Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV Extra No. 53 (18-09-2019) गृह विभाग, सन 2019 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 25, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमात आणखी सुधारणा करण्याकरिता विधेयक.

Published 18 September 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-09-18.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १८, २०१९/भाद्र २७, शके १९४१ १ RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ५, अंक २८] बुधवार, सप्टेंबर १८, २०१९/भाद्र २७, शके १९४१ [पृष्ठे ७, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ५३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०१९ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक २५.----महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमात आणखी सुधारणा करण्याकरिता अध्यादेश . . . . . . . . . .

पृष्ठे १--७

गृह विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ सप्टेंबर २०१९.

MAHARASHTRA ORDINANCE No. XXV OF 2019.

AN ORDINANCE

FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA PROHIBITION ACT.

सन २०१९ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक २५.

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमात आणखी सुधारणा करण्याकरिता अध्यादेश.

ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही ;

१९४९ चा २५.

आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमात आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे ;

त्याअर्थी, आता, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत :----

१. (१) या अध्यादेशास, महाराष्ट्र दारूबंदी (सुधारणा) अध्यादेश, २०१९, असे म्हणावे.

संक्षिप्त नाव व प्रारंभ.

(२) तो, तात्काळ अंमलात येईल.

(१)

भाग चार---५३-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १८, २०१९/भाद्र २७, शके १९४१ २. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम (यात यापुढे ज्याचा निर्देश " मुख्य अधिनियम " असा करण्यात आला १९४९ चा २५.

आहे) याच्या कलम २ मध्ये, खंड (१) च्या आधी, पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल :----

सन १९४९ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम २ ची सुधारणा.

" (१-अ) " पूर्णत: दारूबंदी असलेले क्षेत्र " याचा अर्थ, शासनाने, वेळोवेळी, कलम १३९ च्या पोट- कलम (१) च्या खंड (क) अन्वये, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या सर्वमाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे, राज्यात, दारूबंदी जिल्हा किंवा दारूबंदी भाग म्हणून घोषित केलेले, एखाद्या जिल्ह्यचे किंवा जिल्ह्यंचे किंवा त्यांच्या भागाचे क्षेत्र असा आहे ; " ;

(दोन) खंड (३४) नंतर, पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल :----

" (३४अ) " विहित मर्यादा " याचा अर्थ, शासनाने वेळोवेळी, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे, विवक्षित परिमाणातील मद्य किंवा पैशांच्या विवक्षित रकमेपयर्ंत किंमत असलेले मद्य जवळ बाळगण्यासाठी, घोषित केलेली मर्यादा, असा आहे ; ".

३. मुख्य अधिनियमाच्या कलम ६५ मध्ये,-----

(क) खंड (ई) मध्ये, " किंवा जवळ बाळगील. " या मजकुराऐवजी, " किंवा विहित मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात जवळ बाळगील. " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

सन १९४९ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम ६५ ची सुधारणा.

(ख) " त्यास, सिद्धपराध ठरविण्यात आल्यावर " या मजकुराने सुरू होणाया आणि " किंवा या दोन्ही शिक्षा होतील. " या मजकुराने संपणाया मजकुराऐवजी, पुढील मजकूर दाखल करण्यात येईल :----

" तिला, अपराधसिद्धीनंतर,----

(अ) जर तो अपराध, पूर्णत: दारूबंदी असलेल्या क्षेत्राखेरीज इतर क्षेत्रात केलेला असेल तर, अशा प्रत्येक अपराधाबद्दल, तीन वषार्ंपेक्षा कमी नसेल परंतु, पाच वर्षापयर्ंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची, किंवा पंचवीस हजार रुपयांपेक्षा कमी नसेल परंतु, पन्नास हजार रुपयांपयर्ंत वाढविता येईल इतक्या रकमेच्या द्रव्यदंडाची, शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील ;

