RNI No. MAHBIL 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ८ , अंक - २० ]
शुक्रवार , सप्टेंबर २० , २०१ ९ / भाद्र २ ९, शके १ ९ ४१
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक २०
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
प्रपत्र ड
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका
आदेश (गृह शाखा)
क्रमांक पगम /एसआर-२५/२०१ ९ .-- जिल्हाधिकारी , पुणे, जिल्हा पुणे या आदेशाद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पात्र व्यक्तींची पुणे जिल्ह्याचे " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यतः हा निर्णय निर्गमित केलेच्या तारखेपासून ५ वर्षांकरिता अथवा पुढील आदेश होईपर्यंत अस्तित्वात राहील , तसेच राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही , कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील.
२. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील .
(एक) साक्षांकनाचे काम : --
विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ " साक्षांकनाचे " काम करतील . मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये, तसेच परिशिष्ट " ५ " मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतींवर न चुकता दिनांकासहित साक्षांकन करावे. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर " सत्य प्रत ' म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामांकरिता " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील . अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल .
(दोन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी " असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला कोणतेही मानधन अथवा वेतन/ भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत .
(तीन ) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर, दुकानावर , कार्यालयावर स्वतःच्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा . त्यांच्या नियुक्तीबाबत कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत . तथापि , त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये.
(चार ) " ओळख परेड " तसेच " मृत्युपूर्व जबानी" यासाठी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये .
(१)
एच-३६६ भाग एक-असा. (पु.वि.पु. ) - २० २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- असाधारण- पुणे विभागीय पुरवणी , २० सप्टेंबर २०१ ९ / भाद्र २९, शके १९४१
(पाच) " उत्पन्नाचे प्रमाणपत्र " देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना नसतील .
(सहा) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्हाधिकारी यांचेकडे तत्काळ परत करावे . अन्यथा अशी व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीसाठी अपात्र ठरेल.
(सात) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजीकच्या तहसीलदार कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावा , तसेच साक्षांकित केलेल्यांची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी व ज्या वेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी मागणी संबंधित पोलीस आयुक्त/जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडून केली जाईल त्यावेळी ती तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावी .
अनुसूची अ. क्र.
उमेदवारांची नावे
नियुक्ती क्रमांक
१
२
३ १
पत्ता
४
नितीन सखाराम नामजोशी
१९ ६५
२
१९ ६६
विजय अशोक गुणवंत १९६७
३
सुहासिनी विजय गावडे ४
१९६८
सचिन सुरेश वाडेकर
मोहन किसन पवार १९ ६९
५
राऊत नरेश वसंत ६
१९७०
७
हर्षल राजेंद्र मोरे १९७१
कोमल किरण भालेराव ८
१९७२
१९७३
९
रा. ६ - बी, पत्रकारनगर , शिवाजीनगर , पुणे -१६ .
रा. ओटा क्र. २२५ , जनवाडी, पूरग्रस्त वसाहत, पुणे -१६ .
रा . पी . एम . सी . कॉलनी , ८/१७७ , पांडवनगर , पुणे -१६ .
रा . फ्लॅट नंबर १ , शिवम बिल्डिंग , दर्शन पार्क सोसायटी, डी. पी . रोड, औंध , पुणे .
रा . ९ ३० , वाडेकर बंगला , एफ. सी. रोड , पुणे-४ .
रा . २६/११ , नरवीर तानाजी वाडी, शिवाजीनगर, पुणे-५ .
रा . ७६०१ /अ , पोस्ट ऑफिसजवळ, डेक्कन जिमखाना, पुणे-४ .
रा . आकाश सागर कास्किस , सर्व्हे नंबर २४/१/१ , प्लॉट नंबर ११ , विंग १०१ , सोपाननगर वडगाव शेरी, पुणे -१४.
गौरवकुमार रसिकलाल नहार
१०
१९७४
योगेश पांडुरंग सोनवणे पुणे , २० सप्टेंबर २०१ ९ .
रा . गावठाण निर्वी, निर्वी, पुणे .
रा. निर्वी, शिरूर , पुणे .
नवल किशोर राम ,
जिल्हाधिकारी , पुणे .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .