RNI NO . MAHBIL/ 2012/ 47985 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी
वर्ष ८ , अंक १४ ]
गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २६ ते ऑक्टोबर २ , २०१९ / आश्विन ४ - १० , शके १ ९४१
[ पृष्ठे २
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
जाहीरनामा
क्रमांक कार्या-११/नपा/ आरआर-४११/३/२०१ ९ .--इचलकरंजी नगरपरिषदेने शासकीय सुट्टीच्या दिवशी काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना आर्थिक मोबदला देणेबाबत केलेल्या उपविधींना नगर विकास विभागाकडील शासन परिपत्रक क्रमांक जीईएन-१०८ ९/ १३७ ९ / सीआर-१ ९ ३/नवि- १४ , दिनांक ९ ऑक्टोबर १ ९ ८ ९ व शासन परिपत्रक क्रमांक सफाई-२०१६/प्र . क्र. ३७०/नवि-२० , दिनांक २७ सप्टेंबर २०१६ मधील तरतुदींनुसार उक्त नमूद दिनांक २० सप्टेंबर २०१ ९ चे आदेशान्वये मान्यता देणेत आली आहे . सदर उपविधी ज्या तारखेस महाराष्ट्र नगरपरिषदा , नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ३२२ (३) (इ) (२) नुसार यालगत शासन राजपत्रात प्रसिद्ध करणेत येत आहेत . तसेच सदर उपविधी ज्या तारखेस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध होतील त्या तारखेपासून अमलात येतील.
उपविधी मंजुरीचा अंतिम मसुदा
इचलकरंजी नगरपरिषद , जिल्हा कोल्हापूर
( १ ) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ३२२ नुसार शासकीय सुट्टीच्या दिवशी काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना आर्थिक मोबदला देणेबाबतचे उपविधी असे संबोधणेत येईल .
(२) व्याख्या.--
1 . " सफाई कर्मचारी " म्हणजे इचलकरंजी नगरपरिषदेने सफाई कर्मचारी म्हणून नियुक्त केलेले व शासनाने " सफाई कर्मचारी " या संज्ञेत समाविष्ट केलेले कर्मचारी असा आहे .
II . " कामाची वेळ " नगरपरिषद वेळोवेळी विहित करील ती कामाची वेळ.
III . " सार्वजनिक सुट्टी" म्हणजे दुसरा व चौथा शनिवार व महाराष्ट्र शासनाने व मा . जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी शासकीय सुट्ट्या म्हणून जाहीर केलेल्या सुट्ट्या.
IV . " मोबदला " म्हणजे सार्वजनिक सुट्टी दिवशी काम केल्याबद्दल दिली जाणारी रक्कम तथा मोबदला.
V. " अधिकारी " म्हणजे सार्वजनिक सुट्टी दिवशी काम करणे आवश्यक आहे असे ठरविणारा व तसे आदेश देणारा अधिकारी.
VI . " अत्यावश्यक सेवा " म्हणजे शासनाने वेळोवेळी अत्यावश्यक सेवा म्हणून ठरविलेल्या सेवेचा यात समावेश होईल .
(३ ) शासन व नगरपरिषदस्तरावर जाहीर होणाऱ्या शासकीय सुट्ट्यांचे दिवशी नगरपरिषदेचे आरोग्य अधिकारी यांनी सफाई कामगार यांनी कामकाज करणे अपरिहार्य आहे याबाबत प्रमाणित करणे आवश्यक राहील . मात्र अशा सर्व सुट्ट्याऐवजी प्रथमतः सदर महिन्यात पर्यायी सुट्टी देणेबाबतचे नियोजन त्या त्या प्रशासकीय वॉर्डमधील दैनंदिन कामकाजावर परिणाम न होता देणेची जबाबदारी आरोग्य अधिकारी
(१)
एच-३७४ , भाग एक-अ(पु.वि.पु.)-१४ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २६ ते ऑक्टोबर २ , २०१९ / आश्विन ४ १०, शके १९४१ यांची राहील. जर पर्यायी सुट्टी देणे शक्य नसल्यास तसे आरोग्य अधिकारी यांनी प्रमाणित करून या उपविधीतील तरतुदीनुसार सुट्टीऐवजी सफाई कर्मचारी यांना वेतन अदा करणेबाबत छाननीअंती शिफारस करणे आवश्यक राहील .
(४ ) सार्वजनिक सुट्ट्या दिवशी काम करण्यावरील मर्यादा .
(अ) सार्वजनिक सुट्ट्या दिवशी काम करणे खरोखरच आवश्यक आहे अशी जी परिस्थिती निर्माण झाली असेल तिचे सांगोपांग विवेचन, हे विवेचन नगरपरिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी तत्कालीन परिस्थितीनुसार सार्वजनिक आरोग्याच्या हिताच्या दृष्टीकोनातून ठरविणेचे आहे .
(ब ) " अपरिहार्य कारण " म्हणजे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम करून घेतल्याशिवाय इलाज नाही/पर्याय नाही/ गत्यंतर नाही अशी निर्माण झालेली परिस्थिती.
(क) उद्भवलेली परिस्थिती ही अपरिहार्य कारणासारखी आहे वा का टाळणेसारखी नाही याची कारणमीमांसा तसेच चिकित्सा त्या त्या वेळी करणे आरोग्य अधिकाऱ्यावर बंधनकारक राहील .
(ड) आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेली कारणमीमांसा व चिकित्सा योग्य आहे की अयोग्य वा त्यातून अन्य मार्ग काढणे शक्य आहे किंवा कसे हे ठरविणेचा सर्वस्वी अंतिम अधिकार मुख्य अधिकारी यांचा राहील .
(इ) सार्वजनिक सुट्टी दिवशी काम करून घेतलेच पाहिजे असे म्हणण्याचा कोणताही व कसलाही अधिकार नगरपरिषद कर्मचारी संघटना वा कर्मचारी यांना असणार नाही.
(प) सार्वजनिक सुट्टी दिवशी काम करून घेणे याचा अर्थ सर्वच सफाई कर्मचाऱ्यांकडून सरसहा काम करून घेणे असा नव्हे . मर्यादित कर्मचाऱ्यांच्याकडून अथवा काही विशिष्ट कर्मचाऱ्यांच्याकडून ते काम करून घेणे शक्य असेल तर तसे करून घेणेचा अधिकार सर्वस्वी मुख्य अधिकारी यांचा असेल.
मात्र तसे करताना त्या त्या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून ते काम करून घेणे आवश्यक असेल . अपवादात्मक परिस्थितीत मुख्य अधिकारी अन्य योग्य वाटतील ती उपाययोजना करू शकतील .
(ग) अत्यावश्यक परिस्थिती व नैसर्गिक आपत्ती या परस्पर भिन्न समजण्याच्या आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी करून घेण्याच्या कामाविषयी हे उपविधी लागू होणार नाहीत .
(५) सार्वजनिक सुट्टी दिवशी काम करून घेणेबाबतची याचिका मा. उच्च न्यायालय , मुंबई येथे प्रलंबित आहे. या याचिकेच्या निकालास बाधा न येता हे उपविधी अंमलात येतील . तथापि , मागील कालावधीचा फरक मागणार नाही अशा आशयाचे वचनपत्र नगरपरिषदेने ठरविलेल्या विहित नमुन्यात कर्मचाऱ्यांकडून त्या त्या वेळी घेतले जाईल . जे कर्मचारी असे हमीपत्र देणार नाहीत त्यांना सुट्टीच्या दिवसांचा मोबदला मिळणार नाही. सुट्टीच्या दिवशी काम केलेल्या कालावधीसाठी पर्यायी सुट्टी दिली जाईल.
( ६ ) हे उपविधी महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या दिनांक २७ सप्टेंबर २०१६ च्या परिपत्रकानुसार उपविधी तयार करणेचे अधिकार बहाल करणेत आलेने ही उपविधी करणेत येत आहेत .
(७) सार्वजनिक सुट्टी दिवशी काम केलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना पर्यायी सुट्टी देणे शक्य असेल तर तसे देण्यास या उपविधीमुळे प्रतिबंध होणार नाही. तथापि , अशी सुट्टी कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार व आरोग्य अधिकाऱ्यांच्या सोईनुसार दिली जाईल . त्यातूनही कमाल १ महिन्याच्या आत अशी पर्यायी सुट्टी देणे शक्य झाले नाही तर कर्मचाऱ्यास मोबदला दिला जाईल.
( ८ ) हे उपविधी महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाले दिनांकापासून लागू होतील.
दौलत देसाई ,
जिल्हाधिकारी , कोल्हापूर.
कोल्हापूर , २० सप्टेंबर २०१ ९ .
PRINTED
PRISON ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA.