अधिकार सोपविलेला शासकीय अधिकारी याचे पदनाम ) ..................... ( कार्यालयीन पत्ता ) यांच्या समक्ष.
पत्ता :-
------------------------------------------------------
------------------------------------------------------ ( पात्र व्यक्तीचे नाव, पत्ता, दूरध्वनी / मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी (असल्यास) -------------------------------------------------------
------------------------------------------------------ ( पदनिर्देशित अधिका-याचे नाव व पत्ता )
------------------------------------------------------
------------------------------------------------------ ( प्रथम अपिलीय अधिका-याचे नाव व पत्ता )
------------------------------------------------------
------------------------------------------------------ ( द्वितीय अपिलीय अधिका-याचे नाव व पत्ता )
(१) पदनिर्देशित अधिका-याकडे अर्ज केल्याचा दिनांक
:
(२) अर्जाची पोच मिळाल्याचा दिनांक
:
(३) मागणी केलेल्या लोकसेवेचा तपशील
:
(४) ज्या विभागातून सेवेची मागणी केली आहे त्या विभागाचे नाव :
(५) पदनिर्देशित अधिका-याने अर्ज निकाली काढण्याचा दिनांक :
(६) प्रथम अपील दाखल केल्याचा दिनांक
:
(७) पहिल्या अपिलाची पोच दिल्याचा दिनांक
:
(८) पहिल्या अपीलाच्या निर्णयाचा व पोच दिल्याचा दिनांक
:
(९) द्वितीय अपील दाखल केल्याचा दिनांक
:
(१०) द्वितीय अपील निकाली काढल्याचा दिनांक
:
* आयोगासमोर अपील दाखल करण्याबाबतची कारणे ( थोडक्यात ) :-
-----------------------------------------------------
-----------------------------------------------------
* करण्यात आलेल्या मागण्या :-
-----------------------------------------------------
-----------------------------------------------------
( पात्र व्यक्तीची / पदनिर्देशित अधिका-याची स्वाक्षरी )
ठिकाण :
दिनांक :
टीप :- पात्र व्यक्तीने ज्या आदेशाविरोधात अपील दाखल केलेले आहे त्या आदेशाची प्रमाणित प्रत यासोबत जोडावी.
भाग चार--ब---२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ४-१०, २०१९/चैत्र १४-२०, शके १९४१
प्रतिज्ञापत्र
वर दिलेला तपशील माझ्या संपूर्ण ज्ञानाप्रमाणे, माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे खरा व बिनचूक आहे.
दिनांक ......... दिवस............. महिना २०.......... ( वर्ष )
पात्र व्यक्तीची /पदनिर्देशित
अधिका-याची स्वाक्षरी.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
वि. त्रि. प्रभु,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ४-१०, २०१९/चैत्र १४-२०, शके १९४१ ११GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk Mumbai 400 032, dated the 18th May 2016
NOTIFICATION
MAHARASHTRA RIGHT TO PUBLIC SERVICES ACT, 2015.
No. Misc. 2015/C.R. 135 /18 (O & M).—The following draft of the Maharashtra Right to Public Services Rules, 2016 which the Government of Maharashtra proposes to make in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 28 of the Maharashtra Right to Public Services Act, 2015 (Mah. XXXI of 2015) is hereby published, as required by sub-section (1) of the said section 28, for the information of all persons likely to be affected thereby; and notice is hereby given that the said draft will be taken into consideration by the Government of Maharashtra on or after the 16th day of June 2016.
2. Any objections or suggestions which may be received by Additional Chief Secretary (Administrative Reforms, Office Organisation & Method), General Administration Department, Mantralaya, Mumbai 400 032 from any person in respect to the said draft, before the aforesaid date, will be considered by the Government.
DRAFT RULES
1. Short title.—These rules may be called the Maharashtra Right to Public Services Rules, 2016.
2. Definitions.—(1) In these rules, unless the context otherwise requires,—
(a) "Act" means the Maharashtra Right to Public Services Act, 2015;
(b) "Form" means the forms appended to these rules;
Mah. XXXI of 2015.
(c) "section" means section of the Act.
(2) Words and expressions used, but not defined in these rules and defined in the Act, shall have the same meanings, respectively, assigned to them in the Act.
3. Display of information on notice board.—(1) Every Public Authority shall, display or cause to display the list of public services to be rendered by it, stipulated time limit, names of Designated Officers, First Appellate Authorities and Second Appellate Authorities, Form or fee, if any, on the notice-board of its office and also on its website or portal of Government or Department or office, if any.
