Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV (Ext. 51) (Sept. 9th 2019) नगरविकास विभाग, Maharashtra Ordinance No. XXIII of 2019

Published 09 September 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-09-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर ९, २०१९/भाद्र १८, शके १९४१ १

RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ५, अंक २६] सोमवार, सप्टेंबर ९, २०१९/भाद्र १८, शके १९४१ [पृष्ठे ४, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ५१

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०१९ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक २३.--- नागपूर सुधार प्रन्यास अधिनियम, १९३६ यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अध्यादेश. . . . . . . . . . .

पृष्ठे १-४

नगरविकास विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ सप्टेंबर २०१९.

MAHARASHTRA ORDINANCE No. XXIII OF 2019.

AN ORDINANCE

FURTHER TO AMEND THE NAGPUR IMPROVEMENT

TRUST ACT, 1936.

सन २०१९ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक २३.

नागपूर सुधार प्रन्यास अधिनियम, १९३६ यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अध्यादेश.

ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही ;

आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, नागपूर सुधार प्रन्यास अधिनियम, १९३६ यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे ;

१९३६ चा मध्यप्रांत व वहाड अधिनियम ३६.

भाग चार---५१---१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर ९, २०१९/भाद्र १८, शके १९४१ त्याअर्थी, आता, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत :----

१. (१) या अध्यादेशास, नागपूर सुधार प्रन्यास (सुधारणा) अध्यादेश, २०१९, असे म्हणावे.

संक्षिप्त नाव व प्रारंभ.

(२) तो, तात्काळ अंमलात येईल.

२. नागपूर सुधार प्रन्यास अधिनियम, १९३६ (यात यापुढे ज्याचा निर्देश ""मुख्य अधिनियम"" असा करण्यात आला आहे) याच्या कलम १२१ मध्ये,-----

१९३६ चा मध्यप्रांत व वहाड अधिनियम ३६.

सन १९३६ चा मध्यप्रांत व वहाड अधिनियम क्रमांक ३६ याच्या कलम १२१ ची सुधारणा.

(क) पोट-कलम (१) मध्ये, ""किंवा त्यांची अजून अंमलबजावणी सुरू असेल"" या मजकुरानंतर, ""किंवा त्या योजना, अशा कोणत्याही अधिनियमान्वये राज्य शासनाकडून स्थापन करण्यात आली असेल अशा महानगरपालिकेकडे किंवा कोणत्याही विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आल्या असतील किंवा अशा कोणत्याही अधिनियमान्वये राज्य शासनाने स्थापन केलेल्या कोणत्याही प्राधिकरणाला हस्तांतरित करण्यात आल्या असतील "" हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल ;

(ख) पोट-कलम (२) मध्ये,----

२०१७ चा महा. ३.

(एक) खंड (अ) मधील, ""महानगरपालिकेकडे निहित होतील किंवा त्या, महानगरपालिकेस संपादित करता येतील"" या मजकुराऐवजी, ""महानगरपालिकेकडे, किंवा महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, २०१६ अन्वये स्थापन केलेल्या नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे, राज्य शासन, आदेशाद्वारे, निर्धारित करील अशा रीतीने, निहित होतील किंवा त्या महानगरपालिकेस किंवा नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास संपादित करता येतील"" हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

२०१७ चा महा. ३.

(दोन) खंड (ब) मधील, ""केवळ महानगरपालिकेकडून फेडण्यायोग्य होतील"" या मजकुराऐवजी, "" केवळ महानगरपालिकेकडून, किंवा महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, २०१६ अन्वये स्थापन केलेल्या नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून, राज्य शासन, आदेशाद्वारे, निर्धारित करील अशा रीतीने, फेडण्यायोग्य होतील"" हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

२०१७ चा महा. ३.

(तीन) खंड (क) मधील, ""या अधिनियमाखालील प्रन्यासाची कार्ये अनुक्रमे, महानगरपालिकेकडून पार पाडण्यात येतील"" या मजकुराऐवजी, ""या अधिनियमाखालील प्रन्यासाची कार्ये अनुक्रमे, महानगरपालिकेकडून, किंवा महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, २०१६ अन्वये स्थापन केलेल्या नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून, राज्य शासन, आदेशाद्वारे, निर्धारित करील अशा रीतीने, पार पाडण्यात येतील"" हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

२०१७ चा महा. ३.

(चार) खंड (ड) मध्ये, ""महानगरपालिका"" या मजकुरानंतर, ""किंवा महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, २०१६ अन्वये स्थापन करण्यात आलेले नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राज्य शासनाकडून, आदेशाद्वारे, निर्धारित करण्यात येईल अशा रीतीने,"" हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.

३. मुख्य अधिनियमाच्या कलम १२२ नंतर, पुढील कलम समाविष्ट करण्यात येईल :----

""व्यावृत्ती. १२३. कलम १२१ अन्वये प्रन्यास बरखास्त झाला असला आणि मत्ता, हक्क, दायित्वे किंवा अधिकार यांचे हस्तांतरण झाले असले तरीही,----

१९३६ चा मध्यप्रांत व वहाड अधिनियम क्रमांक ३६ यामध्ये कलम १२३ समाविष्ट करणे.

(अ) अधिनियमान्वये केलेले सर्व नियम व उपविधि, केलेल्या सर्व नियुक्त्या, काढलेल्या अधिसूचना व दिलेले आदेश आणि दिलेली लायसने व परवानग्या, काढलेल्या निविदा, निष्पादित केलेले व नवीकरण केलेले भाडेपट्टा विलेख हे, त्यामध्ये फेरबदल करण्यात येईपयर्ंत, त्यांचे निरसन होईपयर्ंत किंवा त्यांत सुधारणा करण्यात येईपयर्ंत, अंमलात असण्याचे पुढे चालू राहील ;

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर ९, २०१९/भाद्र १८, शके १९४१ ३

१९४९ चा ५९.

२०१७ चा महा. ३.

(ब) अधिनियमान्वये विधिसंस्थापित प्रन्यासाद्वारे किंवा प्रन्यासाकडून करण्यात आलेल्या किंवा निष्पादित करण्यात आलेल्या सर्व संविदा आणि करार आणि करण्यात आलेल्या सर्व गोष्टी ह्य महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अन्वये घटित केली असल्याचे मानण्यात आलेल्या नागपूर शहर महानगरपालिकेद्वारे किंवा महानगरपालिकेकडून किंवा, यथास्थिति, महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, २०१६ अन्वये स्थापन केलेल्या नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे किंवा प्राधिकरणाकडून करण्यात आल्या असल्याचे, निष्पादित करण्यात आल्या असल्याचे किंवा केलेल्या असल्याचे मानण्यात येईल ;

(क) अधिनियमान्वये विधिसंस्थापित प्रन्यासाकडे निहित असलेल्या सर्व मालमत्ता, निधी व इतर मत्ता आणि त्या प्रन्यासाचे सर्व हक्क व दायित्वे, यांपैकी विवक्षित मालमत्ता, निधी व मत्ता ह्य, राज्य शासनाद्वारे निर्धारित केल्याप्रमाणे नागपूर शहर महानगरपालिकेकडे किंवा, यथास्थिति, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे निहित व प्रक्रांत होतील ;

(ड) कोणत्याही मालमत्तांच्या किंवा हक्कांच्या बाबतीत, प्रन्यासाला देय असलेले सर्व प्रकारचे भाडे, रकमा ह्य, नागपूर शहर महानगरपालिकेला किंवा, यथास्थिति, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला देय असतील ;

(ई) प्रन्यासाकडून किंवा प्रन्यासाविरुद्ध किंवा त्याच्या अधिकायांविरुद्ध दाखल करण्यात आलेले, किंवा हा अध्यादेश अंमलात आला नसता तर, दाखल करण्यात आले असते असे, सर्व दिवाणी किंवा फौजदारी दावे किंवा कायदेशीर कार्यवाह्य ह्य, अन्यथा तरतूद केली असेल त्याव्यतिरिक्त एरव्ही, नागपूर शहर महानगरपालिकेकडून किंवा, यथास्थिति, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून किंवा त्यांच्याविरुद्ध चालविता येतील किंवा दाखल करता येतील ;

