महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--ल
वर्ष ५, अंक ९७] गुरुवार, ऑक्टोबर ३, २०१९/आश्िवन ११, शके १९४१ [पृष्ठ १ किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक २८५
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ ऑक्टोबर २०१९
अधिसूचना
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७.
क्रमांक एमएसए. ०९/२०१९/प्र. क्र. २२९/कामगार-१०.----महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ (महा. ६१/२०१७), (यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा करण्यात आलेला आहे) च्या कलम ११ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, असे आदेश देत आहे की, महाराष्ट्र राज्यात दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुका, २०१९ होत असल्याने, त्या त्या विधानसभा मतदारसंघ क्षेत्रांमध्ये, अत्यावश्यक सेवा देणाया दुकाने व आस्थापना वगळून, सर्व आस्थापना सकाळी ७-०० ते संध्याकाळी ६-०० या वेळात बंद ठेवण्यात याव्यात. तसेच त्या दिवशी बंद राहिलेल्या दुकाने/आस्थापनांमधील कर्मचायांच्या वेतनातून कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डॉ. श्रीकांत पुलकुंडवार, शासनाचे उप सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI NAMDEO KONDAJI BHOSALE.