(ब) जर तो अपराध, पूर्णत: दारूबंदी असलेल्या क्षेत्रात केलेला असेल तर,----

(एक) पहिल्या अपराधाबद्दल, तीन वषार्ंपेक्षा कमी नसेल परंतु, पाच वषार्ंपर्यत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि पंचवीस हजार रुपयापेक्षा कमी नसेल परंतु एक लाख रुपयांपर्यत वाढविता येईल इतक्या रकमेच्या किंवा तिने चुकविलेल्या शुल्काच्या किंवा फीच्या दोनपट इतक्या रकमेच्या, यापैकी जी अधिक असेल एवढया रकमेच्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल ;

(दोन) दुसया अपराधाबद्दल, पाच वषार्ंपेक्षा कमी नसेल परंतु सात वषार्ंपयर्ंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि एक लाख रुपयांपयर्ंत वाढविता येईल इतक्या रकमेच्या किंवा तिने चुकविलेल्या शुल्काच्या किंवा फीच्या तीनपट इतक्या रकमेच्या, यापैकी जी अधिक असेल एवढया रकमेच्या द्रव्यदंडाची, शिक्षा होईल ;

(तीन) तिसया किंवा नंतरच्या अपराधाबद्दल सात वषार्ंपेक्षा कमी नसेल परंतु, दहा वषार्ंपयर्ंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि दोन लाख रुपयांपेक्षा कमी नसेल परंतु, पाच लाख रुपर्यापयर्ंत वाढविता येईल इतक्या रकमेच्या किंवा तिने चुकविलेल्या शुल्काच्या किंवा फीच्या रकमेच्या चारपट इतक्या रकमेच्या, यापैकी जी अधिक असेल एवढया रकमेच्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल. ".

४. मुख्य अधिनियमाच्या कलम ६६ च्या पोट- कलम (१) मध्ये,-----

(क) खंड (ब) मधील, " सेवन करील " या मजकुरानंतर, " किंवा विहित केलेल्या मर्यादेपेक्षा कमी किंवा मर्यादेपयर्ंत प्रमाणात जवळ बाळगील " हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल ;

सन १९४९ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम ६६ ची सुधारणा.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १८, २०१९/भाद्र २७, शके १९४१ ३

(ख) परिच्छेद (एक), (दोन) व (तीन) ऐवजी, पुढील परिच्छेद दाखल करण्यात येतील :----

" (एक) जर तो अपराध पूर्णत: दारूबंदी असलेल्या क्षेत्राखेरीज इतर क्षेत्रात केलेला असेल तर,---

(अ) पहिल्या अपराधाबद्दल सहा महिन्यांपयर्ंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा दहा हजार रुपयांपयर्ंत वाढविता येईल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल :

परंतु, न्यायालयाच्या निकालपत्रात तद्विरुद्ध नमूद करण्यात येतील अशा विशेष व पुरेशा कारणांच्या अभावी अशी कारावासाची शिक्षा तीन महिन्यांपेक्षा कमी असणार नाही व असा द्रव्यदंड पाच हजार रुपयांपेक्षा कमी असणार नाही ;

(ब) दुसया अपराधाबद्दल, दोन वषार्ंपयर्ंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा वीस हजार रुपयांपयर्ंत वाढविता येईल इतक्या द्रव्यदंडाची, शिक्षा होईल :

परंतु, न्यायालयाच्या निकालपत्रात तद्विरुद्ध नमूद करण्यात येतील अशा विशेष व पुरेशा कारणांच्या अभावी अशी कारावासाची शिक्षा सहा महिन्यांपेक्षा कमी असणार नाही व असा द्रव्यदंड दहा हजार रुपयांपेक्षा कमी असणार नाही ;

(क) तिसया किंवा त्यानंतरच्या अपराधाबद्दल दोन वषार्ंपयर्ंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा वीस हजार रुपयांपयर्ंत वाढविता येईल इतक्या रकमेच्या द्रव्यदंडाची, शिक्षा होईल :

परंतु, न्यायालयाच्या निकालपत्रात तद्विरुद्ध नमूद करण्यात येतील अशा विशेष व पुरेशा कारणांच्या अभावी अशी कारावासाची शिक्षा नऊ महिन्यांपेक्षा कमी असणार नाही व असा द्रव्यदंड दहा हजार रुपयांपेक्षा कमी असणार नाही ;

