Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-I (KDS) Extra No. 110 (18-09-2019) नगरविकास विभाग, अधिसूचना, क्रमांक डीपीएस-1219/1752/प्र. क्र. 82/19 नवि-12.

Published 18 September 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-09-18.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर १८, २०१९/भाद्र २७, शके १९४१ १

RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ५, अंक ५७(४)] बुधवार, सप्टेंबर १८, २०१९/भाद्र २७, शके १९४१ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ११०

प्राधिकृत प्रकाशन

नगरविकास विभाग

४ था मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ सप्टेंबर २०१९

अधिसूचना

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६.

क्रमांक टीपीएस-१२१९/१७५२/प्र.क्र. ८२/१९ नवि-१२.---ज्याअर्थी, रत्नागिरी शहराची सुधारित विकास योजना सारभूत स्वरूपाचे बदल वगळून (यापुढे जिचा उल्लेख " उक्त विकास योजना " असा करण्यात आला आहे.) महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे.) च्या कलम ३१ (१) अन्वये शासन नगरविकास विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीएस- १८१९/१३/प्र.क्र. १८६/९९/नवि-१२, दिनांक २७ एप्रिल २००० (यापुढे जिचा उल्लेख " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे.) अन्वये मंजूर झाली असून, ती दिनांक २१ जून २००० पासून अंमलात आली आहे. त्यानंतर सुधारित विकास योजनेतील उर्वरित सारभूत स्वरूपाचे बदल (ई.पी.३१ वगळता) दिनांक १७ जून २००५ अन्वये मंजूर केले असून ती दिनांक २७ जून २००५ पासून अमलात आली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये मौजे झाडगाव येथील स. क्र. २८६, हिस्सा नं १ पैकी, सी.टी.एस.नं ३७६५ (भाग) (यापुढे जिचा उल्लेख " उक्त जमीन " असा करण्यात आला आहे.) ही जमीन आरक्षण क्र. ६६अ-पार्क व उक्त पार्क आरक्षणाचे लगतच्या ९ मीटर रूंद विकास योजना रस्ता या करीता आरक्षित आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त जमीन जिल्हा न्यायालय, रत्नागिरी जोड इमारतीचे बांधकामासाठी आवश्यक असल्याने रत्नागिरी शहराच्या विकास योजनेमध्ये त्यानुषंगाने फेरबदल करण्याची विनंती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांनी रत्नागिरी नगरपरिषदेस (यापुढे जिचा उल्लेख " उक्त नगरपरिषद " असा करण्यात आला आहे) केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३७ (१) नुसार प्रदत्त अधिकारामध्ये उक्त जमीन ' सार्वजनिक-निम सार्वजनिक ' या प्रयोजनार्थ आरक्षित करण्याकरिता (यापुढे ज्याचा उल्लेख " प्रस्तावित फेरबदल " असा करण्यात आलेला आहे.) कलम ३७(१) अन्वयेची कार्यवाही उक्त नगरपरिषदेने केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त नगर परिषदेने प्रस्तावित फेरबदलाबाबतचा प्रस्ताव वैधानिक कार्यवाही करून दिनांक ५ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या पत्रान्वये सहसंचालक, नगररचना, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई यांचे मार्फत शासनाच्या मान्यतेसाठी सादर केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, आवश्यक ती चौकशी केल्यानंतर व संचालक नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा सल्ला घेतल्यानंतर प्रस्तावित फेरबदल मंजूर करणे आवश्यक आहे, असे शासनाचे मत झाले आहे.

(१)

भाग एक (को.वि.पु.)----११०---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर १८, २०१९/भाद्र २७, शके १९४१ आणि त्याअर्थी आता उक्त अधिनियमाच्या कलम ३७ चे पोट-कलम (२) अन्वये, शासनांस प्रदत्त असलेल्या शक्तीचा वापर करून शासन प्रस्तावित फेरबदल खालीलप्रमाणे मंजूर करीत आहे.---

" रत्नागिरी शहराच्या मंजूर सुधारित विकास योजनेतील मौजे झाडगाव येथील स. क्र. २८६, हिस्सा नं. १ पैकी, सी.टी.एस. नं. ३७६५(भाग) ही जमीन, आरक्षण क्र. ६६अ-पार्क व उक्त पार्क आरक्षणाचे लगतच्या ९ मीटर रूंद विकास योजना रस्याखालील जमीन, सोबतच्या नकाशात दर्शविल्यानुसार सदर आरक्षणातून वगळून ' सार्वजनिक-निम सार्वजनिक ' या प्रयोजनार्थ आरक्षित करण्यात येत आहे. " २. सदरचा मंजूर फेरबदल ही अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येईल.

३. सदर अधिसूचना नागरिकांच्या अवलोकनार्थ कार्यालयीन वेळेमध्ये कामकाजाच्या दिवशी खाली नमूद कार्यालयांमध्ये एक महिन्याच्या कालावधीकरिता उपलब्ध राहील :---

(i) सहसंचालक, नगररचना, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई.

(ii) नगररचनाकार, रत्नागिरी शाखा, ६६९, सावंत बंगला, पहिला मजला, स्वामी विवेकानंद रोड, मारुती मंदीर, शिवाजी स्टेडियमच्या मागे, रत्नागिरी.

(iii) मुख्याधिकारी, रत्नागिरी नगरपरिषद, रत्नागिरी.

४. सदर फेरबदलाची अधिसूचना ही महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे व नियम) या वेबसाईटवर सुद्धा उपलबध करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अशोक का. खांडेकर, कार्यासन अधिकारी.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर १८, २०१९/भाद्र २७, शके १९४१ ३

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

4th Floor, Main Building, Mantralaya, Mumbai 400 032 dated the 18th September 2019

NOTIFICATION

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

No. TPS-1219/1752/C.R.-82/19/UD-12.—Whereas, the revised Development Plan of the city of Ratnagiri (hereinafter referred to as " the said Development Plan ") has been sanctioned excluding the modification of substantial nature by the Government in Urban Development Department under section 31(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as " the said Act ") vide Notification No. TPS-1899/13/ C.R.-186/99/UD-12, dated 27th April 2000 (hereinafter referred to as " the said Notification ") and has come into force with effect from 21st June 2000. Thereafter the remaining modification of substantial nature of revised Development Plan (excluding E.P.31) has been sanctioned by the Government on 17th June 2005 and has come into force with effect from 27th June 2005;

And whereas, in the said Development Plan the land bearing Survey No.286, Hissa No.1(part), CTS No. 3765 (part) of village Zadgaon, is reserved for Reservation No. 66A - "Park" & 9.00 meter wide D.P. Road adjacent to the said Reservation of "Park" (hereinafter referred to as " the said Land");

And whereas, the Principal District & Session Judge, Ratnagiri had been requested the Ratnagiri Municipal Council (hereinafter referred to as " the said Municipal Council ") for modification in D.P. for the purpose of constructing the Annex Building in the premises of District Court, Ratnagiri;

And whereas, in exercise of the powers conferred under sub-section (1) of Section 37 of the said Act, the said Municipal Council has initiate the Modification Proposal to reserve the said Land for "Public – Semi Public Zone" (hereinafter referred to as " the proposed Modification ") after following the legal procedure prescribed under sub-section (1) of Section 37 of the said Act;

And whereas, the said Municipal Council, after completing the legal procedure, has submitted the proposal of the proposed Modification to Government for its approval alongwith its letter dated 5th February 2019 through the Joint Director of Town Planning, Konkan Division, Konkan Bhavan, Navi Mumbai;

And whereas, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State Pune, the Government is of the opinion that it is necessary to sanction the proposed Modification;

Now therefore, in exercise of the powers conferred under sub-section (2) of Section 37 of the said Act, the State Government hereby sanctions the proposed modification as mentioned below :—

"The Land bearing Survey No.286, Hissa No.1(part), CTS No. 3765 (part) of village Zadgaon in the sanctioned revised Development Plan of Ratnagiri Municipal Council, is deleted from the Reservation No. 66-A "Park" & 9.00 meter wide D.P. road adjacent to the said reservation of park & the same is reserved for 'Public – Semi Public Zone' as shown on plan";

2. This sanctioned modification shall come into force from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

3. This Notification shall be made available for inspection by the general public during office hours on all working days at the following offices for the period of one month.—

(i) The Joint Director of Town Planning, Konkan Division, Konkan Bhavan, Navi Mumbai.

(ii) Town Planner, Ratnagiri Branch, 669, Sawant Bunglow, 1st floor, Swami Vivekanand Road, Maruti Mandir, Shivaji Stadium back side, Ratnagiri.

(iii) Chief Officer, Ratnagiri Municipal Council, Ratnagiri.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर १८, २०१९/भाद्र २७, शके १९४१

4. This notification is also made available on the Government website at www.maharashtra.gov.in (Acts & Rules).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

ASHOK K. KHANDEKAR,

Section Officer.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 September 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-09-18.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-09-18.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.