Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I Central Ext. 69 (28th Aug. 2019) माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांच्या दि. 6 ऑगस्ट 2019 रोजी झालेल्या निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळाची श्रद्धांजली.

Published 28 August 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-08-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, डिसेंबर २, २०१६/अग्रहायण ११, शके १९३८ RNI No. MAHBIL /2009/31745 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ५, अंक ५०] बुधवार, ऑगस्ट २८, २०१९/भाद्र ६, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक ६९ प्राधिकृत प्रकाशन सामान्य प्रशासन विभाग राजशिष्टाचार शाखा, ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २७ ऑगस्ट २०१९. अधिसूचना क्रमांक डीआयपी.२०१९/प्र.क्र.१४७/३०.---- " माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांचे मंगळवार, दिनांक ६ ऑगस्ट २०१९ रोजी दिल्ली येथे झालेल्या दु:खद निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे ठराव पारित करून श्रद्धांजली अर्पण केली :-- माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सुषमा स्वराज (वय ६७) यांचे मंगळवार, दिनांक ६ ऑगस्ट २०१९ रोजी दिल्ली येथे निधन झाले आहे. श्रीमती स्वराज यांच्या निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळ तीव्र शोक व्यक्त करत आहे. श्रीमती स्वराज यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५२ रोजी हरियाणातील अंबाला कॅन्टोन्मेंट येथे झाला. श्रीमती सुषमा स्वराज भारतीय राजकारणातील एक खंबीर नेतृत्व होते. गेल्या पन्नास वषार्ंच्या राजकीय वाटचालीत त्यांनी संसदीय राजकारणात स्वतःची वैशिष्टयपूर्ण ओळख निर्माण केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळातील विविध विभागांचा कार्यभार त्यांनी जबाबदारीने सांभाळला होता. विशेषत: एका महवाच्या कालखंडात त्यांनी पाच वर्षे परराष्ट्र मंत्रालयाची महवाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली होती. यासोबत अटलजींच्या मंत्रिमंडळातही त्यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण, सूचना आणि प्रसारण मंत्रालय अशा विभागांच्या जबाबदाया यशस्वीपणे सांभाळल्या. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद समर्थपणे सांभाळताना आपल्यातल्या निष्णात संसदपटूची प्रचिती आणून दिली होती. अत्यंत तरुण वयात राजकारणात आपला ठसा उमटवणाया सुषमाजींनी हरियाणाच्या मंत्रिपदासह दिल्लीचे मुख्यमंत्रीपदही भूषवले होते. एक श्रेष्ठ विधिज्ञ, साहित्यप्रेमी, प्रभावी वक्त्या, अभिजात रसिक असे त्यांच्या व्यक्ितमवाचे काही विशेष पैलू होते. श्रीमती स्वराज यांच्या निधनाबद्दल हे मंत्रिमंडळ तीव्र दुःख व्यक्त करत आहे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांच्या निधनाचे दुःख सहन करण्याची ताकद कुटुंबीयांमध्ये येवो, अशी प्रार्थना करण्यात येत आहे." महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने, अजोय मेहता, शासनाचे मुख्य सचिव. (१) भाग एक-(म.उ.वि.)--६९-१
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, ऑगस्ट २८, २०१९/भाद्र ६, शके १९४१ सामान्य प्रशासन विभाग राजशिष्टाचार शाखा, ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,

दिनांक २७ ऑगस्ट २०१९.

अधिसूचना

क्रमांक डीआयपी २०१९/प्र.क्र.१४७/३०.---- " जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे राज्यघटनेतील कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल हे राज्य मंत्रिमंडळ मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मा. गृहमंत्री अमित शहा यांच्यासह संसदेचे अभिनंदन करीत आहे.

केंद्र शासनाने हा ऐतिहासिक निर्णय घेऊन जम्मू-काश्मीरला संपूर्ण देशाशी एकात्म करण्याची महान कामगिरी केली आहे. देशातील इतर जनतेला मिळणारे अधिकार आणि हक्क कलम ३७० रद्द केल्यामुळे जम्मू-काश्मीरमधील जनतेला मिळणार आहेत. या निर्णयामुळे स्वातंयाचे नवे पर्व सुरू झाले असून जम्मू आणि काश्मीरच्या एकात्मतेसोबतच विकासासाठीही हे अचूक पाऊल ठरणार आहे."

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

अजोय मेहता, शासनाचे मुख्य सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 August 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-08-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-08-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.