(2) List of documents that are required to be enclosed with the application form or forms for receiving the service and the forms appended to these rules shall also be displayed on the notice-board of its office and also on website or portal of Government or Department or office.
(3) Such display shall be in Marathi language and where needed in English language and shall be placed at conspicuous place so that visitor is able to notice it easily.
(4) In the event of non-display of such information in the public domain or office or website or portal, the Chief Commissioner or the concerned Commissioner may take suo moto cognizance and initiate appropriate action against the concerned office or Department or Designated Officer.
4. Extending stipulated time limit during period of election as well as natural calamities.— The concerned administrative Department, with the concurrence of the General Administration Department may, by an order, extend the stipulated time limit for notified public services under section 3 of the Act for specific period of time mentioned in the order, if necessary, during elections of local authorities, State Legislature, Parliament or in the event of natural calamities like earthquake, flood, fire or any other such natural calamity.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ४-१०, २०१९/चैत्र १४-२०, शके १९४१5. Authorisation by Designated Officer for receiving application.—The Designated Officer may authorise, by order, any of his subordinate officer or employee to receive the applications made by the eligible persons to obtain any notified service under the Act and issue the acknowledgment thereof to the applicant. The name of such subordinate officer or employee who is duly authorised to receive the applications shall also be displayed on the notice board or on website or portal of the Department or office.
6. Issue of acknowledgement to applicant.—On receipt of an application for public service by an eligible person, the Designated Officer or the authorised subordinate officer or employee, as the case may be, shall give acknowledgment to the applicant in Form I. In case, any document required for providing the service has not been enclosed with the application the same shall be clearly mentioned in the acknowledgement and the stipulated time limit for providing such service shall start from the date of production of the required document.
7. Format of application, necessary documents to be attached thereto.—(1) Every Public Authority shall prepare the Form of Application for obtaining public service in case the same is not provided under the provisions of the concerned Act, Rules, Notifications, Order, Government Resolutions or any other Instrument.
(2) The Application Form shall be in Marathi and English language. The list of documents to be furnished along with the Application Form should be mentioned in the form itself.
(3) The Application Forms shall be easily available at the office of the Designated Officer and at the office of in charge of SETU Suvidha Kendra, Mah E-seva Kendra, Sangram Centre and any other Citizen Service Centres. Copy of the said application forms shall also be made available on the website of office or Department or Aaple Sarkar portal which could be downloaded on mobile apps or online.
(4) The Designated Officer shall ensure that only necessary information for receiving public services is sought from the applicant.
(5) The Designated Officer shall ensure that, as far as possible, only the complete applications with necessary documents are accepted at the time of submission of the application. Application submitted online shall also be accepted by the Designated Officer.
(6) The application shall be duly acknowledged by the Designated Officer or its sub- ordinate officer or employee authorised by him, specifying date, time and place of receipt, unique identification number, name of the employee receiving the application, stipulated time within which the public services will be provided.
(7) If the application is received manually the acknowledgement of the same shall be given manually. If the application is received through online portal facility the acknowledgement shall be through e-mail or SMS or any other electronic means. Online acknowledgement will also be treated as acknowledgement given to the applicant.
8. Payment of fee.—The applicant is required to make payment of a fee, if any, for each service as notified by the concerned authority from time to time, either directly to the Authority or through electronic facility available online for availing of service.
9. Intimation of rejection of application.—In case, where the concerned Designated Officer, for valid reasons comes to the conclusion that the notified public services cannot be provided to the applicant, the same shall be intimated to the applicant with the reasons, in writing,within a stipulated time limit provided to give the particular service for which the application has been made. Along with the intimation of rejection, the name and designation of Appellate Authority, its address along with all available contact information of the Appellate Authority, time limit within which the appeal may be made shall also be mentioned. If the application is made online then rejection order shall be sent to the applicant online or on mobile apps.
10. Mechanism to monitor status of application.—(1) The Public Authority shall, as far as possible, create a mechanism for monitoring the status of applications using the unique identification number provided to the applicant.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ४-१०, २०१९/चैत्र १४-२०, शके १९४१ १३(2) The Public Authority shall, as far as possible, create a mechanism through which timely updates on the status of application can be sent to the eligible person through SMS or e-mail or through any other means so that the eligible person who has applied for the services will be able to monitor the status of his application online.
