महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ५, अंक १२६] शनिवार, सप्टेंबर ७, २०१९/भाद्र १६, शके १९४१ [पृष्ठे ९, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ३१३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त), नियम व आदेश.
गृह विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ सप्टेंबर २०१९
आदेश
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१.
क्रमांक एमटीएस. ०९०९/१५३२/प्र.क्र. ५९२/पोल-४.----महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ (१९५१ चा मुंबई २२) च्या कलम ५(ब) आणि त्या अनुषंगाने प्रदान करण्यात आलेल्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे, महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या नियंत्रणाखालील पोलीस विभागातील '' महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक, २०१९ '' या पदांचे सेवाभरती विनियमन करणारे पुढील नियम करीत आहे, जसे :-----
१. या नियमांना '' महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस
शिपाई चालक, (सेवाप्रवेश) नियम, २०१९ '' असे संबोधण्यात यावे.
२. व्याख्या-- या नियमांमध्ये संदर्भानुसार दुसरा अर्थ अभिप्रेत नसेल तर,------
(अ) ' विभाग ' याचा अर्थ महाराष्ट्र शासनाचा गृह विभाग, असा आहे ;
(ब) ' महासंचालक ' याचा अर्थ पोलीस महासंचालक व पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, मुंबई असा आहे ;
(क) ' शासन ' याचा अर्थ, महाराष्ट्र शासन, असा आहे ;
(ड) ' उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा ' याचा अर्थ, महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महा. ४१) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळांकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) किंवा शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे ;
(इ) ' अनुज्ञप्ती प्राधिकारी ' याचा अर्थ, मोटार वाहन कायदा, १९८८ मधील प्रकरण दोन अन्वये अनुज्ञप्ती अदा करण्याकरिता प्राधिकृत केलेले प्राधिकारी ;
(फ) ' पोलीस दल ' याचा अर्थ, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ (१९५१ चा मुंबई २२) च्या कलम ३ अन्वये स्थापन करण्यात आलेले पोलीस दल, असा आहे ;
(ग) ' पोलीस घटक ' याचा अर्थ, विविध पोलीस आयुक्त कार्यालये व जिल्हा पोलीस अधीक्षक यांची कार्यालये असा आहे ;
(१)
भाग चार--ब--३१३--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर ७, २०१९/भाद्र १६, शके १९४१ ३. पोलीस दलातील '' सहा. पोलीस उपनिरीक्षक चालक '' या पदावरील नेमणूक पोलीस दलातील '' पोलीस हवालदार चालक '' या पदावर ३ वर्षापेक्षा कमी नाही. इतकी नियमित सेवा पूर्ण केलेल्या व्यक्तीमधून ज्येष्ठता-नि-पात्रता आणि शारीरिक योग्यतेच्या अधिन राहून पदोन्नतीने करण्यात येईल.
४. पोलीस दलातील '' पोलीस हवालदार चालक '' या पदावरील नेमणूक पोलीस दलातील '' पोलीस नाईक चालक '' या पदावर ३ वर्षापेक्षा कमी नाही. इतकी नियमीत सेवा पूर्ण केलेल्या व्यक्तीमधून ज्येष्ठता-नि-पात्रता आणि शारीरिक योग्यतेच्या अधिन राहून पदोन्नतीने करण्यात येईल.
५. पोलीस दलातील '' पोलीस नाईक चालक '' या पदावरील नेमणूक पोलीस दलातील '' पोलीस शिपाई चालक '' या पदावर ३ वर्षापेक्षा कमी नाही, इतकी नियमित सेवा पूर्ण केलेल्या व्यक्तीमधून ज्येष्ठता-नि-पात्रता आणि शारीरिक योग्यतेच्या अधीन राहून पदोन्नतीने करण्यात येईल.
६. (१) पोलीस शिपाई चालक पदावरील निवडीसाठी उमेदवारांकडे खाली नमूद पात्रता असणे आवश्यक आहे :------
(अ) वय :---कमीत कमी १९ वर्षे जास्तीत जास्त २८ वर्षे परंतु असे की, मागासवर्गीय उमेदवार यांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा ५ वषार्ंपयर्ंत शिथिल करण्यात येईल, तसेच माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत वेळोवेळी ठरविलेल्या शासनाच्या धोरणानुसार उच्चतम वयोमर्यादा शिथिल करण्यात येईल.
