Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Ext No. 106 (23rd April 2019): महसूल व वन विभाग यांची अधिसूचना - कारंजा सोहोळ काळवीट वन्यजीव अभयारण्य, उप विभागीय अधिकारी कारंजा यांचे चौकशी अधिकारी नियुक्तीबाबत

Published 23 April 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-04-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल २३, २०१९/वैशाख ३, शके १९४१ १ RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--अ

वर्ष ५, अंक ४७] मंगळवार, एप्रिल २३, २०१९/वैशाख ३, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक १०६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यामध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश याव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ एप्रिल २०१९

अधिसूचना

वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२.

क्रमांक डब्ल्यूएलपी. १०१८/प्र.क्र. ३९२/फ-१.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने, वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ (१९७२ चा ५३) याच्या कलम १८, पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक डब्ल्यूएलपी. १०९५/प्र.क्र. ८०/फ-१, दिनांक ७ डिसेंबर २००० (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) अन्वये, त्यासोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केलेले वाशिम जिल्ह्यच्या कारंजा तालुक्यातील ५३.७० हेक्टर इतके क्षेत्र (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त क्षेत्र" असा करण्यात आला आहे) हे, "कारंजा सोहोळ काळवीट वन्यजीव अभयारण्य" म्हणून प्रस्थापित करण्याबाबतचा आपला उद्देश घोषित केला आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने, उक्त अधिनियमाच्या कलम २६ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक डब्ल्यूएलपी. १०९५/प्र.क्र. ८०/फ-१, दिनांक २४ ऑक्टोबर २००३ याद्वारे असे निर्देश दिले आहेत की, उक्त अधिसूचने अन्वये घोषित केलेल्या कारंजा सोहोळ अभयारण्याच्या हद्दींमध्ये समाविष्ट असलेल्या जमिनींच्याबाबतीत, उप विभागीय अधिकारी, वाशिम हा, उक्त अधिनियमाची कलमे १९ ते २५ खालील जिल्हाधिका-याचे अधिकार व कर्तव्ये पार पाडील ;

आणि ज्याअर्थी, दिनांक २४ ऑक्टोबर २००३ ची अधिसूचना प्रसिद्ध करून वाशिम जिल्हा निर्माण करण्यात आला असल्याने, उक्त क्षेत्राच्या बाबतीत, उक्त अधिनियमाची कलमे १९ ते २५ खालील जिल्हाधिका-याचे अधिकार व कर्तव्ये उप विभागीय अधिकारी, कारंजा यांच्याकडे सोपविणे शासनास इष्ट वाटते ;

त्याअर्थी, आता, वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ (१९७२ चा ५३) याच्या कलम २६ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा, आणि याबाबतीत त्यास समर्थ करणा-या इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक डब्ल्यूएलपी. १०९५/प्र.क्र. ८०/फ-१, दिनांक २४ ऑक्टोबर २००३ याचे अधिक्रमण करुन, महाराष्ट्र शासन, याद्वारे, असे निदेश देत आहे की, उक्त क्षेत्राच्या हद्दीत समाविष्ट असलेल्या जमिनीच्याबाबतीत, उप विभागीय अधिकारी, कारंजा हा उक्त अधिनियमाची कलमे १९ ते २५ खालील जिल्हा अधिका-याचे अधिकार व कर्तव्ये पार पाडील. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, सुजय दोडल, शासनाचे सहसचिव (वने). भाग चार-अ---१०६---१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल २३, २०१९/वैशाख ३, शके १९४१ REVENUE AND FOREST DEPARTMENT Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Marg

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 23rd April 2019

NOTIFICATION

WILD LIFE (PROTECTION) ACT, 1972.

No. WLP. 1018/CR-392/F-1.— Whereas, the Government of Maharashtra, has vide the Government Notification, Revenue and Forest Department, No. WLP. 1095/CR-80/F-1, dated 7th December 2000, (hereinafter referred to as "the said Notification") issued in exercise of the power conferred by sub-section (1) of section 18 of the Wild Life (Protection) Act, 1972 (53 of 1972), declared its intention to constitute an area of 53.7 Ha. in Karanja Taluka of the Washim District specified in the Schedule appended thereto, as "Karanja Sohal Blackbuck Wildlife Sanctuary" ;

And whereas, the Government of Maharashtra, has vide the Government Notification, Revenue and Forest Department, No. WLP. 1095/CR-80/F-1, dated 24th October 2003, issued in exercise of the power conferred by section 26 of the said Act, directed the Sub-Divisional Officer, Washim to exercise powers and functions under section 19 to 25 of the said Act, in respect of the lands comprised within the limits of the area specified in the said Notification ;

Now, therefore, in exercise of powers conferred under section 26 of the Wild Life (Protection) Act, 1972 (53 of 1972), and all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra, hereby directs that the powers exercisable and the functions to be performed by the Collector under section 19 to 25 of the said Act, in respect of the lands comprised within the limits of the area specified in the said Notification, shall be exercised and performed by the Sub-Divisional Officer, Karanja.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SUJAY DODAL,

Joint Secretary (Forest) to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 April 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-04-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-04-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.