महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ५, अंक ४९] गुरुवार, एप्रिल १८, २०१९/चैत्र २८, शके १९४१ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक १२६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ नोव्हेंबर २०१८
आदेश
महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (प्रचालन व सुविधा) अधिनियम, १९६३ आणि नियम, १९६७.
क्रमांक कृबास १०१८/प्र. क्र. १८९/२१-स.----ज्याअर्थी, कृषी उत्पन्न बाजार समिती सावली, जि. चंद्रपूर या बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळाची मुदत दिनांक ९ नोव्हेंबर २०१८ रोजी संपुष्टात येत आहे. आणि ;
ज्याअर्थी, चंद्रपूर जिल्ह्यतील सावली तालुक्यात धान रोवणीचे प्रमाण कमी झाले तसेच कमी पावसामुळे मावा, तुडतुडा या रोगाने शेतकयाच्या पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे तालुक्यातील महसुल आणेवारी ५० टक्के पेक्षा कमी आहे. सावली तालुक्यामध्ये धानाचे पिक हे मुख्य पिक आहे. शेतकयांना पिक न झाल्यामुळे त्याचा फटका बाजार समितीला प्रत्यक्षात सोसावा लागत आहे. शासनाच्या अधिनियमातील तरतूदीनुसार शेतकयांना मतदानाचा अधिकार देण्यात आल्यामुळे मतदारांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेचा खर्च वाढणार असून तो सध्याच्या परिस्थितीत बाजार समितीला करणे शक्य होणार नाही. आणि ;
ज्याअर्थी, बाजार समितीने दिलेली कारणे लक्षात घेता बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळास मूदतवाढ देणे योग्य राहील, अशी शासनाची खात्री झाली आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (प्रचालन व सुविधा) अधिनियम, १९६३ मधील कलम ५९ नुसार शासनास प्राप्त अधिकाराचा वापर करून कृषि उत्पन्न बाजार समिती सावली, ता. सावली, जि. चंद्रपूर या बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळास दिनांक १० नोव्हेंबर २०१८ पासून पुढील सहा महिन्यांकरिता म्हणजेच दिनांक ९ मे २०१९ पयर्ंत मुदतवाढ देण्यास या आदेशाद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
जयंत भोईर,
कार्यासन अधिकारी.
(१)
भाग चार--ब----१२६----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल १८, २०१९/चैत्र २८, शके १९४१ सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२, दिनांक १९ ऑक्टोबर २०१८
वाचा.---- शासन आदेश समक्रमांकाचे दिनांक ३ मे २०१८.
आदेश
महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ आणि नियम, १९६७.
क्रमांक कृबास १०१८/प्र. क्र. १७३/२१-स.----ज्याअर्थी, पोंभुर्णा कृषि उत्पन्न बाजार समिती, जि. चंद्रपूर या बाजार समितीच्या संचालक मंडळास शासन समक्रमांकाच्या दिनांक ३ मे २०१८ च्या आदेशान्वये दिनांक २७ एप्रिल २०१८ ते २६ ऑक्टोबर २०१८ पयर्ंत मुदतवाढ देण्यात आली आहे ;
ज्याअर्थी, चंद्रपूर जिल्ह्यत अतिवृष्टीमुळे पिंकांची नासाडी झालेली असून किडींचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. त्यामुळे पोंभुर्णा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळास मुदतवाढ देण्याची विनंती बाजार समितीने शासनास केली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या संचालक मंडळास मुदतवळ देणे योग्य राहील, अशी शासनाची खात्री झाली आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ कलम ५९ नुसार शासनास प्राप्त अधिकाराचा वापर करून पोंभूर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती, जि. चंद्रपूर या बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळास विशेष बाब म्हणून दिनांक २७ ऑक्टोबर २०१८ पासून पुढील सहा महिन्यांकरीता म्हणजेच दिनांक २६ एप्रिल २०१९ पर्यत मुदतवाढ देण्यास या आदेशाद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
जयंत भोईर,
कक्ष अधिकारी.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल १८, २०१९/चैत्र २८, शके १९४१ ३ सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग,मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ नोव्हेंबर २०१८
आदेश
महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (प्रचालन व सुविधा) अधिनियम, १९६३ आणि नियम, १९६७.
क्रमांक कृबास ०९१८/प्र. क्र. १५५/२१-स.----ज्याअर्थी, वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती, जि. वाशिम या बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळाची मुदत दिनांक २० नोव्हेंबर २०१८ रोजी संपुष्टात येत आहे. आणि ;
ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (प्रचालन व सुविधा) अधिनियम, १९६३ चे कलम १४ अ (१) (अ) मधील तरतूदीअन्वये राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांनी बाजार समितीच्या निवडणूकीसाठी बाजार समिती निवडणूक नियम, २०१७ नुसार नविन नियमाप्रमाणे निवडणूक घेणे करिता मतदार याद्या बनविणे व नविन नियमानुसार मतदार संघाची रचना करण्याकरिता बराच अवधी लागतो तसेच बाजार समितीची निवडणूक होऊन ३ वर्षे झाली आहेत व २ वर्षे अवधी बाकी आहे. व लगेच निवडणूक घेतल्यास बाजार समिती निधीचा अपव्यय होईल. तसेच सध्या जिल्हा परिषदेची निवडणूक लागणार आहे. आणि ;
ज्याअर्थी, बाजार समितीने दिलेली कारणे लक्षात घेता बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळास मुदतवाढ देणे योग्य राहील, अशी शासनाची खात्री झाली आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (प्रचालन व सुविधा) अधिनियम, १९६३ मधील कलम ५९ नुसार शासनास प्राप्त अधिकाराचा वापर करून वाशिम कृषि उत्पन्न बाजार समिती. जि. वाशिम या बाजार समितीच्या अशासकीय संचालक मंडळास दिनांक २१ नोव्हेंबर २०१८ पासून पुढील सहा महिन्यांकरिता म्हणजेच दिनांक २० मे २०१९ पयर्ंत मुदतवाढ देण्यास या आदेशाद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तसेच अशासकीय प्रशासक मंडळात श्री. चरण दा. गोटे यांची मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
जयंत भोईर,
कार्यासन अधिकारी.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल १८, २०१९/चैत्र २८, शके १९४१ सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग,मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ डिसेंबर २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (प्रचालन व सुविधा) अधिनियम, १९६३ आणि नियम, १९६७.
क्रमांक कृबास १२१८/प्र. क्र. २१४/२१-स.----ज्याअर्थी, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ दिनांक २ डिसेंबर २०१३ रोजी संपुष्टात आला होता. शासन अधिसुचनेन्वये सहा सहा महिन्यांची दोनदा मुदतवाढ म्हणजेच दिनांक २ डिसेंबर २०१४ पयर्ंत बाजार समितीच्या संचालक मंडळास मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर पणन संचालनालयाच्या दिनांक २ डिसेंबर २०१४ च्या आदेशान्वये या बाजार समितीवर त्रिसदस्यीय शासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती. दिनांक ११ फेब्रुवारी २०१५ च्या आदेशान्वये उपरोक्त आदेशात अंशतः बदल करण्यात येऊन त्रिसदस्यीय मंडळातील दोन सदस्य वगळून श्री. मनोज सौनिक, भा. प्र. से. यांचे व दिनांक १९ मार्च २०१७ व दिनांक १६ मार्च २०१७ पासून श्री. सतिश सोनी, अपर आयुक्त तथा विशेष निबंधक, सहकारी संस्था यांचे एक सदस्यीय प्रशासक मंडळ कायम ठेवण्यात आले. राज्यातील सुमारे १०५ बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया तसेच पणन अधिनियमातील सुधारणा सुरू असल्यामुळे मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक न घेता दिनांक २९ मे २०१५, दिनांक १ डिसेंबर २०१५, दिनांक १ जून २०१६, दिनांक ३० नोव्हेंबर २०१६ व दिनांक २ जून २०१७ च्या अधिसूचनेन्वये त्यांची मुदत अनुक्रमे दिनांक ३० नोव्हेंबर २०१५, दिनांक १ जून २०१६, १ डिसेंबर २०१६, १ जून २०१७, १ डिसेंबर २०१७ व दिनांक १ डिसेंबर २०१८ पर्यत वाढविण्यात आली.
आणि, ज्याअर्थी, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पाडलेली नाही व नजिकच्या काळात निर्वाचित संचालक मंडळ अस्तित्वात येण्याचा संभव नाही व पणन संचालक, पुणे यांनी दिनांक १ डिसेंबर २०१८ च्या पत्रान्वये मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान प्रशासकांना मुदत वाढ देण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (प्रचालन व सुविधा) अधिनियम, १९६३ मधील ५९ अन्वये शासनास प्राप्त अधिकारांचा वापर करून उक्त अधिनियमाच्या कलम १४(३) व १५ए (१बी) मधून सूट देऊन मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती, नवी मुंबई या बाजार समितीच्या विद्यमान प्रशासकांना २ डिसेंबर २०१८ पासून पुढील सहा महिनेकरिता म्हणजेच १ जून २०१९ पयर्ंत मुदतवाढ देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
जयंत भोईर,
कार्यासन अधिकारी.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.