11. Procedure for appeal.—(1) An appeal to the First Appellate Authority under sub-section (1) of section 9 shall be filed in Form II, either manually or online.
(2) An appeal to the Second Appellate Authority under sub-section (3) of section 9 shall be filed in Form III, either manually or online.
12. Documents to be attached with appeal.—(1)Along with the first or second appeal, the appellant shall enclose the following documents, namely :—
(a) List of documents enclosed with the appeal.
(b) Self attested copy of the order against which the first or second appeal is being made.
(c) Copies of the documents relied upon and referred to by the appellant in the first or second appeal.
13. Service of notice of hearing.—The notice of hearing of the first or the second appeal, as the case may be, shall be served in any of the following manner :—
(i) by hand delivery through special messenger or process server;
(ii) by registered post with due acknowledgement;
(iii) online through email or SMS or Mobile Apps;
(iv) in case of Government Servant, through his controlling officer or online or e-mail or SMS or Mobile Apps.
14. Individual presence of applicant or Designated Officer.—(1) In all first or second appeals, the date of hearing shall be communicated to the appellant and the Designated Officer as well as to the First Appellate Authority in case of Second Appeal, at least seven clear days in advance.
(2) If any party remains absent even after due service of notice of hearing, then the appeal shall be disposed of in his absence.
15. Procedure for deciding appeal.—While deciding the appeal, the Appellate Authority shall,—
(i) summon the Designated Officer and appellant at the time of hearing of Appeal;
(ii) scrutinise the relevant documents or copies thereof;
(iii) hear the Designated Officer and the appellant at the time of hearing of the appeal.
16. Order in first or second appeal.- (1) The order in the first or second appeal shall be in writing.
(2) Copy of the order in appeal shall be given to the appellant who has filed the appeal, Designated Officer or the First Appellate Authority, as the case may be.
17. Maintenance of register of cases under Act.—The Designated Officer, the First Appellate Authority and the Second Appellate Authority shall maintain Register of the cases in Form IV, either manually or in electronic form.
18. Salaries and allowances, terms and conditions of service of officers and other employees appointed on deputation to office of Chief Commissioner or Commissioners.—(1) The officers and employees appointed on deputation to office of Chief Commissioner or Commissioners from any Department of the State Government, Board, Corporation or other statutory body of the State Government, shall be paid such salaries and allowances as admissible to them under the rules applicable to them and they shall be governed under the said rules and relevant instructions issued by the State Government, from time to time.
भाग चार--ब---३१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ४-१०, २०१९/चैत्र १४-२०, शके १९४१ (2) The rules governing conditions of service and disciplinary matter of the State Government employees shall, mutatis mutandis, apply to the other officers and other employees of the Commission.
(3) The term of office of the other officers and other employees shall be such as the State Government may specify by order :
19. Appeal filedwith Commission.—The appeal against the order of the Second Appellate Authority shall be filed to the Commission in Form V.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ४-१०, २०१९/चैत्र १४-२०, शके १९४१ १५FORM I
(See rule 6)
Acknowledgement
From
……………………
……………………
…………………… (The Designated Officer/Authorised Officer)
To
……………………
……………………
…………………… (Name and address of the eligible person)
Ref .—Your application dated ………………………..
I hereby acknowledge your application referred above.
The following defects in the application may be rectified, urgently:
(Specify defects, if any)
(1) ……………………
(2) ……………………
(3) ……………………
The following required documents or NOC's may please be submitted immediately:—
(1) …………………….
(2) …………………….
(3) …………………….
Place :
Yours sincerely,
Date :
(Designated Officer/Authorised Officer)
(Office Seal)
भाग चार--ब---३अ१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ४-१०, २०१९/चैत्र १४-२०, शके १९४१
FORM II
[See rule 11(1)]
Form of first appeal to the First Appellate Authority
Before the …………………… (Designation and office address of the First Appellate Authority)…………………………
………………………… (Name and address of the eligible person)
…………………………
………………………… (Name and address of the Designated Officer)
(1) Date of application produced before :
Designated Officer for providing service
(2) Date of acknowledgement :
(3) Date of production of documents, if any :
(4) Details of public service required :
(5) Decision of the Designated Officer :
(6) Stipulated time limit
:
(7) Date of intimation of rejection of
application received by the eligible person
:
(8) Grounds for Appeal
:
(i) Public service not provided within stipulated time; or :
(ii) Rejection of Application :
(9) Relief sought
(10) Any other information necessary for filling appeal
List of Documents enclosed
(1) ………………………….
