RNI No. MAHBIL 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी वर्ष- ८ , अंक - २१ ]
गुरुवार , सप्टेंबर २६ , २०१९ / आश्विन ४ , शके १९४१
[ पृष्ठ १
असाधारण क्रमांक २१
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम १५४ अन्वये निदेश. पुणे महानगरपालिकेसाठी शासनाने मंजूर केलेल्या फायर इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस आकारणीसाठीच्या दरांबाबत.
नगर विकास विभाग
मंत्रालय, मुंबई -४०० ०३२
दिनांक १ ९ सप्टेंबर २०१ ९
क्रमांक टीपीएस -१८१ ९/५६३/प्र. क्र. ८४/१ ९/नवि-१३.--पुणे महानगरपालिकेसाठी यापूर्वी ४० मीटर ते १०० मीटर उंचीपर्यंतच्या इमारतींसाठी फायर इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेसच्या दरांना शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८०७/२५२/प्र . क्र. ६३०/०७/नवि-१३ , दिनांक १५ नोव्हेंबर २००७ अन्वये शासनाने मंजुरी दिली आहे.
पुणे महानगरपालिकेसाठी वरील निर्णयान्वये मंजूर केलेले फायर इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस हे बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये आकारण्यात येत असलेल्या दरांपेक्षा जास्त असल्यामुळे पुणे महानगरपालिकेकरिता मंजूर केलेल्या उक्त फायर इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेसमध्ये काही प्रमाणात सवलत देणे आवश्यक आहे , असे शासनाचे मत झाले आहे आणि त्याकरिता महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम १५४ अन्वये शासन खालीलप्रमाणे निदेश देत आहे.
निदेश
दिनांक १५ नोव्हेंबर २००७ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजूर केलेल्या ४० मीटर ते १०० मीटरपर्यंत उंची असलेल्या इमारतींसाठी आकारावयाच्या फायर इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेसमध्ये सदर निदेशाच्या दिनांकापासून पुढील १ वर्षाकरिता ४० टक्के इतकी सवलत देण्यात येत आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिकेने पुढील कार्यवाही करावी .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
किशोर गोखले ,
अवर सचिव , महाराष्ट्र शासन .
(१)
एच-३७६ भाग एक- असा. (पु.वि.पु. )- २१
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA, PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .