Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक (कोविपु.) असा. क्र. 92 (9 सप्टेंबर 2019) उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), काळ प्रकल्प क्र. 2, माणगांव, क्र. उजिभू-भूसं,कात-1,एस.आर. 548, 2015, भूसंपादन रायगड

Published 09 September 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-09-09.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर ९, २०१९/भाद्र १८, शके १९४१ RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ५, अंक ५३] सोमवार, सप्टेंबर ९, २०१९/भाद्र १८, शके १९४१ [ पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ९२

प्राधिकृत प्रकाशन

उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), काळ प्रकल्प क्र. २, माणगांव यांजकडून

क्रमांंक - उजिभू-भूसं/कात-१/एस.आर.५४८/२०१५.-----ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१(१९६२ चा महा-तीन) चे कलम एक, पोट-कलम (३) अन्वये काढण्यात आलेली व दिनांक २९ ऑगस्ट २०१९ च्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र, भाग चार ब पृष्ठ क्र. १ ते २ वर प्रसिद्ध करण्यात आलेली दिनांक २९ ऑगस्ट २०१९ ची शासकीय अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र.आयडीसी./२०१९/ (प्र.क्र.५३२)/उ-१४, उक्त अधिनियमाच्या प्रकरण सहाचे उपबंध हे त्या अधिसूचनेच्या अनुसुचीत विर्िनदिष्ट करण्यात आलेल्या क्षेत्रात ऑगस्ट २०१९ महिन्याच्या २९ व्या दिवसापासून अंमलात येतील असा महाराष्ट्र शासनाने निर्देश दिला आहे ;

आणि ज्याअर्थी, या सोबतच्या अनुसूचीत नमूद केलेल्या जमिनी उक्त प्रकरण सहाचे उपबंध उपरोक्ताप्रमाणे अंमलात आले आहेत. अशा क्षेत्रांत आहेत ;

आणि ज्याअर्थी, अधिनियमाचे प्रकरण सहा हे ज्या क्षेत्रांना लागू करण्यात आले आहेत अशा क्षेत्रांत असणाया आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत (त्यात यानंतर ज्याचा ""उक्त महामंडळ"" असा निर्देश करण्यात आला आहे) विकास करण्याच्या प्रयोजनार्थ किंवा उक्त अधिनियमांच्या उद्दिष्टांच्या पृष्ठयर्थ असेल अशा इतर कोणत्याही प्रयोजनार्थ आवश्यक असणाया जमिनी संपादन करण्याची शक्ती उक्त अधिनियमंाच्या कलम ३२ अन्वये राज्य शासनास प्रदान करण्यात आली आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २, खंड (क) अन्वये काढण्यात आलेली आयडीसी./१८९२ (१७४४१), उद्योग-१४, दिनांक ११ जून १९९३ अन्वये राज्य शासनाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६२ यांचा नियम २८ अन्वये ही जी कामे जिल्हाधिकायांकडे सोपविण्यात आली आहेत अशी उक्त अधिनियमाचे कलम ३२, कलम ३३ पोट-कलम (२), कलम ३६ व कलम ३८ खालील जिल्हाधिकायांची कामे पार पाडण्यासाठी उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), काळ प्रकल्प क्र.२, माणगांव यांस उक्त नियमानुसार अधिकार प्राप्त झाले आहेत ;

आणि ज्याअर्थी, औद्योगिक क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी सोबतच्या अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या जमिनी महामंडळास आवश्यक आहे असे उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), काळ प्रकल्प क्र.२, माणगांव यांचे मत झाले आहे ;

आणि ज्याअर्थी मा. जिल्हाधिकारी रायगड यांनी त्यांचे कडील पत्र क्र. भूसंपादन/टे.६/२६९३०७/२०१४, दिनांक ११ ऑगस्ट २०१४ अन्वये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने निश्चित केलेल्या भूसंपादन धोरणास आणि मोबदल्या प्रती देय असलेल्या तरतुदीची प्रसिद्धी केली आणि ज्याअर्थी सदर भूसंपादना प्रतिचे धोरण स्वेच्छेने आणि कोणत्याही अटीशिवाय अनुसूचीत नमूद केलेल्या स.नं.च्या भू-धारकांनी मान्य करून त्यांनी लेखी स्वरुपात होकार सादर केला आहे ; त्याअर्थी, आता उक्त अधिनियमाचे कलम ३२ पोट-कलम (२) अन्वये उपरोक्तप्रमाणे प्रदान करण्यात आलेल्या राज्य शासनाच्या शक्तीचा वापर करून याद्वारे उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), काळ प्रकल्प क्र.२, माणगांव खाली नमूद केलेल्या जमिनीमध्ये भू-धारकाशिवाय इतर कोणत्याही (१) भाग एक (को.वि.पु.)--९२--१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर ९, २०१९/भाद्र १८, शके १९४१ व्यक्ितचा हितसंबंध आणि कोणताही अधिकार असणाया सर्व व्यक्तींना खाली उल्लेख केलेल्या जमिनीमध्ये उक्त प्रयोजनार्थ का संपादन करण्यात येऊ नयेत यासंबंधी ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत खाली सही करणायास लेखी स्वरुपात कारणे दाखविण्याबद्दल नोटीस देत आहे.

या नोटीसीचे तारीखेनंतर जिल्हाधिकायांच्या मंजुरीशिवाय विक्री करून, पट्टयाने देऊन, गहाण ठेवून अभिहस्तांकन करून, आणि अदलाबदल करून किंवा अन्य रितीने करावयाच्या उक्त जमिनीच्या/जमिनींच्या विल्हेवाटी संबंधी केलेला कोणताही करार किंवा तीवर केलेला कोणताही खर्च किंवा ती मध्ये /त्यामध्ये केलेल्या सुधारणा उक्त जमिनीच्या अंतिमत: संपादन करण्यात येतील अशा भागांसंबंधी भरपाई निर्धारित करण्याया अधिकायंाकडून उक्त अधिनियमाचे कलम ३३, पोट-कलम (पाच) व भूमी संपादन अधिनियम, १८९४ (१८९४ चा एक ला ) यांच्या कलम २४ (सातव्यांदा) अन्वये विचारात घेतल्या जाणार नाहीत.

ज्यांची व्यक्तीगत सुनावणी करण्याची इच्छा असेल अशा कोणत्याही व्यक्तीस या नोटीसीचे तारखेपासून एक महिन्याच्या आत भेटीची वेळ ठरवून कोणत्याही कामाच्या दिवशी सकाळी ११-०० ते १-०० वाजेपयर्ंत खाली सही करणायांच्या कार्यालयात माणगांव येथे समक्ष जातीने किंवा आपल्या कायदेशीर मुखत्यारामार्फत हजर रहाता येईल.

अनुसूची

रोहा माणगांव औद्योगिक क्षेत्र

जिल्हा-रायगड, ता.माणगांव, गाव-पहूर

अ.क्र सं./ग. नं. हिस्सा नं एकूण क्षेत्र (हे.आ) (१) (२) (३) (४)

१ ५३२ पैकी ७.६३२

माणगांव, दिनांक ३० ऑगस्ट २०१९.

प्रशाली जाधव-दिघावकर उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) काळ प्रकल्प क्र. २, माणगांव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 09 September 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-09-09.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-09-09.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.