(2) ………………………….
Declaration
The particulars given above are true and correct to the best of my knowledge, information and belief.
Dated the ………….. day of …………… 20…….(year)
Signature of the eligible person.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ४-१०, २०१९/चैत्र १४-२०, शके १९४१ १७FORM III
[See rule 11(2)]
Form of second appeal to the Second Appellate Authority
Before the …………………… (Designation and office address of the First Appellate Authority) …………………………
………………………… (Name and address of the eligible person)
…………………………
………………………… (Name and address of the Designated Officer)
…………………………
…………………… (Name and address of the First Appellate Authority)
(1) Date of application to the Designated :
Officer
(2) Date of acknowledgement :
(3) Details of public service required :
(4) Decision of the Designated Officer :
(5) Decision of the First Appellate Authority :
(6) Stipulated time limit
:
(7) Date of first appeal
:
(8) Date or expected date to receive any
order from the First Appellate Authority :
(9) Grounds for Appeal
:
(i) No decision on first appeal; or :
(ii) Rejection ofappeal or :
(iii) Order on first appeal not satisfactory (reasons)
List of Documents enclosed
(1) ………………………….
(2) ………………………….
Declaration
The particulars given above are true and correct to the best of my knowledge, information and belief.
Dated the ………….. day of …………… 20…….(year)
Signature of the eligible person /
Designated Officer.
१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ४-१०, २०१९/चैत्र १४-२०, शके १९४१FORM IV
(See rule 17)
Register of cases
A. To be maintained by the Designated Officer.
Sr. Date of Date of Name and Public Date on which No. receipt of acknowled- address of the service application/appeal application/ gement of the eligible person requested is disposed of / If appeal application
rejected the reasons thereof.
(1) (2) (3) (4) (5) (6) B. To be maintained by the First Appellate Authority.
Sr. Date of Date of Name and Public Date on which Details of No. receipt of acknowled- address of service application is fine, if any first gement of the eligible requested disposed of/ If imposed or appeal first appeal person rejected the collected
reasons thereof
(1) (2) (3) (4) (5) (6) (7) C. To be maintained by the Second Appellate Authority.
Sr. Date of Date of Name and Public Date on which Details of No. receipt of acknowled- address of service application is fine, if any second gement of the eligible requested disposed off / If imposed or appeal second appeal person / rejected the collected
Designated reasons thereof
Officer
(1) (2) (3) (4) (5) (6) (7)महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ४-१०, २०१९/चैत्र १४-२०, शके १९४१ १९
FORM V
(See rule 19)
Form of Appeal to Maharashtra State Commission for Right to Service
To,
Before the …………………… (Maharashtra State Commission for Right to Service / Divisional Commissioner / Government Officer entrusted powers of Commission)
…………………………
………………………… (Name and address of the eligible person with
contactnumber and e-mail address, if any)
…………………………
………………………… (Name and address of the Designated Officer)
…………......………… (Name and address of the First Appellate Authority)
…………………………
……………......……… (Name and address of the Second Appellate Authority) ………………………
(1) Date of making application to the :
Designated Officer
(2) Date of acknowledgement :
(3) Details of public service sought :
(4) Name of the Department from which :
service sought
(5) Date of disposal of application by the :
Designated Officer
(6) Date of filing of first appeal :
(7) Date of acknowledgement of first appeal :
(8) Date of decision of first appeal and it's :
acknowledgement
(9) Date of filing of second appeal :
(10) Date of disposal of second appeal :
Grounds for filing appeal before Commission (in brief) :
..............................................................................................................................................................
..............................................................................................................................................................
..............................................................................................................................................................
..............................................................................................................................................................…………
२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ४-१०, २०१९/चैत्र १४-२०, शके १९४१Relief sought :
..............................................................................................................................................................
..............................................................................................................................................................
..............................................................................................................................................................
(Signature of the eligible person /
Designated Officer)
Date :
Place :
Note.—Certified copy of the order against which the appeal has been filed by the eligible person shall be enclosed herewith.
Declaration
The particulars given above are true and correct to the best of my knowledge, information and belief.
Dated the ………….. day of …………… 20…….(year)
Signature of the eligible person /
Designated Officer.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
V. T. PRABHU,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.