(ब) शैक्षणिक अर्हता :---उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
(क) विशेष अर्हता :---(१) उमेदवाराने अर्ज सादर करतेवेळी अनुज्ञप्ती अदा करण्याकरीता प्राधिकृत केलेले सक्षम प्राधिकारी यांनी अदा केलेला हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण करणे आवश्यक राहील.
(२) सदर पदावर नियुक्त उमेदवारांनी जड वाहन (HGV) आणि जड वाहन प्रवासी (HPMV) चालवण्याचा परवाना नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून पुढील ५ वर्षात प्राप्त करणे बंधनकारक राहील. अन्यथा, तो पुढील वेतनवाढीस तसेच पदोन्नतीकरिता पात्र राहणार नाही.
(३) सदरील उमेदवार हा कोणतेही मादक द्रव्ये किंवा मद्य सेवन करून वाहन चालविण्याकरिता नोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कोणत्याही अपराधासाठी दोषी सिद्ध झालेला नसावा.
(ड) शारीरिक पात्रता ---
अनुक्रमांक शारीरिक पात्रता महिला
पुरुष
(१) (२) (३)
(४)
(१) उंची १५८ सें.मी. पेक्षा कमी नसावी. १६५ सें.मी. पेक्षा कमी नसावी.
(२) छाती
. . . . न फुगवता ७९ सें.मी. पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली
छाती व फुगवलेली छाती यातील फरक ५ सें.मी. पेक्षा कमी नसावा.
२. शैक्षणिक व शारीरिक पात्रतेत द्यावयाची सूट :--
(अ) नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतूद :----
१. शैक्षणिक अर्हता :--- शासनाने नक्षलग्रस्त भाग म्हणून अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील रहिवासी असलेले आणि अनुसूचित जमीतीचे किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलवादीविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले असलेले उमेदवार जे ७ वी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत ते भरती करता पात्र ठरतील.
२. शारीरिक पात्रता :--- शासनाने नक्षलग्रस्त भाग म्हणून अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील रहिवासी असलेले आणि अनुसूचित जमातीचे किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलवादीविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रता शिथिल करण्यात येईल :----
छाती : छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही.
३. या नियमांतील उपखंड (अ) १ व (अ) २ नुसार विहित केलेल्या शैक्षणिक अर्हता व शारीरिक पात्रता शासनाने अधिसूचित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत शिथिल करण्याचे अधिकार अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना राहतील.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर ७, २०१९/भाद्र १६, शके १९४१ ३४. असे उमेदवार भरती झालेल्या जिल्ह्यच्या बाहेर बदलीस पात्र असणार नाहीत.
(ब) अनुकंपा तवावरील भरती :--- अनुकंपा तवावरील भरतीसंदर्भात खालीलप्रमाणे नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात येईल.
छाती :--- २ सें.मी. न फुगविता व १.५ सें.मी. फुगवून पुरूष उमेदवारांसाठी
७. लेखी चाचणी (१००) गुण :----
(अ) जे उमेदवार शारीरिक व शैक्षणिक पात्रतेमध्ये पात्र ठरतील, त्यांची एकूण १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
(ब) लेखी चाचणीमध्ये खालील विषयांचा समावेश असेल.---
(i) अंकगणित
(ii) सामान्यज्ञान व चालू घडामोडी
(iii) बुद्धीमत्ता चाचणी
(iv) मराठी व्याकरण, आणि
(v) मोटार वाहन चालविणे/वाहतुकीबाबतचे नियम.
(क) लेखी चाचणीसाठी कालावधी ९० मिनिटांचा असेल व सदर लेखी चाचणीमधील प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे राहतील आणि सदर चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल.
८. वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी (५०) गुण :----
(१) शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे द्यावी लागेल. सदर दोन्हीही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल.
(२) सदर कौशल्य चाचणीमध्ये खालील बाबी अंतभर्ूत असतात.
(अ) हलके वाहन (LMV) प्रकारातील वाहन चालविणे २५ गुण
(ब) जीप प्रकारातील वाहन चालविणे
२५ गुण (३) सदरहू चाचणी अर्हता चाचणी असल्याने, सदरहू चाचणीत प्राप्त झालेले गुण गुणवत्तायादी तयार करताना विचारात घेतले जाणार नाहीत.
(४) सदर वाहन चालवण्याच्या कौशल्य चाचणीबाबतचे निकष वेळोवेळी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचेमार्फत ठरविण्यात येतील.