(दोन) पूर्णत: दारूबंदी असलेल्या क्षेत्रात जर तो अपराध केलेला असेल तर,----

(अ) पहिल्या अपराधाबद्दल, सहा महिन्यांपयर्ंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा दहा हजार रुपयांपयर्ंत वाढविता येईल इतक्या रकमेच्या किंवा जप्त केलेल्या दारुच्या किंमतीच्या दुप्पट इतक्या रकमेच्या, यापैकी जी अधिक असेल इतक्या रकमेच्या द्रव्यदंडाची, शिक्षा होईल ;

(ब) दुसया अपराधाबद्दल, दोन वषार्ंपयर्ंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा, वीस हजार रुपयांपयर्ंत वाढविता येईल इतक्या रकमेच्या किंवा जप्त केलेल्या दारूच्या किंमतीच्या तिप्पट इतक्या रकमेच्या, यापैकी जी अधिक असेल इतक्या रकमेच्या द्रव्यदंडाची, शिक्षा होईल ;

(क) तिसया किंवा त्यानंतरच्या अपराधाबद्दल दोन वषार्ंपयर्ंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची, किंवा वीस हजार रुपयांपयर्ंत वाढविता येईल इतक्या रकमेच्या किंवा जप्त केलेल्या दारुच्या किंमतीच्या चारपट इतक्या रकमेच्या, यापैकी जी अधिक असेल इतक्या रकमेच्या द्रव्यदंडाची, शिक्षा होईल. ".

५. मुख्य अधिनियमाच्या कलम ६८ मध्ये " तिला सिद्धपराध ठरविण्यात आले असता " या मजकुराने सुरू होणाया " किंवा या दोन्ही शिक्षा होतील " या मजकुराने संपणाया मजकुराऐवजी, पुढील मजकूर दाखल करण्यात येईल :----

सन १९४९ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम ६८ ची सुधारणा.

" तिला, अपराध सिद्धीनंतर,----

(अ) जर तो अपराध, पूर्णत: दारूबंदी असलेल्या क्षेत्राखेरीज इतर क्षेत्रात केलेला असेल तर, अशा प्रत्येक अपराधाबद्दल, तीन वषार्ंपेक्षा कमी नसेल परंतु, पाच वषार्ंपयर्ंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या करावासाची किंवा पंचवीस हजार रुपयांपेक्षा कमी नसेल परंतु, पन्नास हजार रुपयांपयर्ंत वाढविता येईल इतक्या रकमेच्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.

भाग चार---५३-१४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १८, २०१९/भाद्र २७, शके १९४१ (ब) जर तो अपराध, पूर्णत: दारूबंदी असलेल्या क्षेत्रात केलेला असेल तर,---- (अ) पहिल्या अपराधाबद्दल तीन वषार्ंपेक्षा कमी नसेल परंतु, पाच वषार्ंपयर्ंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि पंचवीस हजार रुपयांपेक्षा कमी नसेल परंतु, एक लाख रुपयांपयर्ंत वाढविता येईल इतक्या रकमेच्या किंवा तिने चुकविलेल्या शुल्काच्या किंवा फीच्या दुप्पटी इतक्या रकमेच्या, यापैकी जी अधिक असेल इतक्या रकमेच्या, द्रव्यदंडाची शिक्षा होईल ;

(ब) दुसया अपराधाबद्दल, पाच वषार्ंपेक्षा कमी नसेल परंतु, सात वषार्ंपयर्ंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि एक लाख रुपयांपेक्षा कमी नसेल परंतु, दोन लाख रुपयांपयर्ंत वाढविता येईल इतक्या रकमेच्या किंवा तिने चुकविलेल्या शुल्काच्या किंवा फीच्या तिप्पट इतक्या रकमेच्या यांपैकी जी अधिक असेल इतक्या रकमेच्या, द्रव्यदंडाची शिक्षा होईल ;

(क) तिसया किंवा त्यानंतरच्या अपराधाबद्दल सात वषार्ंपेक्षा कमी नसेल परंतु, दहा वषार्ंपयर्ंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि दोन लाख रुपयांपेक्षा कमी नसेल परंतु, पाच लाख रुपयांपयर्ंत वाढविता येईल इतक्या किंवा तिने चुकविलेल्या शुल्काच्या किंवा फीच्या चारपट इतक्या रकमेच्या, यापैकी जी अधिक असेल इतक्या रकमेच्या, द्रव्यदंडाची शिक्षा होईल. ".

६. मुख्य अधिनियमाच्या कलम ८३ मध्ये, " त्यापैकी प्रत्येक व्यक्तीस " या मजकुराने सुरू होणाया आणि " किंवा या दोन्ही शिक्षा होतील " या मजकुराने संपणाया मजकुराऐवजी, पुढील मजकूर दाखल करण्यात येईल :----

सन १९४९ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम ८३ ची सुधारणा.

" यापैकी प्रत्येक व्यक्तीस, अपराधसिद्धीनंतर,---

(एक) जर तो अपराध, पूर्णत: दारूबंदी असलेल्या क्षेत्राखेरीज इतर क्षेत्रात केलेला असेल तर, अशा प्रत्येक अपराधाबद्दल, तीन वषार्ंपेक्षा कमी नसेल परंतु, पाच वषार्ंपयर्ंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा पंचवीस हजार रुपयांपेक्षा कमी नसेल परंतु, पन्नास हजार रुपयांपयर्ंत वाढविता येईल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील ;

(दोन) जर तो अपराध, पूर्णत: दारूबंदी असलेल्या क्षेत्रात केलेला असेल तर,----

(अ) पहिल्या अपराधाबद्दल तीन वषार्ंपेक्षा कमी नसेल परंतु, पाच वषार्ंपयर्ंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि पंचवीस हजार रुपयांपेक्षा कमी नसेल परंतु, एक लाख रुपयांपयर्ंत वाढविता येईल इतक्या रकमेच्या किंवा तिने चुकविलेल्या शुल्काच्या किंवा फीच्या दुप्पट इतक्या रकमेच्या, यापैकी जी अधिक असेल इतक्या रकमेच्या, द्रव्यदंडाची शिक्षा होईल ;

(ब) दुसया अपराधाबद्दल, पाच वषार्ंपेक्षा कमी नसेल परंतु, सात वषार्ंपयर्ंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि एक लाख रुपयांपेक्षा कमी नसेल परंतु, दोन लाख रुपयांपयर्ंत वाढविता येईल इतक्या रकमेच्या किंवा तिने चुकविलेल्या शुल्काच्या किंवा फीच्या रकमेच्या तिप्पट इतक्या रकमेच्या, यापैकी जी अधिक असेल इतक्या रकमेच्या द्रव्यदंडाची, शिक्षा होईल ;

(क) तिसया किंवा त्यानंतरच्या अपराधाबद्दल सात वषार्ंपेक्षा कमी नसेल परंतु, दहा वषार्ंपयर्ंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि दोन लाख रुपयांपेक्षा कमी नसेल परंतु, पाच लाख रुपयांपयर्ंत वाढविता येईल इतक्या रकमेच्या किंवा तिने चुकविलेल्या शुल्काच्या किंवा फीच्या रकमेच्या चारपट इतक्या रकमेच्या, यापैकी जी अधिक असेल, इतक्या रकमेच्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल. ".

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १८, २०१९/भाद्र २७, शके १९४१ ५

७. मुख्य अधिनियमाच्या कलम ८५ च्या पोट-कलम (१) मध्ये :---

(क) खंड (अ) मध्ये " आणि " या मजकुराऐवजी, " किंवा " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(ख) खंड (ब) मध्ये " आणि " या मजकुराऐवजी, " किंवा " हा मजकूर दाखल करण्यात येईल.

सन १९४९ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम ८५ ची सुधारणा.

८. मुख्य अधिनियमाच्या कलम ८६ च्या पोट-कलम (१) मध्ये " तिला, सिद्धपराध ठरविण्यात आले असता " या मजकुराने सुरू होणाया आणि " पाच हजार रुपयांपेक्षा कमी असणार नाही " या मजकुराने संपणाया मजकुराऐवजी, पुढील मजकूर दाखल करण्यात येईल :---

" तिला अपराधसिद्धीनंतर,---

सन १९४९ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम ८६ ची सुधारणा.

(एक) जर तो अपराध पूर्णत: दारूबंदी असलेल्या क्षेत्राखेरीज इतर क्षेत्रात केलेला असेल तर, अशा प्रत्येक अपराधाबद्दल सहा महिन्यांपयर्ंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा दहा हजार रुपयांपयर्ंत वाढविता येईल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील :

परंतु, न्यायालयाच्या निकालपत्रात तद्विरुद्ध नमूद करण्यात येतील अशा विशेष व पुरेशा कारणांच्या अभावी अशी कारावासाची शिक्षा तीन महिन्यांपेक्षा कमी असणार नाही व असा द्रव्यदंड पाच हजार रुपयांपेक्षा कमी असणार नाही ;

(दोन) जर तो अपराध पूर्णत: दारूबंदी असलेल्या क्षेत्रात केलेला असेल तर, अशा प्रत्येक अपराधाबद्दल, तीन वषार्ंपेक्षा कमी नसेल परंतु, पाच वषार्ंपयर्ंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि पंचवीस हजार रुपयांपेक्षा कमी नसेल परंतु, पन्नास हजार रुपयांपयर्ंत वाढविता येईल इतक्या रकमेच्या किंवा तिने चुकविलेल्या शुल्काच्या किंवा फीच्या दुप्पटी एवढया रकमेच्या, यापैकी जी अधिक असेल तेवढया रकमेच्या द्रव्यदंडाची, शिक्षा होईल. ".

९. मुख्य अधिनियमाच्या कलम १०४अ नंतर, पुढील कलम समाविष्ट करण्यात येईल :----

सन १९४९ चा अधिनियम क्रमांक २५ यामध्ये नवीन कलम १०४ब समाविष्ट करणे.

आपसात मिटवण्याजोगे नसलेले अपराध.

" १०४ब. कलम १०४ मध्ये काहीही अंतभर्ूत असले तरी, या अधिनियमान्वये कोणतीही दारू विकण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी लायसन धारण करणारी ती कोणतीही व्यक्ती, किंवा तिच्या नोकरीत असलेली व्यक्ती किंवा तिच्या स्पष्ट किंवा र्गभित परवानगीने तिच्यावतीने काम करणारी कोणतीही व्यक्ती, पूर्णत: दारूबंदी असलेल्या क्षेत्रात कोणत्याही दारूची विक्री किंवा वाहतूक करील किंवा ती दारू जवळ बाळगील त्याबाबतीत, असा कोणताही अपराध आपसात मिटवण्याजोगा असणार नाही.".

१०. मुख्य अधिनियमाच्या कलम ११५ मध्ये, " परंतु दंडाची रक्कम तीन हजार रुपयांहून अधिक असणार नाही " हा मजकूर वगळण्यात येईल.

सन १९४९ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम ११५ ची सुधारणा.

११. मुख्य अधिनियमाच्या कलम ११६ ऐवजी, पुढील कलम दाखल करण्यात येईल :----

" ११६. (१) पुढील कलमांखालील केलेल्या अपराधांच्या न्यायचौकशीच्या बाबतीत म्हणजे,----

सन १९४९ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम ११६ ऐवजी नवीन कलम दाखल करणे. दंडाधिकायांनी अनुसरावयाची कार्यपद्धती.

