Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) विभागीय आयुक्त तथा मुख्य नियंत्रण अधिकारी (पुनर्वसन), पुणे विभाग, पुणे यांजकडील सर्फनाला मध्यम प्रकल्प, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर या प्रकल्पाच्या बाधीत क्षेत्रात येणाऱ्या गावांचा तपशील, लाभक्षेत्रातील वाढीव गावातील लाभक्षेत्राची व्याप्ती जाहीर करणेबाबत. (2) अपर जिल्हाधिकारी तथा उपसंचालक, पुनर्वसन, (जमीन) सोलापूर यांजकडील मौजे गुरसाळे, मौजे नारायणचिंचचोली, मौजे आव्हे, मौजे खेडभोसे, मौजे पळूजवाडी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर ही गावे "पुनर्वसन गावठाण" म्हणून जाहीर करणेबाबत. (3) अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील घटप्रभा (फाटकवाडी) प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संपादनास पात्र खातेदारांनी धारण केलेल्या जमिनी वगळून उर्वरित जमिनींवरील हस्तांतरण/विभाजनाबाबतचे निर्बंध उठविणेबाबत. (4) अपर जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील मौजे कोयना वसाहत, तालुका कराड, जिल्हा सातारा येथील जमिनी गावठाण म्हणून जाहीर करणेबाबत. (5) अपर जिल्हादंडाधिकारी, सातारा यांजकडील लोकसभा निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कायदा व सुव्यवस्था राखणेकामी कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती करणेबाबत. (6) कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग, कोयनानगर, सातारा यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, 2005 अन्वये कार्यक्षेत्र निश्चित करणेबाबत. (7) विशेष वसुली अधिकारी यांजकडील वसुलीबाबत अधिसूचना. (8) जिल्हा निबंधक, सहकारी संस्था, विशेष वसुली व विक्री अधिकारी यांजकडील वसुलीबाबत अधिसूचना. (9) विविध तारखांना प्रकाशित झालेल्या असाधारण राजपत्रातील अधिसूचनांचे पुनर्प्रसिद्धीकरण.

Published 05 September 2019

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-09-05.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.