(५) सदर पदासाठी कौशल्य चाचणी परीक्षा घेण्यासाठी गठीत करावयाच्या समितीस प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकायांचा समावेश करण्यात येईल.
९. शारिरिक चाचणी (५०) गुण :----
(१) जे उमेदवार लेखी चाचणीत किमान ३५ टक्के (मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत ३३ टक्के) गुण मिळवून उत्तीर्ण होतील, असे उमेदवार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या १ :१० या प्रमाणात शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरविण्यात येईल.
स्पष्टीकरण .--- उदाहणार्थ, जर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १० जागा व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ५ जागा असतील तर अनुसूचित जाती प्रवर्गातील १०० (१० × १० = १००) व अनुसूचित जमाती प्रवर्गातील ५० (५ × १० = ५०) उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरतील.
तथापि, अनुसूचित जाती प्रवर्गातील गुणानुक्रमे १०० व्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारास मिळालेले गुण जेवढया अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना मिळालेले असतील ते सर्व उमेदवार अनुसूचित जाती प्रवगार्ंतर्गत शासीरिक चाचणीसाठी पात्र असतील. तसेच, अनुसूचित जमाती प्रवर्गातील गुणानुक्रमे ५० व्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारास मिळालेले गुण जेवढया अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना मिळालेले असतील ते सर्व उमेदवार अनुसूचित जमाती प्रवगार्ंतर्गत शारीरिक चाचणीसाठी पात्र असतील.
भाग चार--ब--३१३--२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर ७, २०१९/भाद्र १६, शके १९४१ शारीरिक चाचणी ही खालीलप्रमाणे एकूण ५० गुणांची असेल.
(अ) पुरूष उमेदवार
(i) १६०० मी. धावणे --- ३० गुण
(ii) गोळा फेक --- २० गुण
एकूण ---- ५० गुण
(ब) महिला उमेदवार
(i) ८०० मी. धावणे --- ३० गुण
(ii) गोळा फेक --- २० गुण
एकूण ---- ५० गुण
(२) उमेदवारांनी शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील :--
१०. पोलीस महासंचालकांनी त्या घटकासाठी गठित केलेले निवड मंडळ हे या नियमांना पोट-नियम (७) व (९) मध्ये नमुद केलेल्या लेखी चाचणी व शारीरिक चाचणीमधील प्राप्त एकत्रित गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करील. लेखी चाचणी व शारीरिक चाचणी यामध्ये प्राप्त होणारे गुण एकत्र केल्यानंतर, उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी ही सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे करण्यात येईल.
११. पोलीस शिपाई चालक पदाची भरती प्रक्रिया राबविण्याची कार्यपद्धती, यासंदर्भात शासनाने किंवा पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी वेळोवेळी विहित केलेल्या निर्देशानुसार राबविण्यात येईल.
१२. आरक्षण :----
(१) (i) खेळाडू, महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त व इतर विविध घटकांना शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार आरक्षण लागू राहील.
(ii) गृहरक्षक दल :----- ज्या उमेदवारांनी पोलीस शिपाई चालक पदाच्या भरतीकरिता जाहिरातीच्या दिनांकास गृहरक्षक पदावर कमीतकमी ३ वर्ष (एकत्रित १०९५ दिवस) सेवा पूर्ण केली आहे व जे उमेदवार पोलीस शिपाई चालक पदासाठी जाहिरातीच्या दिनांकास आवश्यक शैक्षणिक अर्हता/शारीरिक चाचणी व वयोमर्यादेची अट पूर्ण करित असतील, अश्या उमेदवारांमधून पोलीस शिपाई चालक पदाच्या भरतीकरिता असलेल्या एकूण उपलब्ध पदांपैकी ५ टक्के पदे (समांतर आरक्षण) प्रमाणे भरण्यात येतील.
(iii) पोलीस पाल्य :----- पोलीस दलातील नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचायांच्या पाल्यांना पोलीस शिपाई चालक पदावरील भरतीकरिता एकूण पदाच्या ३ टक्के आरक्षण (समांतर आरक्षण) राहील. सदर सवलत ही गट-क व गट-ड संवर्गातून सेवानिवृत्त झालेल्या पोलीस कर्मचायांच्या पाल्यांना लागू राहील.
परंतु, सक्तीने सेवानिवृत्त/स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतलेल्या पोलीस कर्मचायांच्या पाल्यस ही सवलत लागू राहणार नाही.