(अ) राज्याच्या कोणत्याही क्षेत्रात, कलमे ६५, ६८, ७०, ७२ आणि ८३ यांखालील अपराधांच्या बाबतीत आणि६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १८, २०१९/भाद्र २७, शके १९४१ (ब) पूर्णत: दारूबंदी केलेल्या क्षेत्रात, कलम ८६ खालील, अपराधांच्या बाबतीत, दंडाधिकारी, वॉरन्ट प्रकरणांच्या न्यायचौकशीच्या संबंधात, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ यामध्ये १९७४ चा २.

विहित केलेली कार्यपद्धती अनुसरील.

१९७४ चा २.

(२) पोट-कलम (१) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या अपराधांखेरीज, या अधिनियमाखालील इतर अपराधांच्या न्यायचौकशीच्या बाबतीत, जर तो अपराध, राज्याच्या इतर कोणत्याही क्षेत्रात केलेला असेल तर, दंडाधिकारी, ज्या संक्षिप्त न्यायचौकशीच्या संबंधात अपील दाखल होईल अशा प्रकरणांच्याबाबतीत, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ यामध्ये विहित केलेली कार्यपद्धती अनुसरील.".

१२. मुख्य अधिनियमाच्या कलम ११९ मध्ये, " आणि ८३ " या मजकुरीऐवजी, ", ८३ आणि ८६" हा मजकूर दाखल करण्यात येईल.

सन १९४९ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम ११९ ची सुधारणा.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १८, २०१९/भाद्र २७, शके १९४१ ७

निवेदन

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम (१९४९ चा २५) व त्याखाली करण्यात आलेले नियम यांअन्वये वेगवेगळया प्रकारचे लायसन व परवाने देण्यात येतात. उक्त अधिनियमाच्या तरतुदींच्या व त्याखाली केलेल्या नियमांच्या उल्लंघनाबद्दल शिक्षेची तरतदू केलेली आहे.

शासनाने, वेळोवेळी आदेश काढून त्याद्वारे, विवक्षित जिल्ह्यंना दारूबंदी जिल्हे म्हणून घोषित केलेले आहे. आणि म्हणून, उक्त जिल्ह्यंमध्ये, उक्त अधिनियमान्वये आणि नियमांन्वये मंजूर केलेले लायसन व परवाने रद्द केली आहेत, उक्त जिल्ह्यत दारू विकण्यास, खरेदी करण्यास, जवळ बाळगण्यास, वापर करण्यास किंवा सेवन करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. उक्त जिल्ह्यंमध्ये उक्त अधिनियमांच्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि दारूबंदीचे धोरण राबवण्यासाठी, उक्त अधिनियमामध्ये विवक्षित सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले आहे.

२. उक्त अधिनियमात प्रस्तावित केलेल्या, करावयाच्या महवाच्या सुधारणा पुढीलप्रमाणे विस्तृतपणे स्पष्ट केल्या आहेत :-----

(क) " पूर्णत: दारूबंदी असलेले क्षेत्र " या संज्ञेची व्याख्या समाविष्ट करणे ;

(ख) पूर्णत: दारूबंदी असलेल्या क्षेत्रात कलमे ६५, ६६, ६८, ८३ व ८६ यांखालील केलेल्या अपराधांबद्दलच्या शिक्षेचे प्रमाण वाढवणे ;

(ग) दारू विक्रीचे किंवा तयार करण्याचे लायसन धारण करणाया व्यक्तीने, किंवा तिच्याकडे नोकरीस असलेल्या व्यक्तीने, किंवा तिच्या स्पष्ट किंवा र्गभित परवानगीने तिच्या वतीने काम करणाया व्यक्तीने, पूर्णत: दारूबंदी असलेल्या क्षेत्रात दारूची विक्री करणे किंवा ती जवळ बाळगणे किंवा तिची वाहतूक करणे याबद्दलचा अपराध मिटवण्याजोगा असणार नाही, अशी तरतूद करणे.

३. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, यात आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे, अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे, म्हणून, हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे.

मुंबई,

भगत सिंह कोश्यारी,

दिनांक १८ सप्टेंबर २०१९.

महाराष्ट्राचे राज्यपाल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वल्सा नायर-सिंह,

शासनाच्या प्रधान सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 September 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-09-18.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-09-18.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.