(फ) ज्या सुधार योजना अजून प्रन्यासाकडून पूर्ण करावयाच्या आहेत किंवा ज्यांची अंमलबजावणी करावयाची आहे अशा सुधार योजना ह्य, राज्य शासनाकडून निदेश देण्यात येईल त्याप्रमाणे, नागपूर शहर महानगरपालिकेकडे किंवा, यथास्थिति, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात येतील ;

(ग) अधिनियम, नियम, अधिसूचना किंवा कोणताही संलेख यांमध्ये जेथे जेथे ""सभापती"" असा उल्लेख दिसून येईल तेथे तेथे, तो, ""आयुक्त"", नागपूर शहर महानगरपालिका किंवा, यथास्थिति, ""महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण"", याचा उल्लेख आहे, असा अन्वयार्थ लावण्यात येईल ;

१९४९ चा ५९.

(ज) अधिनियमाच्या तरतुदींनुसार केलेली कोणतीही गोष्ट किंवा केलेली कोणतीही कारवाई ही, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या किंवा, यथास्थिति, महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, २०१६ याच्या संबद्ध तरतुदींअन्वये केली किंवा करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल.

२०१७ चा महा. ३.

अडचण दूर करणे.

४. (१) या अध्यादेशाद्वारे सुधारणा केलेल्या, मुख्य अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणताना कोणतीही अडचण उद्भवल्यास, राज्य शासनास, प्रसंगानुरुप ती अडचण दूर करण्याच्या प्रयोजनांसाठी त्यास आवश्यक किंवा इष्ट वाटतील असे, या अध्यादेशाद्वारे सुधारणा केलेल्या मुख्य अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसलेले निदेश, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे, देता येतील.

(२) पोट-कलम (१) खालील काढलेला प्रत्येक आदेश, तो काढण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहापुढे मांडण्यात येईल.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर ९, २०१९/भाद्र १८, शके १९४१

निवेदन.

नागपूर सुधार प्रन्यास अधिनियम, १९३६ (१९३६ चा मध्यप्रांत व वहाड अधिनियम ३६) याच्या कलम १२१ मध्ये प्रन्यास बरखास्त करण्याची आणि त्या प्रन्यासाची मत्ता व दायित्व नागपूर शहर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची तरतूद आहे. शासनाने, महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, २०१६ (२०१७ चा महा. ३) याअन्वये नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन केले आहे. ज्या काही क्षेत्रांमध्ये नागपूर सुधार प्रन्यास हे विद्यमान नियोजन प्राधिकरण आहे ती क्षेत्रे नागपूर शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्राबाहेर आहेत. प्रन्यास बरखास्त करण्यात आल्यास प्रशासनाची निकड म्हणून नागपूर सुधार प्रन्यासच्या मत्ता, दायित्वे व कायदेशीर बाबी, एकतर नागपूर शहर महानगरपालिकेकडे, किंवा, यथास्थिति नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित कराव्या लागतील. नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्यात आल्यास, त्याच्या मत्ता, दायित्वे व कायदेशीर बाबी यांचे नागपूर शहर महानगरपालिकेकडे किंवा नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरण करणे शक्य व्हावे म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १२१ मध्ये योग्य त्या सुधारणा करण्याचे आणि त्या अधिनियमाच्या विद्यमान कलम १२२ नंतर, व्यावृत्तीच्या स्वरूपातील नवीन कलम १२३ जादा दाखल करण्याचे प्रस्तावित केले आहे.

२. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही, आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी, नागपूर सुधार प्रन्यास अधिनियम, १९३६ (१९३६ चा मध्य प्रांत व वहाड अधिनियम ३६) यात आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे, म्हणून, हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे.

मुंबई,

भगत सिंह कोश्यारी,

दिनांक ९ सप्टेंबर २०१९.

महाराष्ट्राचे राज्यपाल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

मनीषा पाटणकर-म्हैसकर, शासनाच्या प्रधान सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर ९, २०१९/भाद्र १८, शके १९४१ ५
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 09 September 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-09-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-09-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.