(२) या नियमात विहित करण्यात आलेल्या सर्व प्रवर्गातील उमेदवारांना पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक राहिल आणि या पदासाठीच्या शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये विहित केलेले गुण मिळवावे लागतील.
१३. अनुकंपा तवावरील नियुक्ती :----- अनुकंपा तवावरील नियुक्तीच्या योजनेसंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशान्वये निर्धारित केलेली कार्यपद्धती अवलंबिण्यात यावी.
१४. या नियमातील नियम क्र. ३, ४, ५ व ६ मधील पदावर नेमणूक झालेल्या व्यक्तीला तो सदर परीक्षा उत्तीर्ण झाला असेल, किंवा होण्यापासून सुट मिळाली नसेल तर, मराठी व हिंदी भाषा परीक्षा याबाबतच्या नियमांनुसार उत्तीर्ण व्हाव्या लागतील.
१५. (१) या नियमांच्या नियम ६ मध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारास राज्यातील कोणत्याही पोलीस प्रशिक्षण केंद्रात आवश्यक असलेले प्रशिक्षण पूर्ण करून संबंधित परीक्षा चार संधीमध्ये उत्तीर्ण व्हावे लागेल. जर तो चार संधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण झाला नाही तर त्याची किंवा तिची सेवा समाप्त करण्यात येईल. या कालावधीत, त्याला किंवा तिला वर्ाषिक वेतनवाढ अनुज्ञेय असणार नाहीत.
(२) वर्ाषिक वेतनवाढ रोखलेले उमेदवार संबंधित परीक्षा विहित संधीत उत्तीर्ण झाल्यास, रोखून ठेवलेली वेतनवाढ त्यास देय होईल, परंतु, वेतनवाढ रोखून धरल्यामुळे देय होणारी थकबाकी मिळण्याचा तिला हक्क असणार नाही.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर ७, २०१९/भाद्र १६, शके १९४१ ५१६. (१) पोलीस शिपाई चालक या पदाकरिता निवड करण्यात आलेले उमेदवार हे कार्यकारी पोलीस दलात बदलीसाठी पात्र असणार नाही. मात्र, हे उमेदवार विनंतीनुसार जिल्ह्यच्या बाहेर फक्त इतर पोलीस घटकात त्याच पदावर बदलीस पात्र ठरतील.
(२) पोलीस शिपाई चालक या पदावर नियुक्त केलेला कर्मचारी, त्याच्या नियुक्तीच्या पोलीस घटकातून इतर पोलीस घटकात बदलीसाठी, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी राज्य शासनाच्या मान्यतेने निर्धारीत केलेली बदलीसाठी पात्रता, बदली प्रक्रिया, सक्षम प्राधिकारी, ज्येष्ठता आणि इतर अटी व शर्तीच्या अधीन राहून पात्र राहील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. ज. सोवितकर,
शासनाचे सहसचिव.
भाग चार--ब--३१३--२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर ७, २०१९/भाद्र १६, शके १९४१
HOME DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 6th September 2019
Order
MAHARASHTRA POLICE ACT, 1951.
No. MTS-0319/C.R.245/POL-4.—In exercise of the powers conferred by clause (b) of section 5 of the Maharashtra Police Act (XXII of 1951), and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules regulating the recruitment to the post of Assistant Police Sub-Inspector Driver, Police Head Constable Driver, Police Naik Driver and Police Constable Driver in the Police Force under the administrative control of the Home Department:––
1. These rules may be called the Maharashtra Assistant Police Sub-Inspector Driver, Police Head Constable Driver, Police Naik Driver and Police Constable Driver (Recruitment) Rules, 2019.
2. In these rules, unless the context requires otherwise :—
(a) "Department" means the Home Department of the Government;
(b) "Director General" means the Director General and Inspector General of Police, Maharashtra State, Mumbai;
(c) "Government" means the Government of Maharashtra;
(d) "Higher Secondary School Certificate Examination" means the Higher Secondary School Certificate Examination conducted by a Divisional Board established under the Maharashtra Secondary and Higher Secondary Education Board Act, 1965 (Mah. XLI of 1965) and includes any other Examinations declared by the Government to be equivalent thereto ;
(e) "Licensing Authority" means the officer authorized to issue licence under Motor Vehicle Act, 1988.
(f) "Police Force" means the Police Force constituted under section 3 of the Maharashtra Police Act (XXII of 1951);
(g) "Police Unit" means office of the Commissioner of Police or Superintendent of Police.
3. Appointment to the post of Assistant Police Sub-Inspector Driver in Police Force shall be made by promotion of suitable persons on the basis of strict selection with due regard to seniority subject to fitness from amongst the person holding the post of Police Head Constable Driver, having not less than three years regular service in that post.
4. Appointment on the post of Police Head Constable Driver in Police Force shall be made by promotion of suitable persons on the basis of strict selection with due regard to seniority subject to fitness from amongst the person holding the post of Police Naik Driver, having not less than three years regular service in that post.
5. Appointment on the post of Police Naik Driver in Police Force shall be made by promotion of suitable persons on the basis of strict selection with due regard to seniority subject to fitness from amongst the person holding the post of Police Constable Driver, having not less than three years regular service in that post.
6. (1) Appointment to the post of Police Constable Driver in Police Force shall be made by selection from amongst the persons possessing the following qualifications :–
(A) Age—Not less than nineteen years and not more than twenty-eight years:
Provided that, maximum age limit in respect of Backward Class candidates shall be relaxed for five years and for Ex-Serviceman candidates shall be relaxed as per the policy laid down by the Government from time to time.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर ७, २०१९/भाद्र १६, शके १९४१ ७(B) Educational Qualification—Have passed the Higher Secondary School Certificate Examination;
(C) Special Qualification—
(1) A candidate at the time of submitting his application is required to possess Light Motor Vehicle (LMV-TR) licence issued by Competent Authority.
(2) A candidate appointed on the said post shall have to possess Heavy Goods Vehicle Driving Licence (HGV) and Heavy Passenger Motor Vehicle (HPMV) driving licence within five years from his appointment, failing which he shall not be eligible for further increments and promotions.
(3) Candidate should not have been convicted under the Motor Vehicle Act, 1988, for driving under influence of alcohol or any psychotropic substances.
(D) Physical Qualification—
Sr. No. Measurement Female Male (1) (2)
(3)
(4) (i) Height Shall not be less than 158 Centimeters Shall not be less
than 165 Centimeters.
(ii) Chest . . .
Shall not be less than 79 Centimeters deflated and the difference between deflated chest and expanded chest shall not be less than 5 Centimeters.
(2) Relaxations in educational and physical qualification––
(A) Special provisions for Naxal affected areas :–
(a) Educational Qualification.–Candidates belonging to the Schedule Tribes category or children of Police Informants, Police Patils or Policemen who are killed or seriously injured in Naxal attacks or operations against Naxal and have pass 7th standard examination; and are residing in areas notified by the Government as Naxal affected area, shall be eligible for recruitment.
(b) Physical Qualifications.–Relaxations for the candidates belonging to the Scheduled Tribes category or children of Police Informants or Police Patils or Police Policemen who are killed or seriously injured in Naxal attacks or operations against Naxal and who are residing in the areas notified by the Government as Naxal affected areas, are enumerated to the extent as set out below,– Chest-measurement is not required.
(c) The powers of relaxation in educational and physical qualification prescribed in sub-clauses A(a) and B(b) above in respect of candidates residing in the Naxal affected areas notified by the Government shall be with the Additional Director General, Training and Special Units, Maharashtra State.
(d) Such candidates shall not be entitled for transfer outside the District of recruitment.
(B) Recruitment under compassionate grounds–Following relaxation shall be available for recruitment on the compassionate grounds–
Chest :– 2 cms without inflating the chest and 1.5 cms for inflated state.
7. Written Test (100 marks)–
(A) The candidates who fulfill the physical and educational qualifications shall be required to appear for written test of 100 marks.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर ७, २०१९/भाद्र १६, शके १९४१(B) The written Test shall include the following subjects, namely :–
(1) Arithmetic,
(2) General Knowledge and Current Affairs,
(3) Intelligence Test,
(4) Marathi Grammar, and
(5) Motor vehicle driving and transport Rules.
(C) Duration of written test shall be 90 minutes. Questions asked in written test shall be objective type and test shall be conducted in Marathi language.
8. Skill Test for vehicle driving (50 Marks)–
(i) Candidates selected for Physical test shall have to undergo vehicle driving skill test mentioned below. Candidates shall have to secure a minimum of 40% marks in both skill tests together.
(ii) The skill test shall be consist of,–
(A) Light vehicle driving test -- 25 marks
(B) Jeep types vehicle driving test -- 25 marks
(iii) The skill test being only a qualifying test, marks obtained in skill test shall not be included in the total marks considered for preparing merit list.
(iv) The criteria for skill test in driving shall be decided by Director General from time to time.
(v) Officers from Regional Transport Authority, should be included in the Committee for conducting skill test in driving.
9. Physical Test (50 Marks)–
(i) Candidates securing a minimum of 35% marks in Written Test (33% marks in respect of Backward Class category candidates) shall be eligible to be called to appear for a physical Test in the ratio of 1:10 of vacancies advertised in the respective categories.
Explanation.– For example, if there are 10 vacancies in the Scheduled Caste category and 5 vacancies in the Scheduled Tribes category, then 100 (10x10=100) candidates will be listed on merit in the Scheduled Caste category and 50 (5x10=50) candidates, will be listed in the Scheduled Tribes category.
However, all the candidates in the Scheduled Caste category who have secured same marks as Scheduled Caste candidate at the 100th rank shall be eligible to be called to appear for a physical test. Similarly, all Scheduled Tribes category candidates who have secured the same marks as Scheduled Tribes candidate at the 50th rank will be eligible to be called to appear for a physical test.
Physical test shall be of 50 marks as follows :–
(A) Male candidates
(a) 1600 Meters Running -- 30 marks
(b) Shot-put
-- 20 marks
Total Marks 50 Marks
(B) Female candidates
(a) 800 Meters Running -- 30 marks
(b) Shot-put
-- 20 marks
Total Marks 50 Marks
(ii) Candidates shall have to secure a minimum 50% marks in a physical test.
10. Selection Board constituted by the Director General shall prepare a merit list from amongst the candidates based on the total marks obtained in the written test and physical test mentioned in the rules 7महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर ७, २०१९/भाद्र १६, शके १९४१ ९ and 9. After amalgamation of marks obtained in written and physical test, the final merit list shall be prepared as per steps mentioned in the Government Resolution, issued by the General Administration Department, from time to time.
11. Recruitment to the post of Police Constable Driver shall be done as per procedure decided by the Government or the Director General, from time to time.
12. Reservation––
(1) (i) Reservation is applicable for Sports persons, Women, Ex-Serviceman, project affected persons and any other categories shall be as declared by the Government from time to time.
(ii) Home Guards– Out of the total posts available for recruitment to the post of Police Constable Driver in the Police Force, 5% posts (Parallel reservation) shall be filled in from amongst the members of Home Guards who have completed minimum three years of service i.e. 1095 days of consolidated service as Home Guards on the date of advertisement of recruitment and possess the requisite educational and physical qualifications and age limit as per these rules.
(iii) Policeman's Ward– 3% of the total posts (parallel reservation) available for recruitment of Police Constable Driver shall be reserved, for Wards of police personnel, who has superannuated or retired from Group-C or Group-D service:
Provided that, reservation shall not be applicable for the wards of police personnel who have retired voluntarily or have been retired compulsorily.
(2) All the categories enumerated in this rule shall be required to pass the eligibility criteria and obtain the requisite marks in the written and physical tests prescribed for the post.
13. Recruitment on compassionate ground– The procedure for compassionate appointment scheme shall be adopted as per the directions issued by the General Administration Department, from time to time.
14. A person appointed to the post mentioned in rules 3,4,5 and 6 shall be required to pass Hindi and Marathi language examinations according to the rules made in that behalf, unless he has already passed, or has been exempted from passing those examinations.
15. (i) A candidate appointed to the post mentioned in rule 6 shall be required to complete the training in any of the Police Training Centre prescribed for the post and pass required examinations in maximum of four attempts, failing which his or her services would stand terminated. During this period, he shall not be eligible for annual increment.
(ii) All the Annual increments, due to the candidate, shall be released on passing the above examination within stipulated attempts. However, no arrears shall be payable to the candidate against such notional Annual Increments given after clearance of the examination.
16. (i) A person appointed to the post Police Constable Driver recruited in the recruiting Police Unit shall not be eligible for transfer to executive duties but shall be eligible for inter-district transfer in the same cadre on request.
(ii) Police Constable Driver, shall be eligible for transfer to any other Police Unit in the State of Maharashtra, on the terms and conditions in respect of eligibility, transfer procedure, competent authority, seniority and other necessary terms and conditions prescribed by the Director General, with the approval of the Government.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. J. SOVITKAR, Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.