Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Extra No. 256 (20-09-2019) गृह विभाग, अधिसूचना, क्रमांक पीएआर. 1319/प्र.क्र. 334/19/तुरुंग-3, कारागृह अधिनियम, 1894.

Published 20 September 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-09-20.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप्टेंबर २०, २०१९/भाद्र २९, शके १९४१ १ RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--अ

वर्ष ५, अंक ११०(२)] शुक्रवार, सप्टेंबर २०, २०१९/भाद्र २९, शके १९४१ [पृष्ठे ३, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक २५६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग

मुख्य इमारत, दुसरा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २० सप्टेंबर २०१९

अधिसूचना

कारागृह अधिनियम, १८९४.

क्रमांक पीएआर. १३१९/प्र.क्र.३३४/१९/तुरुंग-३.----कारागृह अधिनियम, १८९४ (१८९४ चा ९) हा महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्यांच्या कलम ५९ चे खंड (५) व (२८) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा, आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, महाराष्ट्र कारागृह (मुंबई संचित व अभिवचन रजा) नियम, १९५९ यांत आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे :---

१. या नियमांना, महाराष्ट्र कारागृह (मुंबई संचित व अभिवचन रजा) (सुधारणा) नियम, २०१९ असे म्हणावे.

२. महाराष्ट्र कारागृह (मुंबई संचित व अभिवचन रजा ) नियम, १९५९ यांच्या नियम १८ ऐवजी, पुढील नियम दाखल करण्यात येईल :---

१८. अभिवचन रजा मंजूर करणारे सक्षम प्राधिकारी :---

(१) सिद्धापराधी ठरलेल्या कैद्यास अभिवचन रजेवर सोडण्यास मंजुरी देणारे सक्षम प्राधिकारी (यात यापुढे ज्याचा निर्देश ""सक्षम प्राधिकारी"" असा करण्यात आला आहे) हे पुढीलप्रमाणे असतील :---

(एक) महासंचालक, सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, मुंबई हा, पुढील प्रकरणांच्या बाबतीत, सक्षम प्राधिकारी असेल, ती प्रकरणे म्हणजे,

(क) महाराष्ट्र राज्याबाहेर स्थित असलेल्या न्यायालयांनी सिद्धापराधी ठरविलेले कैदी ;

(ख) महाराष्ट्र राज्यात स्थित असलेल्या न्यायालयांनी सिद्धापराधी ठरविलेल्या, परंतु, राज्याबाहेर स्थित असलेल्या कारागृहात बंदीवास भोगत असलेले कैदी ;

(१)

भाग चार-अ-२५६-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप्टेंबर २०, २०१९/भाद्र २९, शके १९४१ (ग) राजकीय अपराधाबद्दल सिद्धापराधी ठरविलेले कैदी ;

(घ) ज्यात कोणतेही प्रकरण किंवा कोणत्याही प्रकरणांच्या प्रवर्गातील प्रकरण त्यांच्याकडे आदेशार्थ निर्देशित करण्यात यावे, असे निर्देशित करण्यात आले असेल तेथे, असे इतर कोणतेही प्रकरण किंवा प्रकरणांचा प्रवर्ग ;

(दोन) इतर सर्व प्रकरणांत, राज्याच्या कोणत्याही भागात बंदीवासात असलेल्या कोणत्याही कैद्याच्या बाबतीत, ज्या विभागात तो कैदी बंदीवासात असेल त्या विभागाचा विभागीय आयुक्त, किंवा तो विभागीय आयुक्त मुख्यालयाबाहेर असेल तेव्हा, ज्यांच्याकडे अभिवचन रजेवर सोडण्याचा अर्ज केला असेल अशा, त्या विभागाचा सहायक आयुक्त हा, सक्षम प्राधिकारी असेल :

परंतु, अभिवचन रजेसाठीचा अर्ज विभागीय आयुक्ताने किंवा सहायक आयुक्ताने फेटाळला असेल त्याबाबतीत, महासंचालक, सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, मुंबई याच्याकडे अपील दाखल करण्यात येईल व त्यावरील त्यांचा निर्णय अंतिम असेल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ना. श्री. कराड,

शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप्टेंबर २०, २०१९/भाद्र २९, शके १९४१ ३

HOME DEPARTMENT

2nd Floor, Main building, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 20th September 2019

NOTIFICATION

PRISONS ACT, 1894.

No. PAR. 1319/C. R. 334/19/PRS-3.—In exercise of the powers conferred by clauses (5) and (28) of section 59 of the Prisons Act, 1894 (IX of 1894), in its application to the State of Maharashtra, and all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend the Maharashtra Prisons (Mumbai Furlough and Parole) Rules, 1959, namely :—

1. These rules may be called the Maharashtra Prisons (Mumbai Furlough and Parole) (Amendment) Rules, 2019.

2. For Rule 18 of the Maharashtra Prisons (Mumbai Furlough and Parole) Rules,1959, the following rule shall be substituted, namely :—

"18. Authorities competent to sanction parole.—(1) The autority competent to sanction release of a convicted prisoner on parole (hereinafter referred to as "the Competent Authority"), shall be as follows, namely :—

(i) the Director General, Correctional Services, Maharashtra State, Mumbai in the following cases :—

(a) prisoners convicted by Courts situated outside the State of Maharashtra, (b) prisoners convicted by Courts situated within the State of Maharashtra, but confined in prisons situated outside the State.

(c) prisoners convicted of political offences,

(d) any other case or class of cases wherein it is directed to that the case of specified class of cases be referred to it for orders,

(ii) In all other cases, the Divisional Commissioner of the Division in which the prisoner is lodged, or when the Divisional Commissioner is out of headquarter, the Assistant Commissioner of the Division for any prisoner lodged in any part of the State, to whomsoever an application for release on parole is made :

Provided that when an application for parole is refused by the Divisional Commissioner or the Assistant Commissioner, an appeal shall lie to the Director General, Correctional Services, Maharashtra State, Mumbai, whose decision shall be final."

By order and in the name of the Governor of Maharashtra,

N. S. KARAD,

Principal Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 20 September 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-09-20.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-09-20.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.