महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-क
वर्ष ५, अंक १२] गुरुवार ते बुधवार, एप्रिल ११-१७, २०१९/चैत्र २१-२७, शके १९४१ [पृष्ठे ३
किंमत : रुपये ६.०० ट
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिका-यांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक
नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त
(राज्य उत्पादन शुल्क), जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व
निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा यांचे कार्यालय रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, १४, जमशेटजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक ४ एप्रिल २०१९.
वाचा.-----(१) क्र. निशि/केरो/२०१९/का. वि. १७८/सहा/जा. १०८, दिनांक १९ मार्च २०१९.
(२) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक १४ मे २०१८. (३) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक १ एप्रिल २०१९ रोजी प्राप्त ई-मेल संदेश. (४) शासन निर्णय क्र. रॉकेल-२०१४/प्र.क्र. १६१/नापु-२७, दिनांक १ एप्रिल २०१७. (५) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन युज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.
अधिसूचना
क्रमांक निशि/केरो/२०१९/का. वि. २११/सहा/जा. १२१.---शासनाने संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्या आधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशित केले आहे ;
ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स डेपो दरामध्ये दिनांक १ एप्रिल २०१९ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी या कार्यालयास संदर्भ क्र. ३ च्या ई-मेल संदेशाद्वारे कळविले आहे ;
शासनपत्र संदर्भ क्र. ४ नुसार, शासनाने केरोसिन वाहतुकीसाठी येणा-या केवळ डिझेलवरील खर्चात झालेली वाढ (Only Diesel Cost Rise) मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे केवळ डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ देताना डिझेल दरवाढीचा खर्च देण्यासंदर्भात शासनाने शासन निर्णय दिनांक २६ सप्टेंबर २००१, अन्वये विहित केलेल्या सूत्रानुसार (Escalation Formula) केरोसीन वाहतुकीसाठी दरवाढ खर्च देण्याचे शासनाने ठरविले आहे. केरोसीनची वाहतूक करण्याकरिता डिझेल दरवाढमध्ये वाढ/घट झाल्यानुसार द्यावयाच्या वाहतूक दरात विहित
(१)
भाग चार-क-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ११-१७, २०१९/चैत्र २१-२७, शके १९४१ सूत्रानुसार (Escalation Formula) वाढ करण्याबाबतचे अधिकार नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांना या शासन निर्णयाद्वारे प्रदान करण्यात आले आहेत. तसेच नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी दरवर्षी दिनांक १ एप्रिल रोजी असलेले डिझेलचे दर विचारात घेऊन त्याचदिवशी दिनांक २६ सप्टेंबर २००१ चे विहित सूत्र (Escalation Formula) वापरून डिझेलच्या दरातील वाढीवर आधारित केरोसीन वाहतूक दर निश्चित करून त्याबाबत तात्काळ आदेश निर्गमित करावेत असे शासनाने कळविले आहे.
त्या अनुषंगाने सुधारित एक्स-डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सदर सुधारित एक्स-डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणा-या केरोसीनचा सुधारित कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी, वाचा क्र. ४ मध्ये नमूद आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार उप नियंत्रक, शिधावाटप (अंमल), मुंबई (मुंबई शहर व मुंबई उपनगर), केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १ एप्रिल २०१९ पासून पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :----
अ. क्र.
बाब
सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (१)
(२)
(३) (४) ए एक्स डेपो दर (रुपये प्रति कि. लि.)
२६५५२.०० २६८०२.०० बी वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% १३२७.६० १३४०.१० सी घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत [ए+बी] २७८७९.६० २८१४२.१० डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन
१३४१.८८ १३४१.८८ (ii) तापमान बदलामुळे येणा-या घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी ९९.०० ९९.०० असाधारण भत्ता.
(iii) (A) वाहतूक खर्च
२८०.७९ २८०.७९ (B) डिझेल व्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च ७०.२० ७०.२० (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ
५३.८५ ५४.८२ एकूण वाहतूक खर्च (A+B+C) ४०४.८४ ४०५.८१ (iv) पथकर (Toll Tax)
७०.०० ७०.०० (v) घाऊक वितरकांना पूणार्ंकाचा लाभ
०.१४ ६.३१ (vi) एकूण किंमत वाढ : [डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v)] १९१५.८६ १९२३.०० इ एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% ९५.७९ ९६.१५ [डी(vi) च्या ५%].
एफ एकूण [सी+डी (vi) + इ] घाऊक विक्रीचा दर
२९८९१.२५ ३०१६१.२५ एफ-१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत
२९८९१.२५** ३०१६१.२५** (किंमत रुपये (किंमत रुपये २८४६७.८६+ २८७२५.००+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १४२३.३९) रुपये १४३६.२५) जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह)
६७५.०० ६७५.००महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ११-१७, २०१९/चैत्र २१-२७, शके १९४१ ३ अ. क्र.
बाब
सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (१)
(२)
(३) (४) एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा ३३.७५ ३३.७५ कर (जी.एस.टी.) (जी च्या ५ टक्के)
आय किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलो लिटर)
३०६००.००** ३०८७०.००** (किंमत रुपये (किंमत रुपये २९१४२.८५ २९४००.०० वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १४५७.१४) रुपये १४७०.००) जे किरकोळ विक्री दर (रुपये प्रति लिटर)
३०.६० ३०.८७ शासन परिपत्रक क्र. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग क्रमांक केईआर. १३७६/३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पुणार्ंकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
(मा. नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांच्या मान्यतेने).
चंद्रकांत थोरात,
उप नियंत्रक, शिधावाटप (अंमल), चर्चगेट, मुंबई.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.